Thursday, January 26, 2017

ती आणि तो : communication gap..!!

ती : जायचं का केरळ ला या सुट्ट्यांमध्ये...?
तो : (newspaper मध्ये सगळं लक्ष) hmm
ती : अरे मी बोलते आहे काही तरी...
तो : (paper चाळत )...done...!

(परत शांतता)

ती : (वैतागुन) अरे बोल ना घडा घडा...विचार ना की कोणत्या तारखेला जायचं, कोणती कोणती गावं पाहायची, tours सोबत जायचं की individual जायचं, किती दिवस जायचं...
तो : अगं मी हे सगळं बोलणारच होतो...
ती : वाह वाह दिसतंय ना सगळं...बोलणारच होता म्हणे...
तो : come on...let the idea sink in first...
ती : idea sink in व्हायला इतका वेळ...
तो : idea sink in process मध्ये तू जे मला विचारायला सांगत होतीस...expect करत होतीस त्याचाच विचार चालला होता...
ती : हो का...तुझ्याशी कोण वाद घालणार
तो : तारीख - ३ एप्रिल, गावं - कोची, मुन्नार, अलापुझा, पेरियार, थेक्कडी, अलेपी backwaters आणि finally कोवलम, जायचं - tours सोबत, दिवस - १०, बघितलसं i was really letting the idea sink in...
ती : अरे मग चेहेऱ्यावर थोडं दिसू दे ना...कळू दे ना समोरच्याला...
तो : अग असतो एकेकाचा स्वभाव...काही लोक तुमच्या बोलण्याकडे खुप लक्ष आहे असं दाखवतात आणि actual लक्ष त्यांच भलतीकडेचं असत...किवा पुढे आता काय बोलावं या विचारात असत...आणि या उलट...
ती : तुझ्या सारखे महाभाग...पण माझं काय म्हणण आहे की जर तुझं इतकं active listening आहे तर ते वागण्यात ही थोडं दिसलं तर हरकत काय आहे...?? बोलणाऱ्याला तितकंच समाधान आपल्या कडे लक्ष दिल्याचं...!
तो : हा माझ्यातला weak-point असेलही...बहुतेक आहेच...
ती : आणि तो लवकर overcome करावास असं मला वाटतं...तुला एक सांगु...?
तो : सांग..!
ती : त्याचं काय आहे न...बरेचदा नुसती active listening ची acting ही समोरच्याला सुखावून जाते...?
तो : what do you mean ??
ती : कसं असत ना...तुम्हाला समोरच्याचा acceptance मिळत असेल, positive / negative thats a different story...पण feedback मिळत असेल...तर बोलणाऱ्याला ही चांगलं वाटत, मोकळं झाल्याचं feeling येतं...मग भलेही समोरचा acting का करत असे ना...!
तो : पण हे तर चूक आहे ना...हे म्हणजे तुम्ही, समोरचा तुमचं ऐकतो आहे, या perception वरच खुश होण्यासारखं आहे...भले ही तो ऐकत नसेल in reality...
ती : तसं बघायला गेलं तर जगात बहुतेक गोष्टी reality पेक्षा perception वरच तर चालतात...progress होतात...
तो : मला हे काही पटत नाही...
ती : आता हेच बघ न...तू तेव्हा पपेर मध्ये डोकं असताना hmm म्हण्यापेक्षा जर माझ्याकडे बघुन ती गोष्ट तु register केली आहेस हे जर मला नुसतं भासवलं असतं आणि हे detail planning नंतर जरी दिलं असतस तरीही चाललं असतं...!
तो : पण माझा त्या वेळेस च्या reaction पेक्षा planning solid होतं की नाही...?
ती : होतं रे नक्कीच...फक्त थोडं communication मध्ये मागे पडलास...बाकी काही नाही...! Actually तू इतका चांगला listener आहेस तर ते पण बाहेर दिसावं इतकचं माझं म्हणण आहे...असो खुप झालं analysis-paralysis
...break-fast ला मस्त कांदे पोहे करते...
तो : चालेल...

