Thursday, February 23, 2017

ती आणि तो : skype...!

स्थळ : skype
काळ : "तो" काही दिवसांसाठी कामानिमित्त परदेशात गेला आहे तो...
वेळ   : रात्रीची, झोपण्या अगोदर

[दिवस पहिला - सोमवार]

तो : कसा झाला दिवस ?
ती : मस्त...म्हणजे छानच...ऑफिस, झुम्बा डान्स, थोडं घर काम, संध्याकाळी थोडा tv...तुझा कसा गेला?
तो :  काही नाही...client meeting, मग call, मग जेवण परत काम, संध्याकाळी थोडं फिरणं आणि आता हॉटेल...मजा आली
ती : good...तू enjoy कर मस्त ही trip...
तो : तू पण...
ती : चल झोपते मी आता इथे खुप रात्र झाली आहे...
तो : good night..!

[दिवस दुसरा - मंगळवार]

ती : बोल काय म्हणतोस...jet lag गेला का?
तो : कसला जातोय इतक्या लवकर...आज तर meeting मध्ये फक्त घोरायचच बाकी राहिलं होतं...तू काय म्हणतेस...आज खाल्लीस का तुझी आवडती Italian dish...canteen मध्ये ??
ती : सोडते कि काय...खाल्ली न...खुप मजा आली...आता आठवडाभर तू नाहीस म्हंटल्यावर, सद्या स्वयंपाकाला तशी सुट्टीच द्यायचा विचार आहे माझा...
तो : good good...enjoy your freedom...
ती : you too...!

[दिवस तिसरा - बुधवार]

तो : आज फिरलो ऑफिस नंतर...सगळ्या touristy जागा बघितल्या...पण तुला खुप miss केलं...वाटलं तू पण तेव्हा तिथे असायला हवी होतीस...माझ्या सोबत..!
ती : no worries...there is always a next time...! दोन दिवस canteen चं खाऊन आज खुपच कंटाळा आला होता...म्हणुनच आज साधा वरण भात नेला होता office मध्ये...
तो : आणि "झुम्बा" काय म्हणतोय ??
ती : हो चाललाय नं...पण आज थोडं बोअर झालं...
तो : actually मला पण आज थोडा कंटाळाच आला होता...पण colleagues सोबत बाहेर गेलो म्हणुन थोडा mood change झाला...

[दिवस चौथा - गुरुवार]

तो : अग रडतेस काय अशी...weekend ला आपण सोबत असू...dont worry...
ती : (डोळे पुसत) अरे तसं नाही रे...पण आज खुपच एकट एकट वाटलं म्हणुन...घरी आलं की घरी कुणी नाही...सगळ भकास...आई बाबांशी phone वर बोलण झालं पण तरीही मनाची हुर हुर काही थांबली नाही...anyways आता रडल्यावर थोडं बर वाटतय...!
तो : इतकं एकट वाटत होतं तर...तर गाडी काढुन सरळ तुझ्या मैत्रिणींच्या अड्ड्यावर का नाही गेलीस...किवा...
ती : तू आता मला उपदेश नको करू please, i am ok now...माझं फक्त ऐकुन घे...that is more than enough for now...!
 (नंतर खुप वेळ बोलुन झाल्यावर आणि "तो" ने "ती" ची मनधरणी केल्यावर call संपतो)

[दिवस पाचवा - शुक्रवार]

ती : सगळ सामान नीट आवरून ठेव...नाहीतर प्रत्येक हॉटेल ला आपण नेहेमीच आठवण म्हणुन काही तरी देत आला आहातच आज पर्यंत...
तो : अग आवरतो ग सगळ...काळजी नको करू...तुझ्यासाठी काय आणू ?
ती : तुच सुखरूप ये...तेच gift असेल माझ्यासाठी...

