Tuesday, September 26, 2017

ती आणि तो : side-effects

ती : (भयंकर वैतागलेली, चिडलेली) सतराशे साठ वेळा सांगितलं की facebook, whatsapp मधुन डोकं बाहेर काढुन जरा घरा कडे लक्ष दे...पण नाही ते जास्त महत्वाचं आहे ना...
तो : अगं जाऊ दे आता, पुढल्यावेळेपासून नाही होणार असं...sorry
ती : हेच तू मागे देखील म्हणाला होतास...आज चांगला घरी होतास, office च कामही इतकं न्हवतं, तर मग थोडं घर आवरून ठेवावं, थोडं नीटनेटकं ठेवावं, पण नाही त्या फोन मध्ये नाही तर x-box मध्ये तोंड घालुन बसला असशील...
तो : माझ्या x-box ला काहीच म्हणायचं नाही...त्याला आज हात देखील नाही लावला...हो थोडं facebook आणि थोडं whatsapp...
ती : थोडं...???थोडं म्हणतात का ह्याला...की अगदी जगाचा विसर पडावा... अरे तुझ्या त्या facebook च्या नादापायी...सकाळ पासुन दुध freeze च्या बाहेरच आहे आणि सगळं नासलं, सकाळच्या गाद्या तशाच आहेत, दोरीवरचे कपडे देखील वाळून परत ओले झाले...तरीही तू म्हणतो थोडं....????
तो : बरं जाऊ दे न आता...किती त्रागा करशील...
ती : इतकं काय मेलं आहे त्यात कोण जाणे...
तो : नुसती entertainment आहे ती...साधी गम्मत...
ती : साधी गम्मत म्हणे...मी ही वापरते facebook आणि whatsapp पण मी वेळ ठरवुन ते वापरते...वेळेचं भान ठेवुन ते वापरते...कारण मी हे accept केलं आहे की ते एक व्यसनच आहे...त्याचे side-effects तर त्याहूनही भयंकर...
तो : व्यसन म्हणे...काहीही हं...
ती : इथेच तू चुकतो आहेस...कुठल्याही व्यसनाला आळा घालायचा असेल किंवा ते सोडवायचं असेल तर पहिले ते acknowledge तर करावं लागेल की आपण व्यसनाधीन झालो आहोत म्हणुन...
तो : अंग काहीही काय बोलतेस...
ती : मग नाही तर काय...तु त्या विषयीचे चे articles, videos बघितले नाहीस का net वर, शेकडो आहेत...
तो : (हासत) म्हणजे facebook, internet च्या अतिरेकाचे आणि व्यसना बद्दल internet वरचं वाचायचं...वाह!
ती : का ??? सिगारेट च्या पाकिटावर नसते statutory warning...??? तसंच हे पण आहे, असं समज... पण तु point miss करतो आहेस...तुला फक्त त्यातली विसंगती दिसली पण त्यातलं मर्म नाही दिसलं
तो : मला सांग कोणते असे noticeble health hazards आहेत तुझ्या या so called व्यसनांमध्ये...
ती : noticleble नाहीत म्हणून तर सगळा घोळ आहे...म्हणून आपल्याला काही झालंच नाही या भ्रमात आहेत कित्येक लोकं...
तो : noticeable म्हणजे exactly काय म्हणायचं आहे तुला...?
ती : म्हणजे ती consious level वर दिसत नाहीत...सगळं damage sub-consious level वर होतं...उदाहरणार्थ facebook किंवा whatsapp दर तिसऱ्या मिनिटाला check न केल्यास असवस्थ होणं..ह्यालाच OCD म्हणतात...Obsessive Compulsive Disorder......concentration कमी होण ....depression येण...अजून बरेच आहेत
तो : OCD बऱ्याच लोकांना बाकीच्या सवयींचा पण असू शकतो...मग फक्त facebook, whatsapp च बदनाम का?
ती : कारण जितक्या झपाट्याने लोकं या specific OCD च्या अधीन होत आहेत, तितक्या अजून कुठल्याही इतर गोष्टींच्या अधीन होत नाही आहेत म्हणुन आणि शिवाय यात age barrier पण नाही...म्हणजे या व्यसनाचे बळी लहान मुलं देखील आहेत...म्हणुन..!
तो : पण तुला नाही वाटत का की त्यात entertainment, knowledge, philosophy, आपल्या लोकांसोबत social contact सगळं आहे म्हणुन...