(नंतर breakfast करताना तो तिला केरळ बद्दल च्या इतक्या गोष्टी सांगतो की आपण ऐकतो आहे हे भासवण्याच्या नादात तिला डुलकी येते आणि संभाषणाच्या मधेच तिच्या मानेला एक झटका बसतो)

तो : (हासत) पाहिलंस हा फरक आहे...तू नुसती acting करत होतीस आणि म्हणुन perception create करण्याच्या नादात तुला दरदरून पेंग आली...
ती : (स्वतःला सावरत) होत असं कधी कधी...पण atleast तुला neglect करते आहे असं तर नाही ना भासवलं...
तो : पण शेवटी सगळं मुसळ केरात गेलं ना...
ती : म्हणजे तात्पर्य काय तर it should be genuine...rather than "ऐकुनही न ऐकल्यासारखं करणे" आणि "खुप ऐकण्याची acting करूनही त्याकडे लक्ष नसणे"...
तो : cheers !!!

(दोघेही चहा चे cups उंचावतात)

सारंग कुसरे 

Thursday, January 19, 2017

ती आणि तो : time travel / throwback

(रात्रीचे जेवण झाल्यावर dining table वर)

तो : झालं आता जेवण आता तरी सांग काय surprise आहे...
ती : काही hints देते...T-Series...
तो : ही कसली hint...अजून काही तरी सांग...
ती :  T-Series...60 mins
तो : वाह !! काय पण addition आहे...जरा कळेल अशी hint दे न..!
ती : आता last chance...T-Series...60 mins...शुभंकरोती...
तो : हरलो madam....तुम्हीच काय ते सांगा आता
ती : अरे तुझी लहानपणीची record  केलेली कॅसेट सापडली मला आज कपाट आवरताना...त्यात तू लहानपणी म्हंटलेलं शुभंकरोती आहे...रामरक्षा आहे...भीमरूपी आहे...काय solid मजा आली माहितीये ऐकताना...
तो : काय सांगतेस...superb...चल परत ऐकू...

(दोघंही परत ऐकतात)

तो : (एकदम emotional आणि philosophical होत) i think this is life...काय मस्त वाटलं seriously...!
ती : "Old is gold" उगाच नाही काही...
तो : हो न खरच...i mean it was a time travel...हे तर सगळं आपलं स्वतःच, personal अनुभवुन तर कुणीही ही nostalgic होईलच...पण youtube वर सुद्धा साधी जुनी गाणी किवा picture बघितला तरीही you instantly go into that era...
ती : अगदी correct...आता परवाच मी youtube वर "व्योमकेश बक्षी" चे काही भाग बघितले...इतकी मजा आली...मला माझे सगळे सहावी सातवी चे दिवस आठवले...ती serial राहिली एकिकडे आणि माझा, तू जस आत्ता म्हणालास तसा, time travel, सुरु झाला...त्यावेळेसचे बुधवारचे रात्री चे जेवण आठवले, हात सुकेपर्यंत ताटावर बसुन अधिरतेने ती serial बघण्याचा रोमांच आठवला...त्यानंतर dining table वर भरभरून केलेली अनेक discussions आठवली...नंतर रात्री जागून केलेला आभ्यास पण आठवला....एकदा time travel सुरु झाला की कशाचं कशाला सोईरसुतक नसत...एका आठवणीतून दुसरी आणि दुसऱ्यातून तिसरी...
तो : हो ना...त्या दिवशी मला पण "आशिकी" आणि "कयामत से कयामत तक" चे गाणे ऐकताना असच झालं...पण त्याच गोष्टीला अजून एक नवीन नाव दिलं आहे आजकालच्या पिढी म्हणजे gen-y नी...
ती : काय?
तो : throw-back...पण throw-back is not only limited to media...म्हणजे फक्त कॅसेट किवा serials किवा picture पुरत नसत...आता अगदी latest time-travel म्हणजे माझी मी recently आपल्या college मध्ये गेलो होतो तो...इतकी मजा आली की that time travel is beyond words...
ती : आपण आपले चांगले क्षण जिथे घालवलेले असतात त्याच जागा काही दिवसांनी, वर्षांनी परत बघायला खरच खुप मजा येते...
तो : म्हणजे कशी गम्मत असते बघ...ती जागा सोडताना त्रास, ती जागा परत भेटल्यावर त्रास...सगळी आसक्ती...
ती : हो न...पण इतकं सगळं छान discussion सुरु असताना त्याला आता आधायत्मिक वळण नको देऊस please...आसक्ती वगरे ऐकल्यावर पोटात एकदम गोळा आला की आता तू अजुन खोलात शिरशील आणि मला ही तिथे गटांगळ्या मारत नेशील...
तो : (जोऱ्याने हासत) नाही dont worry...!! पण काही गोष्टी आठवल्या की आजही हसू आवरत नाही..."देवदास" लपुन पाहुन आल्यावर घरी जे आईनी back मध्ये लाटणं throw केलं होत...तो throwback मी आयुष्यात कधीही विसरणार नाही...
ती : हिच तर पुंजी आहे पुढल्या प्रवासाकरता...या एकाच feeling ला, thought ला गुलझार साहेबांनी इतकं मस्त बंदिस्त केला आहे एका line मध्ये...
तो : कोणत्या ??
ती : "जो गुजर जाती है बस्स, उसी पे गुजर करते है...राह पे रेहेते है, यादो पे बसर करते है"
तो : "नमकीन" मधलं संजीव कुमार च गाणं...अप्रतीम...!
ती : yesss...!
तो : चल तेच ऐकु आत्ता...