(शनिवारी दुपारी घरी आल्यावर, "तो" फ्रेश होतो आणि "ती" च्या सोबत चहा घेतो)

ती : झालं, आता तुझ्या office मध्ये सांगुन टाक बरं की आता मी कुठे जाणार नाही, द्यायचं असेल काम तर इथेच द्या...
तो : असं म्हणुन होतं का कधी...company काय माझ्या आजोबांची नाही...ते म्हणतील ते तर ऐकावच लागेल...
ती : तरीही...पुढल्या वेळेला विचारलं तर नाही म्हणुन सांग...बघ तर काय म्हणतात ते...
तो : आणि आपले promotion चे chances कमी करून घेऊ...बरं आजच तर आलो आहे...आता परत कशाला हा topic...
ती : अरे सगळ घर disturb होतं, routine disturb होतं...
तो : company इतका विचार करायला लागली तर झालंच मग...पण मी काय म्हणतो की असे छोटे छोटे breaks हवेतच...तितकीच नात्यातील गोडी वाढते...एकमेकांना miss केल्यावर...
ती : (फक्त हसते) पण आता लगेच कुठली trip नाही नं...
तो : अग नाही ग...लोड ना ले कुडिये...!

(सोमवार सकाळ "तो" च्या office मध्ये)

"तो" चा boss : येत्या गुरुवारीच निघावं लागेल...there is no other option...
"तो" : पण sir परवाच तर मी आलो आहे...आता लगेच परत...
"तो" चा boss : i know, पण ते कामही तुझच आहे...i mean तुझ्याशिवाय कोणाला कस जमणार...जाऊन ये फक्त चारच दिवस जायचं आहे...no long term...

("तो" office मधुन "ती" ला तिच्या office number वर phone लावतो)

तो : एक problem झाला आहे...त्याच काय आहे की...
ती : (त्याचा tone आणि overall temperament ओळखतं) केव्हा जायचं आहे...
तो : गुरुवारी...
ती : (पलीकडून जोरात phone आपटते)
तो : हेलो..अग पण ऐक तर खर...फक्त चार दिवस...तुझ freedom, झुम्बा....आपल्यातील गोडी वाढेल अजून थोडी...हेलो हेलो...😁😁

सारंग कुसरे 

Thursday, February 9, 2017

ती आणि तो : common sense, hobby..!