ती : आहे ना, पण त्याच्या किती तरी अधिक पटीने तुलना, मत्सर, show-off आणि मुख्य म्हणजे आभासी जगात वावरण्याचा फोल पणा देखील...आणि त्यांनीच हळू हळू सगळं मुसळ केरात चाललं आहे...status काय तर म्हणे "enjoying my new ray-ban sunglasses"...
तो : (हासत) तू फक्त त्याच्या negative बाजूच बघते आहेस...
ती : बरं मला knowledge, news, लोकांसोबत touch वगरे सोडुन एखादी positive गोष्ट सांग बरं...positive side-effect म्हण हवं तर...
तो : आहे न...तुला एक ठोस गोष्ट सांगतो...बऱ्याच एकट्या वृद्ध लोकांना, bedridden, घरा बाहेर न जाऊ शकणाऱ्या लोकांना या facebook, whatsapp मुळे किती आधार मिळाला आहे.विरंगुळा आणि संवाद साधल्याचं समाधान देखील,आभासी जगातून का असेना, पण मिळतं आहे इतक मात्र निश्चित.याच लोकांच्या नव नवीन ओळख्या होऊन अभिनव छंद जोपासले जाताहेत...नवीन माहितीची, सुख-दुखाची देवाण घेवाण होते आहे...उतार वयात हाही आधार त्यांना बरचं बळ देऊन जातो आहे...
ती : हे मात्र अगदी खर बोललास...याला मात्र दुमत नाही...पण माझा आक्षेप तो याच्या आहारी गेलेल्या आपल्यासारख्या लोकांवर आहे...एक मात्र निश्चित की आजच्या techno-savvy युगात facebook, whatsapp च्या लांब तर आपण राहू शकणार नाही...पण जर ते व्यसन होण्याच्या मार्गावर असेल तर त्यासाठी आपण काही तरी करू तर शकतोच न..
तो : for example...
ती : सांगते...सगळ्यात प्रथम म्हणजे...
तो : ( "ती" ला मधेच तोडत) facebook account delete करा आणि virtual suicide करा...
ती : मी असं म्हटलंय का ???? ऐकून तर घे पुर्ण...
तो : बरं बरं...sorry...बोल
ती : सगळ्यात प्रथम म्हणजे...facebook चा app आपल्या phone मधुन delete करायचा...म्हणजे त्याने उटसुट, facebook कडे हाताचा अंगठा जाणार नाही...एकदा try करून बघ...खुप fresh वाटेल काहिच दिवसात...थोडा त्रास होईल सुरवातीला...पण मग लक्षात येईल की आपला बराच वेळ वाचला आणि for some reason fresh वाटायला लागेल...कारण facebook वरच्या news feed आणि status updates दिवसातुन असंख्य वेळा वाचुन जो आपल्या sub-conscious ला शीण यायचा तो येण बंद होईल...आणि आपोपाच हा बदल आवडेल आणि ओघाने facebook चा वापर कमी होईल...आणि मुख्य म्हणजे वेळ पण वाचेल...इतर महत्वाच्या कामांकरता आणि surrounding चं भान पण राहील...
तो : हि चांगली idea आहे...म्हणजे दिवसातुन एकदा laptop वर check की important updates मिळत राहतील आणि पर्यायाने मानसिक उर्जा कमी खर्च होईल...बर अजुन काय changes ??
ती : whatsapp ला mute वर टाकुन ठेवल्यास आणि notification off करून ठेवल्यास त्या कडे देखील जास्त लक्ष जाणार नाही...जे सद्या "आला message कि check कर" या सवयीचा गुलाम झाला आहे...
तो : हे तर मी आधीच केलं आहे for all the groups...पण आता या settings पण change करून पाहतो...
ती : या दोन जरी tips सुरवातीला पाळल्यास तरीही तुला इतका बदल जाणवेल...आपण शरीराला काय पोषक आहे तेच खातो तसच मनाला देखील जे पोषक आहे तेच द्यायचं आणि तितक्याच प्रमाणात द्यायचं जितक आवश्क आहे...आणि म्हणुन हे छोटे बदल...anyways मला असं वाटत की तुला हे पटलं आहे...
तो : अग म्हणजे काय...हे काय...तुझ्याशी बोलता बोलता facebook चा app delete केला देखील...पण आता त्या नासलेल्या दुधाचा कलाकंद कर पटकन...facebook, whatsapp चा हा ही positive side-effect म्हणायला हरकत नाही...
ती : :-) :-)

