Monday, November 28, 2016

ती आणि तो : ओळख..!

तो : "च्या आयला ओळखच नाही दाखवली..."
ती : "अरे पण कोणी...!"
तो : "अग तो नाही का...शलाकाच्या लग्नात भेटला  होता...कर्वे नगर ला राहतो...चित्र-विचित्र profile pics ठेवतो तो"
ती : "कोण....रोहित.."
तो : "हं correct रोहित...रोहितच!"
ती : "अरे लक्ष नसेल त्याचं...होत असं बरेचदा..."
तो : "लक्ष नसायला काय झालं, चांगला समोरून गेला, बघुन न बघितल्यासारखा..."
ती : "पण असं करेलच का तो..."
तो : "मलाही कळत नाही...बरं हे असं याच्याच बाबतीत आहे असं नाही...हा अनुभव आजकाल इतक्या लोकांच्या बाबतीत येतो की वाटतं प्रशांत दामले नि जसं "एका लग्नाची गोष्ट" मध्ये म्हंटल तसं म्हणावं, अहो आपली जुनी ओळख आहे...काय धाडस आहे, तुम्ही ओळखच दाखवत नाही.."
ती : "जाऊ दे रे इतका त्रागा नको करू...sunday morning छान फ्रेश घालावं बरं"
तो : "अगं नाही त्रागा नाही...आता साधं आपल्या सोसायटीचं च उदाहरणं घे ना...सगळे facebook वर असे काही comments करतील...इतक्यांदा Awwwww कि काय ते म्हणतील...पण lift मधुन बाहेर येताना जर चुकून समोर कोणी ओळखीचं दिसलं कि साधं हसणार नाही की hi पण म्हणणार नाही..."
ती : "हो अरे actually तसा अनुभव मला पण हल्ली खूप येतो..."
तो : "नाही तर काय...नुसतं लक्ष नसेल, कोणत्या तरी विचारात असेल, या सबबींमागे लपायचं...आणि तरीही ओळखीचा विरळ धागा जपायचा...म्हणजे ना धड ओळखीचे ना धड तुटलेले...किंवा अनोळखी..."
ती : "पण मला एक सांग सगळं असं तू म्हणतो तसं ब्लॅक अँड व्हाईट तरी कसं असेल...everything is grey... असं कोणीतरी म्हंटलेलच आहे..."
तो : "हो मान्य पण grey हा color तसा खुप रुक्ष आणि dis-interesting वाटतो...black and white च्या तुलनेत...तुला नाही वाटत...?"
ती : "जाऊ दे रे...तू पण practice कर ओळख न दाखवायची..."
तो : "हो तसाच विचार करतोय..."
ती : "अरे बेल वाजतेय दाराची...बघ तर कोण आहे"
तो : "अगं मंग्या आला आहे...ये रे ये...क्या बात है..काय म्हणतोस..?"
मंगेश : च्या आयला काय ignore केलं आता अमित नी मला ...facebook वर तर जीवश्च कंठश्च असल्याचा आव आणतो..."
तो : जाऊ दे रे मंगेश...लक्ष नसेल त्यांच.."
ती : (त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत)😊😊😊

सारंग कुसरे

Friday, November 18, 2016

ती आणि तो : इकडे..!

