Tuesday, June 6, 2017

ती आणि तो : मेळावा

ती - झाला बाबा एकदाचा society चा so called मराठी  मेळावा, उत्सव, function...हुsssssssssश...!
तो - काय झालं...आता...!
ती - काही नाही रे बरेच दिवस काही बोलले नाही मी ...पण आज बोलून मोकळ व्हावसं वाटतंय...
तो - अगदी नक्की...i am all ears...तू काय बोलणार आहेस याची मला कल्पना आहेच...पण तरीही तुझ्या तोंडून ऐकायला गम्मत वाटेल मला...
ती : अरे सगळा समारंभ म्हणजे  सगळी गम्मतच झाली actually...कुठे seriousness न्हवताच मुळी...मला असं वाटतं vision / mission कुठे तरी missing होतं...focus as i always say...
तो : पण जे फोटो दिसताहेत त्यावरून तर तसं काही दिसत नाही...फोटोस तर ज्वलंत उदहरण आहे ...a documentary evidence about the success of the entire event....
ती : भुलतो आहेस तू...ते फक्त एक illusion आहे...
तो : अग असं कस म्हणतेस तू...मी लोकांच्या recorded reactions पण पाहिल्या...
ती : त्याचं काय आहे महाराज, की आजकालच्या photography / videography च्या जमान्यात creating illusions बाये हात का खेल है...!!
तो : तसं तुझं बरोबरच आहे...पण detail मध्ये सांग तुला exactly काय वाटलं ते...
ती : मला असं वाटतं की identity crisis झाला बहुतेक ....आपण मराठी लोकांसोबत "मराठीपण", "मराठी बाणा", "मराठी संस्कृती" celebrate करायचं ठरवलं होतं  की आपण मराठी लोकांसोबत नुसतंच so called celebration / धांगडधिंगा करायचं ठरवलं होतं...हा main घोळ झालं माझ्या मते....अजून बरेच घोळ आहेत पण मी अगदी roots पासुन सुरवात करते आहे...!
तो : म्हणजे ??
ती :  अरे जर आपण आपलं मराठमोळेपण साजरं करायचं ठरवलं तर मग त्याची advertisement, publicity ही मुख्यत्वे मराठीत असावी ही माफक अपेक्षा आहे...correct...त्या communication ची  quality हा separate मुद्दा आहे ???
तो : अगदी correct...मग तसं झालं नाही असं तुझं म्हणणं आहे का?
ती : हो मग...तू आपल्या समारंभाचे सगळे FB posts, digital posts हवं तर check कर...एक तर सगळे हिंदी मध्ये अन ते ही अतिशय सुमार quality चे...level नसलेले...बर कार्यक्रमासाठी जी website केली त्यावर सुद्धा तुमचं अधनं मधन हिंदी सुरूच...
तो : अग मराठीतील बोली भाषेचा उपयोग केला असेल...ज्यात इतरही भाषेचा वापर मराठी म्हणूनच केला जातो...हिंग्लिश / मार्लीश सारखं...तसं केलं असेल मराठी ला फार open minded दाखवण्याकरता
ती : हा benefit of doubt मी ही सुरवातीला दिला देखील...पण जेव्हा consistently सुमार दर्ज्याचे communication publish होत राहिले in the form of advertisement आणि त्याचा हशा होत असलेला जेव्हा पाहिला ...तेव्हा कळलं की  something is seriously wrong...!
तो : पण तू तेव्हाच आवाज का नाही उठवला...?
ती : तुला काय म्हणायचं आहे मी नाही उठवला...? उठवला तरीही it all fell on deaf ears.
तो : बर हे झालं advertisement चं ...बाकी तुला अजून काय खटकलं...?
ती : (हासत) बरंच...कुठे एकवाक्यता दिसली नाही...कुठल्याच dates / promises honor होताना दिसल्या नाही...एक strong drive दिसला नाही पुर्ण process मध्ये...सगळी आपली गम्मत सुरु आहे असंच वाटलं शेवटपर्यंत...
तो : तुला काय माहित...you were not the part of organizers group...ते असतीलही serious...
ती : seriousness असता तर तो जाणवला असता during the process आणि judgement day ला देखील...इतका seriousness असला असता तर जो काही भोंगळ कारभार झाला तो कदाचित झाला नसता...