सारंग कुसरे

“संवादाक्षरे” अभिवाचन @ NU Sound Radio 92 FM London – 21st July 2017

https://www.youtube.com/watch?v=VDPJOy_DUlA

पुस्तक या link वर मिळेल:


भारतातील वाचकांसाठी ही लिंक – https://www.amazon.in/dp/B072R5VDKH

अमरिकेतील वाचकांसाठी ही लिंक – https://www.amazon.com/dp/B072R5VDKH

इंग्लंड मधील वाचकांसाठी ही लिंक – https://www.amazon.co.uk/dp/B072R5VDKH

Kind Regards

Sarang

ती आणि तो : autobiography

ती : कशी वाटली सचिन ची autobiography...??
तो : fantastic...मजा आली वाचुन... मुख्य म्हणजे ते सगळं वाचताना आपल्या ही life चं revision झाल्यासारखं झालं कारण त्याच्या उमेदीच्या वयात आपणही जाणते होतो...त्या मुळे it was a pleasurable trip down the memory lane...
ती : मी पण वाचील आता नक्की...
तो : अगदी नक्की वाचं...तुला एक सांगू मला नं autobiographies jast आवडतात self-help books च्या तुलनेत...autobiography मध्ये एक authenticity असते, एक integrity असते कारण जो सांगणारा असतो तो खुद्द proof असतो त्याच्या वागण्याचा, सवयींचा...ते म्हणतात नं... direct from horses mouth... तसंच काहीसं...आणि म्हणुन ते जास्त भिडतं मनाला...
ती : पण self-help books नी पण फायदा होतोच की...
तो : होतं नं, मी नाही कुठे म्हणतो...पण बहुतेक दा तो temporary असतो...अफु च्या गोळी सारखा...गोळी चा प्रभाव असे पर्यंतच स्फूर्ती आणि आणि नंतर विस्मृती...
ती : तसं तर autobiography पण होऊ शकतं मग...
तो : हो नक्कीच पण तरीही autobiography चा परिणाम खूप खोलवर होतो आणि त्यामुळे तुमच्या वागण्या बोलण्यात नकळत फरक पडायला लागतो...जेव्हा की self-help books मुळे तो खुप प्रयत्नांती येण्याची शक्यता असते...खात्री नाहीच...
ती : तुला आज पर्यंत कोणाची autobiography सगळ्यात जास्त आवडली...
तो : असं नेमकं नाही सांगता येणार...पण प्रत्येका मध्ये काही न काही घेण्यासारखं होतं
ती : जसं की...
तो : तुला अगदी एक साधी गम्मत सांगतो...मला नं आधी injection ची खुप भीती वाटायची अगदी मोठं झाल्यावर सुद्धा...पण 11वीत असताना "माझी जन्मठेप" वाचण्याचा योग आला...त्यानंतर ती भीती अशी काही पळाली की आता त्या गोष्टीचं काही देखील वाटत नाही...त्यानंतर जितक्यांदा ही injection घ्यायची किंवा blood donation ची वेळ आली...तेव्हा तेव्हा direct सावरकरचं आठवायचे आणि वाटायचं की ते देशासाठी इतक्या हाल अपेष्ठा सोसू शकतात तर मी साधं स्वतःच्या health साठी साधी सुई ची वेदना नाही सहन करू शकत...मला माहिती आहे की ही तुलना फार हास्यास्पद आहे पण तरीही माझ्या वागण्यामध्ये कुठे तरी तर फरक पडला...
ती : हास्यास्पद कशाला...any change in the right direction is always a good change...