(दोघंही youtube वर ते गाण "सोबत" ऐकत आपापला "स्वतंत्र" time travel करतात)

सारंग कुसरे 

Thursday, January 12, 2017

ती आणि तो : hair dye...!

("तो" गळ्याभोवती towel गुंडाळून, "ती" त्याच्या डोक्याला hair dye लावताना)

तो : (वैतागुन) झालं का लावुन सगळ्या डोक्याला...प्रत्येक केसाला...केसाच्या प्रत्येक शेंड्याला...
ती : झालंच आहे...just two more minutes...
तो : हेच गेल्या 20 मिनिटांपासून ऐकतोय...
ती : झालंच...!
तो : आता कितीवेळ हे रंगकाम बाळगायचं ते ही सांगून द्या...?
ती : फक्त 15 मिनिटं...
तो : हे कस काय...नेहेमी तर तू मला किमान 45 मिनिटं तरी ठेवायला सांगतेस...
ती : अरे हे नवीन आहे काही तरी...जाऊ दे ना...तुला कशाला details...बस 15 मिनिटं लक्षात ठेव आणि नंतर अंघोळीला जा...आणि हो डोक्याला साबण नको लावुस...shampoo लाव aloe-vera gel वाला...मी जरा बाहेर जाऊन येते...!
तो : जशी आपली आज्ञा...!

(डोक्यावरच्या शीतल रंगकामामुळे "तो" चा डोळा लागतो. दिड तासांनी दारावरची बेल वाजते..."तो" चा डोळा उघडतो आणि "तो" दार उघडायला जातो)

ती : (दारात चपला काढताना) अरे अजुन अंघोळ नाही केलीस...?
तो : अग या ठंडा-ठंडा cool-cool मुळे डोळा लागला...जातो आता...

("तो" अंघोळ करून आल्यावर)

