Thursday, March 9, 2017

ती आणि तो : कालचक्र..!

ती : (channel change करता करता) ए चल "बागबान" बघू...मला कधीचाच बघायचा होता...
तो : मुळीच नाही मला नाही बघायचा...
ती : का ?
तो : (हासून) तो मोठ्यंना बिघडवणारा अतिशय अतीरंजीत आणि melodramatic picture आहे म्हणुन..! त्याने सगळ्या youth ची image आपल्या आई-वडिलांसमोर  खराब केली आहे म्हणुन...त्याने overall young लोकांची त्यांच्या आई-बाबांच्या नजरेत थोडक्यात वाट लावली आहे आणि त्यांना villain बनवुन टाकलं आहे म्हणुन...!
ती : (मोठ्याने हासत) म्हणजे ?
तो : जसं मोठ्यांना वाटायचं न की नको त्या वयात अमके-तमके सिनेमे बघितले की आपण बिघडू म्हणुन...तसच मला या सिनेमा बद्दल वाटत, फक्त मोठ्यांबद्दल...कि हा सिनेमा बघितला की ते हमखास बिघडतील...
ती : अरे काही काय बोलतोस...!
तो : तुला "बागबान" ची story माहिती आहे का?
ती : हो तशी तुटक तुटक माहिती आहे...
तो : अग होतं कस की जे आपण ज्या वयात असतो त्याच वयाचे आणि वयाला अनुसरून दाखवलेल्या अतिरंजित मुद्द्यान्वरचे सिनेमे बघितले की आपण त्याच्याशी नकळत relate करायला लागतो आणि तिथेच सगळा problem आहे...
ती : अगदी correct...हेच मला माझी आई मी college मध्ये असताना सिनेमे बघताना सांगायची...मला तर अगदी आठवत की आई सोबत मी शाहरुख चा 'मोहब्बतें' बघायला गेली होती आणि संपुर्ण picture मला इतका fascinating वाटला होता कि काय सांगू तुला...actually ते वयही तसच होतं म्हणा...तेव्हा आपल्याला कुठे इतक कळत होतं...पण आई ला इतका संताप आला होता तो picture बघुन...ती सारख मध्ये मध्ये "काय फालतूपणा दाखवता आजकालच्या generation ला...त्यांना कळत कस नाही की मुलं बिघडतील यांनी म्हणुन" असं काहीस म्हणुन मग मला देखील काळजीपोटी सागंत होती की असं काही नसत आणि हे सगळं खोट असत म्हणुन...मला तेव्हा आईचा इतका राग आला होता...पण आता पटत की आई बरोबर होती...त्याने हुरळून जाण्याचं जरी वय असलं तरीही आई च्या शब्दांचा थोडा तरी मनावर परिणाम झाला...तरीही picture ची मजा त्याने थोडी कमी झालीच...
तो : Exactly हेच मला म्हणायचं आहे...फक्त आता जरा role reversal करून बघ, keeping "बागबान" आणि आई बाबा in the perspective...तो सिनेमा इतका dangerous आहे आई बाबांच्या generation साठी की अगदी कुठल्याही आणि कोणाच्याही आई बाबांनी तो बघितला की त्यांचा थोडा तरी विशवास आपल्या अपत्यांपोटी डळमळीत झाल्याशिवाय राहत नाही...आणि तिथेच मला objection आहे...जी काळजी तुझ्या आईला वाटत होती आणि ती जे बोलत होती...तेच मी हा सिनेमा आई बाबां समोर लागला की बरळतो...(हासतो) 
ती : (हासत) काय सांगतोस...!!!
तो : अग jokingly...पण तरीही i make it a point की मी माझा मुद्दा त्यांच्या पर्यंत पोहचवतो आहे...exactly जशी तुझी आई 'मोहब्बतें' च्या वेळेस करत होती...! कारण तो सिनेमा पाहुन मला नको आहे माझी कुठलही action त्यांनी त्या अतिरंजित picture शी relate करावी...!
ती : चल रे तुझ म्हणजे अतीच आहे जरा...कुणी इतकं seriously घेतं का सिनेमाला..."काहीही हं श्री" (हासत)...!
तो : अग हो मी कधी कधी अतीच करतो...आणि i am sure की आपले आई बाबा आपल्या बद्दल तसा विचार करतही नाही आणि करणार देखील नाही पण तरीही मी बऱ्याचशा घरांमध्ये त्या picture चे references घेऊन आपल्या मुलाबद्दल बोलताना पाहिलंय म्हणुन...मुलांच्या निर्विवाद आणि निरामय कृत्यांचा वेगळाच अर्थ घेऊन गैरसमज झालेले पहिले आहेत म्हणुन...! 
ती : म्हणजे आधी आई बाबा tension मध्ये की आपलं मुल कोणते सिनेमे पाहतो...नंतर कालचक्र असं फिरत कि तेच tension आता मुलाला पण, की आई बाबा कोणते सिनेमे पाहतात..."बागबान" की "नटसम्राट" की अजून काही...दुनिया गोल है...खरच...!
तो : (हासत) एकदम correct...! 
ती : चल मग आता तू इतकी उत्कंठा वाढवली आहेसच तर एकदा बघुनच घेते "बागबान"...
तो : थांब मी घरी phone करून कानोसा घेतो कि आई बाबा तोच picture बघत आहेत का ?? ("ती" ला डोळा मारत) त्यांच वयच तसं आहे...त्यांच्या वर लक्ष ठेवायला हवं...
ती : (त्याच्या कडे सोफ्याची उशी फेकत):-) :-) 

सारंग कुसरे