तो : सुधीर फडक्यांची biography असो नाही तर प्रकाश आमट्यांची... नाही तर विश्वास नागरे पाटलांची...किंवा नदाल, लान्स अर्मस्त्रोंग, तेंडूलकर , स्वामी योगानंद प्रत्येक autobiography मधून इतकी स्फूर्ती आणि विश्वास मिळतो की त्याने नवीन उत्साह येतो आणि आपल्या limits redefine झाल्या सारख्या वाटतात...
ती : पण काही biographies बघायला पण मजा येते आणि छान वाटतं... जसं की chris gardner ची...ज्यावर pursuit of happyness बनला होता किंवा...bhagat singh, sawarkar etc
तो : no doubt छान वाटतं... पण कुठे तरी authenticity compromise होण्याची भीती त्यात असते कारण picture म्हंटला की सगळी गणितं बदलतात आणि commercial liberty घेतली जाते...which is fiction... शिवाय पुस्तक वाचण्याची मजा काही औरच कारण त्यात तुम्हीच director असता आणि picture तुमच्या मनात सुरु असतो...तुमच्या imagination अनुसार...पण जेंव्हा तुम्ही actual picture बघता एखाद्या autobiography चे ते director चं visualization असतं...त्यामुळे मी तरी पुस्तक जास्त prefer करतो...
ती : हो तर अगदी खरं आहे...तरीही मला एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की कितीही पुस्तकं वाचा, किती विचार करा पण ते जो पर्यंत आचरणात आणत नाही तोपर्यंत सब झूट...
तो : १००% आणि तिथेच सगळी गोची होते...विचार मेंदू पर्यंत जाऊन उपयोग नाही...ते मेंदू पासुन आपल्या  मनावाटे अवयवांपर्यंत देखील यायला पाहिजे तरच वाचण्याचं / पाहण्याचं / ऐकण्याचं  काही तरी चीज होईल...
ती : ("तो" ला टोमणा मारत) यांच बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर health related पुष्कळ पुस्तकं वाचायची आणि ती वाचता वाचताच cake खायचा , coke प्यायचं...आणि पुस्तक वाचता वाचताच ४-२ किलो वाढवून घायचे...
तो : ("ती" ने मारलेला टोमणा आणि संभाव्य धोका ओळखत) चला माझ्या health वर गाडी घसरण्याआधी मी जरा बाहेर जाऊन येतो...एक काम करतो लाय्ब्ररीत जाऊन येतो  आणि उसेन बोल्ट ची autobiography घेऊन येतो...बरेच दिवसापासुन राहिली आहे वाचायची...
ती : शहाणा आहेस...अरे लक्ष दे health कडे...
तो : मन सशक्त असलं ना की मग पोट थोडं सुटलं तरीही चालत...fit राहण महत्वाचं...mentally आणि physically सुद्धा...
ती : पण म्हण तर बरोबर उलट सुचवते...a healthy mind resides in a healthy body...
तो : पण कुणाच्या तरी autobiography मध्ये मी असंही वाचलं की your body can stand almost anything, its your mind that have to convince...सध्या मनाला convince करण्याचं काम सुरु आहे वाचन करून...body will soon follow madam 
ती : तो शुभदिन लवकरच येवो...आणि autobiographies वाचण्याची परिणीती ठोस कृतीत होवो 
तो : तथास्तु....