ती : (रागातच त्याच्या कडे बघत)
तो : काय झालं...अग छान झालाय dye...एकदम काळेभोर....रेशम से मुलायम...
ती : आणि drawing room मधल्या भिंतीवर जो काळा सुर्य काढुन ठेवला आहेस त्याचं आता काय करायचं...तुझी अंघोळ संपेस्तोवर मी तो डाग काढायचा प्रयत्न करते आहे पण काही केल्या निघत नाहीये...
तो : (तोंडात पुटपुटत) म्हणजे रंग पक्का आहे तर...good quality it seems...
ती : अरे विनोद कसले करतोस...आता hall मधली atleast ती भिंत तरी रंगवावी लागणार...
तो : महागात पडला घरचा dye...पण मी काय म्हणतो की dye करायची गरजच काय ?? असतील तर असू द्यायचे पांढरे केस...whats the big deal ??
ती : मला नाही पटत...मला असं वाटत की जर चांगलं आणि नीत नेटकं दिसायची सोय आहे, ऐपत आहे आणि मुख्य म्हणजे इच्छा आहे तर मग का नाही...?
तो : म्हणजे जे dye करत नाही ते काय नीटनेटके नाहीत असं म्हणायचं का तुला ??
ती : मी कुठे म्हंटल असं...माझं फक्त इतकंच म्हणण आहे की जर polished दिसता येत असेल आणि ते मूर्खपणाच वाटत नसेल तर करायला काय हरकत आहे ?? हे मी फक्त dye बद्दलच बोलत नाहिये...in general personal grooming बद्दल बोलते आहे...मग त्यात माफक make-up, facial आणि हो dye देखील आला...आता तुच सांग मी dye केलं आणि तू तुझी सुतार फेणी, अकाली वयातली, बाहेर घेऊन पडलास तर लोक काय म्हणतील...अगदी त्या hair-dye मधल्या advertisement सारखं होईल...तु uncle आणि मी दीदी...(हासत)
तो : (डोळे बंद करत...fake ज्ञानस्थ मुद्रेत) तुला विवेकानंद काय म्हणाले ते ठाऊक नसेल तर मी सांगु इच्छितो...
ती : मस्करी कसली करतोयेस...सांग पटकन
तो : ते असं म्हणाले आहेत की : Character should make a person glorify not his suit or appearance. Bright clothes may make a human look good but lack of proper behavior and ethics won't make him good.
ती : व्हाटसअपानंद महाराज...तुझ्या knowledge करता मी पण एक गोष्ट सांगू का विवेकानंदाचीच...! त्यांनी असं देखील म्हंटलेलं आहे की The beauty of the living spirit shining through the human face is far more pleasurable than any amount of material beauty. त्यातला deep अर्थ जरी बाजूला ठेवला तरीही superficial अर्थ पण बरच काही सांगून जातो आणि तेच मी follow करण्याचा प्रत्यन करते...शिवाय मर्लिन मनरो माहित असेलच आपल्याला...
तो : म्हणजे काय...obviously...!!
ती : तिनं काय म्हंटल आहे...I don't mind making jokes, but I don't want to look like one. म्हणुन हे सगळं...(त्याच्या डोक्याकडे बोट दाखवत)...
तो : मान्य आहे की "दिसणं" is important पण "असणं" ही तितकंच महत्वाच नाही का...first impression is the last impression...ही माझ्या मते एक fallacy आहे...no doubt तुमच्या appearance वरून लोक तुम्हाला जवळ करतीलही पण तुमच्या appearance सारखे तुमचे विचार, आचार नसतील तर  first impression fade व्हायला वेळ लागत नाही...कितीदा हा experience येतो आपल्याला...
ती : पण that cannot be an excuse for अजागळ living...
तो : i agree...म्हणुन तर लावला नं dye madam...

(थोड्या दिवसांनी दोघंही mall मध्ये जातात)

ती : हे padicure kit घेऊ आपण आज...छान वाटलं trial
तो : (पुस्तकांच्या section मधुन हातात एक पुस्तक घेऊन) आमटेंच  "प्रकाशवाटा" घ्यायचं का...खुप दिवसांपासुन घ्यायचं होतं ...
ती : तू जर मला, तुला padicure करू देणार असशील तर...
तो : तू पण जर हे पुस्तक माझ्या सोबत वाचणार आणि discuss करणार असशील तर...
"तो" आणि "ती" एकमेकांकडे बघत : नक्की ...:-) :-)

सारंग कुसरे  

Thursday, January 5, 2017

ती आणि तो : background music...!