"हं आता येतोय का बघ...अरे तसं नाही...या angle ने बघ..."
"हो आला आला...आता complete चेहरा आणि पास्ता पण"
"ए, बघू कसा आलाय फोटो..!"
"अगं पण तू पास्ता खा तर आधी, थंड होतोय तो"
"ते जाऊ दे रे, फोटो कसा आला आहे ते दाखव...लगेच फोटो WhatsApp, FB, Twitter, Tumblr, Instagram वर upload करायचा आहे..."
इकडे पास्ता पुर्ण थंड झाला आणि खाता खाता chef च्या नावे चार दोन शिव्या पण हासडून झाल्या, पास्ता च्या मिळमिळीत आणि कच्च्या चवे बद्दल. तो मात्र गालातल्या गालात हसत होता आणि ती हिरमुसल्या चेहऱ्याने फोटो वर किती comments आणि likes मिळाले आहेत हे पाहण्यात मग्न होती...
.
.
.
"अरे आलोय नं आता आपण तुझ्या so called 'bucket-list' वाल्या beach वर...मग enjoy करायचं सोडुन, तू तुझ्या DSLR नी सारखे फोटो कसले घेत बसला आहेस. ठेव तो कॅमेरा बाजूला आणि भीड ना लाटांशी..."
"तू थांब ग दोन मिनिटं, हा एक panoromic view हव्या त्या ISO setting वर आला की लगेच जातो समुद्रात..."
"तू आणि तुझे ते कॅमेरा settings तुझ्या आणि समुद्राच्या आड येत आहेत...कळतं आहे का मिस्टर.."
"तू हसतेस काय...असा फोटो काढणार आहे की...नंतर बघताना solid nostalgic व्हायला पाहिजे..."
"तू चालू दे तुझं...मी इथे वाळुत छान sun-set बघत बसते...झालं की मात्र लगेच जा...कारण थोड्याच वेळात अंधार होईल आणि तुझी so called मजा करायची राहून जाईल..."
इकडे sunset लगेच झाला आणि nostalgic फोटो काढून सुद्धा भिजता नाही आलं म्हणून तो काहीसा हिरमुसला. ती मात्र गालातल्या गालात हसत होती आणि तो, फोटो photoshop मध्ये कसा अजुन effective आणि nostalgic करता येईल ह्या विचारात मग्न होता...


सारंग कुसरे

लेखणी

आपण आपल्या हातून आपलं भविष्य घडवतो की so called देव आपल्या कडून ते घडवुन घेतो, हा नेहेमीचा वादाचा मुद्दा. मी आस्तिक-नास्तिक या वादात पडणार नाही. पण काही लोकांचं असं स्पष्ट मत असतं की जे काही घडतं ते आपल्या कर्मा मुळे, आपल्या परिश्रमामुळे, आपल्या चुकांमुळे, आपल्या निर्णयांमुळे. त्या मुळे जे चांगलं-वाईट आहे त्याची जवाबदारी ते स्वतः वर घेतात. या उलट काही लोकांचं असं मत असतं की आपण कितीही, काहीही केलं तरीही देवाच्या इच्छे पुढे काहिच होत नाही. बहुतेक त्यालाच नशीब असं ही म्हणता येईल. मला दोनही मतं पटतात, पण तरीही मनाचा जास्त कौल हा देवाकडेच जास्त झुकतो. मी प्रामाणिक प्रयत्नांना नाकारतो असं नाही पण, मला असं अगदी ठाम वाटत की, प्रामाणिक प्रयत्न आणि प्रचंड इच्छाशक्ती  असेल तर देव / नशीब नेहेमीच तुमच्या सोबत असतं. किंबहुना प्रचंड इच्छाशक्ती असेल तर देवच किवा नियतीच तुमच्या कडून ते घडवून घेते. त्यावेळी तुम्ही फक्त एक निमित्त मात्र उरता. पण यश मिळवल्यावर आपण  हे विसरतो आणि तत्काळ 'आपणच' किवा 'मीच' ते कसं मिळवलं हे सांगत सुटतो. त्यात नियतीचा पण हातभार होता याचा विसर आपल्याला पडतो. याच विचाराला अनुसरून हि कविता सुचलेली आहे.

लेखणी


का मज वाटे ऐसे की मीस्वतःचपळतो आहे
दिसताच दिशा अनेक मी अचूक वळतो आहे
का मज वाटे ऐसे की तपस्यामीकरता खूप
अशक्यप्राय यशाचे मग दिसते मजला रूप
का मज वाटे ऐसे की सर्व मिळवलेमीच
प्राप्तीस माझ्या कारणीभूत नाही दुसरे कुणीच
का मज नाही कळत कीमीफक्तलेखणीतयाची
कथेत लिहिल्या जाईल तेच जे येईलत्याच्यामनाशी


सारंग कुसरे