तो : अग पण ही पहिलीच वेळ ना...मग होणारच की काही चुका...
ती : होणार ना अगदी नक्की...ते कळण्या इतकी मी दुधखुळी नाही...पण चुका जास्त असल्या आणि बरोबर घडलेल्या गोष्टी जर कमी असल्या, तर कार्यक्रम चुकलाच जास्त असं नाही का म्हणणार कुणीही...अरे अगदी साध आहे...एखाद्या विषयात ३५ पेक्षा कमी मिळाले तर तुम्हाला कुणी पास झालं असं म्हणत नाही...
तो : जाऊ दे ...अपयश ही यशाची पहिली पायरी असते...असं म्हणायचं आणि पुढे चालू लागायचं...
ती : अगदी मान्य...पण ते केव्हा...जेव्हा आपण मान्य करतो की आपण अपयशी झालो आहोत म्हणुन...आणि ते मान्य करण्याइतका प्रामाणिकपणा आपल्या जवळ आहे तेव्हा...
तो : म्हणजे तुला काय म्हणायचं आहे...?
ती : मला काय म्हणायचं आहे ते तुला चांगलच कळलं आहे...जाऊ दे
तो : पण actual मेळाव्याचा दिवशी पण फार mis-management होतं का?
ती : as if यांनी कधी दुसरे मेळावे बघितलेच नाही असं वातावरण होतं...आज वर आपण इतके समारंभ आयोजित केले, बघितले पण त्यातून आपण काही शिकलोच नाही ...इतकं तो कारभार नवखा आणि भोंगळ वाटत होता...
तो : मांडवामागे गोंधळ होणारच...that is expected...!
ती : अगदी मान्य...पण तो नवरदेवा पर्यंत आणि मुला कडच्यान्पर्यंत जर पोहोचला तर वर पक्ष जसा नाराज होतो तसच काहीसं झालं तिथे...मांडवा मागचा गोंधळ हा मांडवा मागेच राह्यला पाहिजे...तो जर मांडवा पुढे आला तर तो foul धरतात...तसच काहीसं झालं तिथे...
तो : अगं unintentionally झालं असेल...
ती : obviously unintentional चं होतं सगळं, पण पैसे देऊन आलेल्या लोकांना ते त्रासाचं आणि मनस्तापाचं  झालं...it was not worth the value people paid...सगळं घरचं वाटावं प्रोटोकॉल विरहित वाटावं हा अट्टाहास चांगलाच आहे पण ते तितकं natural दिसण्या साठी तितकी practice ही लागते याचा विसर पडला आयोजकांना आणि तिथेच माशी शिंकली....ती केली असती तर इतका poor show झाला नसता...त्या पेक्षा मग कितीही कंटाळवाण वाटलं तरीही मग सगळे stage प्रोटोकॉल्स follow करण बर...atleast दिसायला तरी ते professional दिसतं...तिथे सगळा problem झाला
तो : पण शेवटी कार्यक्रम पार पडला नं...
ती : पार पडला नाही रे...."पार पडला" शेवटी...म्हणजे बघ ना मराठी चा जयघोष करायचा पण तो इंग्लिश किवा हिंदी किवा अजून कुठला इतर भाषेत...व्यवस्थापनाच्या नावा खाली बोंब आणि मग म्हणायचं की मराठी लोकं एकत्र येत नाहीत...नाकं मुरडतात...!
तो : तुला नाही वाटत की तू खूपच negative बोलते आहेस जे झालं त्या बद्दल...काही तरी तर चांगलं झालंच असेल..?
ती : हो रे मलाही कळतं आहे मी खुप negative बोलते आहे...पण काय करणार कुणाला तरी हे बोलणं जरुरी होतं...
तो : ऐकणारे म्हणतील There are enough critics in the world, we need a few more people to serve as an inspiration. तू  critic झाली आहे असं नाही का वाटत तुला?
ती : हरकत नाही ...निंदकाचे घर असावे शेजारी...इतकं कळत मला...

(तितक्यात दारावरची बेल वाजते...देशपांडे येतात..मेळाव्यातील एक organizer)

तो : काय देशपांड्या काय म्हणतोस कसा झाला मेळावा...?
देशपांड्या : अरे great success...!! दाखवून दिलं मराठी काय करू शकतात ते...just amazing...!!
तो : ("ती" च्या कडे बघत हसतो आणि म्हणतो) अगं ऐकलंस का देशपांड्या काय म्हणतो आहे...छान झालं म्हणे समारंभ...

(पुढला एक तास देशपांडे मेळावा कसा झक्कास झाला यांच रसभरीत वर्णन करतो आणि "तो" आणि "ती" एक मेकांना कोपरखळ्या मारत त्याच्या गप्पा ऐकतात)

सारंग कुसरे