ती : जी कविता आता तू वाचलीस, तिच जर with background music असती तर किती मजा आली असती नं...
तो : या background music चाच तर सगळा करिश्मा आहे...rather घोळ आहे...
ती : म्हणजे...
तो : मला असं कायम वाटतं की background music मध्ये नं आपले emotions hijack करण्याचं सामर्थ्य असतं...ते specifically आपल्या मनाला संदेश देतं about the event that is occuring or about to occur...
ती : मग तर its good नं...कुठल्याही गोष्टीची सुचना किंवा पुर्वसुचना...तसंही माणसाला informed राहायला आवडत असतंच...
तो : अगदी मान्य...पण emotions प्रत्येक वेळेला hijack न होता जर हवे तसें आलेत तर त्यात आणखी मजा येते असं मला वाटतं...
ती : मला नाही पटत, मला असं वाटतं की background music ने कुठल्याही performance ला, act ला एक साज चढतो, एक mood बनतो...ज्याने गम्मत आणखी द्विगुणित होते...
तो : काही acts च्या बाबतीत हे खरंही असलं तरीही त्याचा अतिरेक आजकाल होतो आहे असं नाही का वाटत...सगळंच artificially emotional करण्याच्या नादात खरं emotion बाजुला राहतं आणि आपण background music सांगेल तिकडे फरफटले जातो...
ती : हो तसं होतंय खरं...
तो : आता साधं उदाहरणं घ्यायचं झालं तर आजकाल च्या news चं घेता येईल...आता news ही काय background music ने ऐकण्याची पाहण्याची गोष्ट आहे का...नाही...तरी पण तिथे ते घुसडुन artificially मनात हात घालण्याचा प्रयत्न होतोच की नाही...मला तर असं ही वाटतं की in future... सगळ्या newspaper सोबत एक barcode देतील आणि म्हणतील की हा scan करा आणि सगळ्या news with background music वाचा headphones लावुन...
ती : काय भन्नाट कल्पना आहे..."सकाळ" ला कळवते आजच...
तो : म्हणजे प्रत्येक गोष्टीत मनाला बाहेरचं stimulation... raw असं काहीच नाही...!!
ती : हो पण काय करणार, you cant stop it...so live with it or just ignore it...
तो : नाही गं, तो काय इतका जीवन मरणाचा प्रश्न नाहीच मुळी...just आपलं एक observation...
ती : पण जसं तु म्हणतोस, तसं रोजच्या जगण्यातले raw emotions तुला कोणते सांगता येतील जे without background music देखील मनात कालवाकालव करतात...
तो : किती आहेत की...
ती : जसे की...
तो : गणपती विसर्जन...म्हणजे apart from all ढोल-ताशे, गणपती पाण्यात सोडतात तो actual क्षण...कुठल्याही आणि कोणाच्या ही लग्नाच्या शेवटी पाठवणी चा क्षण, घर shift करताना boxes मध्ये सामान भरल्यानंतर त्या रिकाम्या घरा कडे बघताना जी कालवाकालव होते तो क्षण...अजुनही बरेच आहेत...!
ती : हो रे...तिथे background music नसतं म्हणुनच ते क्षण raw आणि pure राहतात. प्रत्येकाचे आपले...पण मग movies मधल्या background score बद्दल तर तुझा आक्षेप नको...कारण that medium demands it...!
तो : तसा तो नाही...पण background music न देता ही ती कलाकृती फक्त त्या विषयाच्या ताकदिवर लोकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचवता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे...नागराज मंजुळे च्या दोनही चित्रपटाचे शेवट...background music कुठे नको हे त्याला बरोबर कळलं...!
ती : कोणते फँड्री आणि सैराट ??
तो : तू notice केलंस का मला माहित नाही... पण दोन्ही चित्रपटाच्या शेवटी जे सांगायचं आहे ते without background music मंजुळे नी इतकं प्रभावी पणे सांगीतल आहे की ते artificially न घुसता direct मनात genuinely गेलं.
ती : पण मला एक सांग background music नसेल तर काही सोहोळ्यांचा मोहोत्सव होणारच नाही की...
तो : म्हणजे...