सारंग कुसरे 
  

ती आणि तो : arrivals

("ती" आणि "तो" airport मधल्या parking मधुन 'Arrivals' मध्ये  "ती" च्या आई बाबांना receive करायला जाताना)

ती : parking ticket सोबत घेतलंस ?
तो : हो ग घेतलंय आणि गाडी पण lock केली...

(दोघंही पळत पळत 'Arrivals' च्या gate समोर उभे राहतात)

ती : flight land होऊन २५ मिनिटं झाली, म्हणजे border security आणि baggage reclaim ला लागणारा वेळ धरून आई बाबा पुढल्या १० मिनटात बाहेर यायला हवे...
तो : you never know...holiday season आहे गर्दी मुळे late देखील होऊ शकतं...

(आई बाबांची  वाट बघत असता, "ती" चं पुर्ण लक्ष आई बाबांकडे आणि "तो" चं लक्ष, इतर सगळ्या येणाऱ्या लोकांकडे आणि त्यांना receive करायला आलेल्यां कडे असतं. "तो" त्याचं observation करत असतो, त्यांच्या हावभावांच, त्यांचा emotions चं . त्या वरून त्याचं पुढलं बोलणं सुरु होतं)

तो : तो मुलींचा घोळका बघ...किती ओरडण...किंचाळण..आणि लगेच सेल्फी...आणि तो तिकडे बघितलास का तो मुलगा किती over-acting करतो आहे सगळ्यांसमोर..?
ती : अरे असं कस काय म्हणतोस...बऱ्याच दिवसांनी भेटला असेल कदाचित...कदाचित परत भेटू की नाही या शाश्वती नंतर भेटला असेल...
तो : पण तरीही बरेच दा PDA मध्ये तुमचे कोणते भाव आहेत या वरून ते खर की दिखावू हे लगेच लक्षात येत...
ती : पहिले PDA म्हणजे काय ते सांग...
तो : Public Display of Affection... जे india मध्ये थोडं कमी आणि पाश्चात्य देशात जरा जास्तच दिसतं... हल्ली अंधानुकरणामुळे भारतात देखील...actually आत्ता जे airport वर बघतो आहे त्याला public display of emotion म्हणायला हवं...PDE थोडक्यात...कारण PDA तसा फार मोठा विषय आहे...
ती : पण तुला ते इतकं नाटकी का वाटावं ??
तो : माहित नाही, पण मला आजकाल असं वाटायला लागलं आहे की प्रत्येक झण social life मध्ये, आपल्या कडे एक अदृश्य कॅमेरा बघतो आहे या धुंदीतच वावरत असतो...
ती : तसं ते आहेही म्हणा... आपल्या mobile च नाही का...
तो : तसं नाही ग ते फक्त selfie पुरतं... पण general वागणं देखील फार caricaturish झालं आहे...
ती : काय पण शब्द वापरतो...आता caricature हा कसला शब्द आणि त्याचा अर्थ काय??