ती : आता लग्न-मौंजी मध्ये जर सनई नाही लागली, अभ्यंग स्नानाला सनई नाही लागली तर चुकल्या चुकल्या सारखं वाटेल नाही...माहोल नही बनेगा शायद...नाही??
तो : अगं त्याला माझा विरोध नाहीच आहे गं...ते तर हवंच...ते तर आपल्या culture मध्ये आहेच...इतकच कशाला, काम करताना ही मी concentration व्हावं म्हणुन background ला गाणी लावतो...आता तू नाही सकाळी स्वयंपाकाच्या वेळेस radio लावतं...त्यांनी एक उत्स्फुर्तता येते आणि वेळ छांन जातो...that is all right...त्यात काही दुमत नाही...माझा विरोध किंवा आक्षेप फक्त हे जे काही artificially emotional करण्याच्या नादात जो  background music चा वापर केल्या जातो त्या वर आहे...तुला आणखी एक गम्मत सांगतो...
ती : कोणती...?
तो : आजकालचे कुठलेही talk-shows / promotional shows घे...सेटवर कुठलाही emotional प्रसंग घडला की editing /  mixing team ला एकदम उधाणाच येत...की आता किती creativity दाखवू आणि किती नाही...लगेच त्याला background music ची करुण आणि artificially emotional फोडणी दिली जाते...it feels so fake...! मला तर वाटतं की असलं artificially emotional करुन तुम्ही त्या व्यक्तीच्या भावनांचा अपमान करत आहात...
ती : पण मग त्या वेळेला काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे...
तो : काहीच नाही ...शांतता...let that emotion sink in naturally...than forcefully...! मला असं वाटत ते जास्त प्रभावी ठरेल..जसं मंजुळे च ठरलं...!
ती : (हासत) मग लग्नाच्या कॅसेट मध्ये जे background ला गाणे लावतात त्या बद्दल...
तो : (वैतागलेला हासत) त्या बद्दल तर बोलू देखील नको...तो pure छळ असतो...आपल्या मंगलमय क्षणांचा tragedy कम comedy आठवण रुपी तो एक दस्तावेज असतो...creativity चा परिपाक...काय पण गाणी असतात background ला...वाहं...काय पण कलाकारी असते...धन्य अगदी धन्य होतो बघणारा...
ती : (हसतच) मग काय plain शांतता ठेवायची की काय...किती बोअर वाटेल ते...
तो : मी तसं म्हणालो आहे का...जिथे गत्यंतरच नाही background music शिवाय, तिथे निदान प्रसंगाला साजेसं, sobre music द्यावं...इतके छान instrumental tracks आहेत ते लावा नं background ला...नाही कोणी म्हंटल...पण नाही दबंग पासुन ते माहेरच्या साडी पर्यंत सगळी हौस ते कॅमेरा वाले भागवून घेतात...जणू काही त्यांनाच ती कॅसेट आयुष्यभर बघायची आहे...असो...
ती : (त्याला चिडवत) जाऊ दे रे आपल्या लग्नाची cd आपण परत format करू आणि तुला हवे ते tracks घालू background ला...एक काम कर ना तुच पुर्ण editing आणि mixing कर घरी...
तो : (दोन्ही हात जोडत) बरं...!आपल्या silver jubilee ला नक्की करू हं madam...
ती : (हासत आणि उजव्या हाताचा तळवा त्याच्या कडे दाखवत) तथास्तु....पण इतकं सगळं discuss केल्यावर आता असं खरंच वाटतय की तुझ्या त्या कवितेला background music नकोच...
तो : Exactly...कविता किती खोलवर रुजते त्या साठी background music किवा ती present करताना नकलेची / acting ची कशाला कुबडी हवीत ..असेल धमक कवितेत तर it will succeed no matter what...!
ती : बाप रे...४.३० वाजले...कळलंच नाही वेळ कसा गेला तो...चल चहा करते पटकन...

(तो उठुन पंडित विश्वमोहन भटांचं "Floating with the clouds" हा instrumental track लावतो आणि सोफ्यावर आडवा होतो)

ती : (चहा करता करता, त्याला थोडं चिडवत) अरे तुच आत्ता म्हणालास ना background music नको म्हणुन...!
तो : (सोफ्यावर पडल्या पडल्या, बंद डोळ्यानीच थोडं हासत) अग हो, पण अमृततुल्य पिण्याच्या सोहोळ्याचा मोहोत्सव करावासा वाटला ...म्हणुन...!😉😉

सारंग कुसरे