तो : अंग caricature म्हणजे व्यंगचित्रामध्ये एखाद्या माणसाची एखादी quality exaggerate करून जे व्यंगात्मक चित्र काढतात तसं...caricature ला अजून चांगलं explain करायचं म्हणजे एखाद्या cinema मध्ये अभिनेता खूप नाट्यमय भूमिका करतो जसं generally वास्तवात कुणी वागणार नाही...comedy किंवा serious...
ती : आलं लक्षात थोडक्यात overacting...
तो : तसंच काहीसं...
ती : हो पण त्याचा इथे काय संबंध ??
तो : माझं म्हणणं इतकंच आहे की आशा सार्वजनिक ठिकाणी लोकं खुपचं overacting करतात...मला असं वाटतं की ते तुमचे फार personal moments असतात त्याचा असा public show करण्यात काय अर्थ आहे...मला नेहेमी एक विचार मनात येतो हे सगळं बघितल्यावर की जितक्या आत्मीयतेने हे PDA sorry PDE करतात तितकंच प्रेम, वात्सल्य, आधार एकांतात, जेव्हा कुणी आजूबाजूला नसतं तेव्हाही देतात का...की तेव्हा mobile, ipad मध्ये तोंड घालून आपण fb वर टाकलेल्या fotos / posts ला किती like मिळाले यात असतात...मला नेहेमी असं वाटतं की माणसाचं खरं रूप, तो त्याला कुणी बघत नाही आहे, तेव्हा तो कसा वागतो, हेच आहे...that is his true self...not when he is in public, on camera or on stage.
ती : अरे पण बरेचदा इतकं भान राहत नाही आणि emotions बाहेर निघतात... काळ, वेळ काहीच दिसत नाही...
तो : अगं खरें मनापासून असतील नं तर मग काहीच हरकत नाही...पण acting असेल तर ती लगेच लक्षात येते...
ती : आता खरी कोणती आणि acting कोणती कसं ओळखावं आणि मुख्य म्हणजे मी म्हणते इतकं लक्ष तरी का द्यायचं आणि आपलं डोकं खराब करायचं आपण...
तो : नाही ग डोकं कसलं खराब...हे आपलं मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं...आता तुला नाही तर अजून कोणाला सांगणार...अगदी हक्कानी आणि कायद्यांनी सुद्धा या जगात मी फक्त तुलाच बोअर करू शकतो आणि आपलं मन मोकळं करू शकतो...त्या गोष्टीचा मी पुरेपूर उपभोग घेतो इतकंच...("ती" ला डोळा मारतो)
ती : (घड्याळा कडे बघत) अजून कसे नाही आलेत रे आई बाबा...नक्की काही तरी घोळ झाला आहे...यांच्या बॅगा आल्या असतील ना?
तो : तू आता उगीच tension नको घेउ...मागे नाही...आपण जोशी काका काकूंना receive करायला आलो होतो तेव्हा किती उशीर झाला होता...इतकं tension घेण्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांना observe कर...आणि मजा घे...you will love it
ती : ते तूच कर...सद्या माझं सगळं लक्ष आई बाबांकडे लागलं आहे...

(तितक्यात "ती" चे आई बाबा bag trolley सोबत बाहेर येतात..."ती" आनंदाने जोरात किंचाळते, त्यांचे फोटो काढते, त्यांच्या गळ्यात पडून रडते आणि शेवटी एक pout असलेला selfie देखील काढते आणि "तो" सगळं मुसळ केरात गेलं या भावनेने, त्यांच्यात सामील होतो)☺☺

सारंग कुसरे





ती आणि तो - भित्रा

स्थळ : घर
काळ : रात्रीच्या जेवणाची
वेळ : "तो" आणि "ती" जेवताना tv बघत जेवत आहे ती

तो : (TV वर कुठला तरी travel related show बघताना) वाह काय मस्त लागत असतील नं हे मिरची पकोडे जोधपुर चे...?
ती : खाता येतील का महाराज तुम्हाला ??
तो : का असं का म्हणालीस?
ती : नाही तुला गोड जास्त आवडतं म्हणुन म्हंटल...!
तो : अग पण गोड जास्त आवडतं म्हणजे मी तिखट खातच नाही किवा तिखट मला पचतच नाही असं मुळीच नाही...
ती : अरे पण तूच नाही का नेहेमी मला स्वयंपाक कमी तिखट करायला सांगतोस...
तो : याचा अर्थ असा नाही की तुला प्रत्येकच पदार्थ कमी तिखट करायला सांगील...आता कुणी नागपूर चं सावजी कमी तिखट करा म्हंटल तर ते शक्य नाही..तसच आहे हे...जे पदार्थ तिखट खायला पाहिजे, तेज खायला पाहिजे ते तसेच चांगले लागतात provided ते tasty असतील तर...त्यात तुम्ही गोडघाशे असाल किवा एरवी कमी तिखट खात असाल म्हणुन तुम्ही ते खाऊ शकणार नाही असं मुळीच नाही...
ती : पण तू नाही का नेहेमी कमी तिखटाला support करतो...मग ??
तो : अग जे आवडेल तेच मनुष्य खाणार नाही का...आता मला normally कमी तिखट लागत असेल तर काय बिघडलं काय ? पण म्हणुन भेळ, पाणीपुरी, मिसळ हे काही कमी तिखट खात नाही मी...पण तुला एक गम्मत सांगतो...
ती : कोणती ??
तो : जे लोकं जास्त तिखट खातात त्यांना कमी तिखट खाणारे फुसके किवा अंगात धैर्य नसलेले किवा भित्रे वाटतात...मला माहित नाही तू हे experience केलं आहेस का?
ती : छे...तुझं म्हणजे काहीतरीच...
तो : अगं खरंच...जणू काही तिखट किवा तेज खाल्याने अंगी खुप धैर्य येत किवा खुप पराक्रम केल्यासारखा वाटतो...not sure पण तीखटा सोबत machoism / पराक्रम का बर relate केल्या जातं...मला आज पर्यंत कळलेलं नाही...म्हणजे पुरणपोळी किवा साखरभात खाणारा माणूस फुसका आणि जहाल तिखटाची किवा मिरच्याची चटणी खाणारा माणूस म्हणजे 'बाहुबली'...हेे कोडं माझं आजतागायत सुटलेेलं नाही...!!
ती : पण तुला असं कधी जाणवलं?
तो : बरेचदा...मला एक कळत नाही की तिखट खाणं जर इतकंच पराक्रमाचं असतं तर देवांना आपण गोडाचा नैवेद्य का दाखवतो??? दाखवा तिथे ही लसणाची चटणी, तिखट लाल रस्सा असेलेली भाजी...माझा point आहे की why is someone looked down upon based on what he choose to eat, drink? सगळं हास्यास्पद आहे...
ती : हे मात्र अगदी correct बोललास
तो : आता हेच बघ ना दारू पिणाऱ्या लोकांना दारू न पिणारे म्हणजे अगदीच केविलवाणे वाटतात...सगळ्यांना नाही...पण बऱ्याच झणांना...परत तेच logic, as if दारू पिल्याने दोन शिंग जास्त फुटतात धैर्याची...
ती : (हासत) शिंग नाही पंख फुटतात म्हण...
तो : सगळं कसं templatised करून टाकलं आहे...तिखट म्हणजे शौर्य, दारू म्हणजे धैर्य, गोड म्हणजे फुसका, सरबत किंवा कोल्ड ड्रिंक म्हणजे बच्चा... अरे अरे कीव करावी तेवढी थोडी...
ती : जाऊ दे रे तू इतकं मनाला नको लावून घेऊस
तो : नाही ग मनाला नाही...पण असा विचार येतो की खरं macho दिसण्याने, macho वागण्याने तुम्ही macho आहात हे सिद्ध होत नाही नं... ते मनात असावं लागतं...
ती : मला प्रहार चा dialouge आठवला ज्यात नाना म्हणतो की "असली ताकत याहा (हाताच्या दंडाकडे point करत) नाही याहा (डोक्याकडे point करत) होती है"
तो : exactly... confidence हा पुरण पोळीतही नाही आणि लसणाच्या चटणीतही नाही...तो तुम्ही तुमच्या मनाला कोणतं खाद्य देता त्यात आहे...
ती : चल जाऊ दे...आता काय वाढू ताटात ते सांग...
तो : वाढ थोडी गुळ तूप पोळी...
ती : भित्रा रे भित्रा ☺

(दोघंही मनमुराद हसतात)☺☺

सारंग कुसरे