ती : (कुत्सितपणे) वाह किती छान आणि विचारपुर्वक आणतोस रे भाजी तू...खरच
तो : ("ती" चा नुर आणि सुर ओळखत) काय गुन्हा झाला आहे ते सांगा लवकर आता...
ती : अरे कितीदा संगीतलं की टमाट्याच्या वर, पालेभाजीच्या वर किवा कोथिंबिरीच्या वर कधीही बाकीच्या जड वस्तू टाकुन आणू नये...त्या नाजुक भाज्या दबतात, खराब होतात, पिचतात...
तो : आता होते कधी कधी चुक...चालायचच..
ती : (त्याच्या हातात चेंदा-मेंदा झालेला tomato देत) कधी कधी !!!...नेहेमीच...
तो : ( तो चेंदा-मेंदा झालेला tomato dust-bin मध्ये टाकत) नेहमी वगरे नाही हं...इतकी छोटी चुक झाली तर लगेच इतकं sarcastic बोलायची काहिच गरज नाही...
ती : मला तर आजकाल असं वाटू लागलं आहे न की, काही basic व्यवहार ज्ञानाच्या, common sense च्या गोष्टी शाळेच्या अभ्यासक्रमातच include करायला हव्या...actually होतं कस आहे, ज्या गोष्टी आपण शाळेत शिकतो त्या सगळ्या शाळेच्या, कॉलेजच्या  वेशी देखील ओलांडत नाहीत आपल्यासोबत  आणि फक्त एक कागद घेऊन शाळेतुन, कॉलेज मधुन आपण बाहेर पडतो आणि ते सुद्धा फक्त job साठी, secure future साठी but not necessarily for better and informed living...what i call as "wisdom" living...
तो : तू तर अगदी सुतावरून स्वर्ग गाठलास...कुठे हे माझ्या मुर्खपणामुळे पिचलेले टमाटे आणि कुठे "wisdom" living...
ती : i know की मी तसं करतेय पण या सगळ्याचा तुमच्या overall learning शी, the way you were brought up at school and home शी खुप संबध आहे....
तो : अग पण "टमाट्याच्या वर, पालेभाजीच्या वर किवा कोथिंबिरीच्या वर कधीही बाकीच्या जड वस्तू टाकुन आणू नये" याचा तुमच्या upbringing पेक्षा तुमच्या common sense शी जास्त संबंध आहे...
ती : तेच न...Common sense is not so common...आणि तो कितीही उपजत असला तरीही तो शिकवला जाऊ शकतो असं मला वाटत...
तो : हे म्हणजे अतीच झालं जरा..
ती : का ?? leadership शिकवता येऊ शकते, negotiation skills शिकवता येऊ शकतात, इतरही बरेच soft skills शिकवता येऊ शकतात तर मग common sense का नाही ??
तो : Because "common sense" हा तारतंम्याचा भाग आहे, जो experience नी येतो...
ती : एकदम correct आणि experience कशानी येतो...ती गोष्ट करून पाहिल्यामुळे...correct ??
तो : (गोंधळुन) so what are you trying to say here?
ती : की शाळांमधुन, कॉलेज मधुन एक तास, period हा common sense चा असावा...applied learning चा असावा...अगदी छोटी छोटी कामं, actual व्यवहारातील challenges, त्या त्या वयानुसार सांगायचे, rather शिकवायचे...त्याचे role-plays घ्यायचे...फक्त त्याच्या परीक्षा नाही घ्यायच्या...जेणेकरून that knowledge earning will be सहज...not forceful
तो : म्हणजे त्या वपू काळेंच्या गोष्ठी सारखच होईल हे तर...
ती : कोणती रे...??
तो : आता नाव नाही आठवत...पण त्यात नाही का ते भांडायचे classes घेतात ती...
ती : अच्छा...आठवली...पण तरीही नाव नाही आठवत...हो तसच समज हव तर...
तो : पण तुला खरच वाटत का की शाळा - कॉलेज मध्ये "Common Sense" नावाचा एक period घेतला तर सगळे अगदी व्यवहार ज्ञानाने परिपूर्ण होऊन निघतील...
ती : जरीही पुर्ण नाही तरिही पुढले बरेच से खाच खळगे टळतील इतक मात्र निश्तिच...शिवाय अस try करायला काय हरकत आहे...
तो: आता शाळेचा आणि overall बदलाचा विषय निघालाच आहे तर मलाही एक गोष्ट इतकी प्रकर्षाने जाणवते ती पण implement करायला पाहिजे शाळांनी...
ती : कुठली??
तो : "Common Sense" व्यतिरिक्त एक अजुन period असायला हवा..."Hobby" period...छंद...
ती : त्याने काय होईल ?? तसही "extra co-curricular activities" नावानी एक period असतोच शाळेत...
तो : पण त्यात काही dedicated effort नसतात तुमची hobby develop करण्यासाठी...तो फक्त एक time-pass period...म्हणुन सगळे त्या कडे बघतात...म्हणजे ज्याला वाटेल त्याने गाणे म्हणा...joke सांगा...या पलीकडे त्या period मध्ये काहीच जास्त होत नाही...i think that is just waste of time...
ती : पण याने confidence build-up व्हायला मदत होते अस नाही का वाटत ??
तो : होते...पण फार more serious effort is required आणि हा period अगदी college पर्यंत असावा...म्हणजे प्रत्येकाला आपली नव्याने ओळख व्हायला मदत होईल...
ती : पण ती तशीही होतेच काही दिवसांनी...
तो : पण बऱ्याच लोकांना ती खुप उशिराने होते...कारण त्या बद्दल कधी कोणी गांभीर्याने विचारच करत नाही...म्हणुन तर कित्येक लोकांना आजही मी जर विचारल की तुमची hobby काय आहे तर they dont have a specific answer in mind...
ती : correct...म्हणुन तर "Johnny Johnny yes papa", "Shivaji - Aurangzeb", "H2S04", "Sin Theta, Cos Theta", "Analytical Instrumentation", "Theory of machines", "Economics" , "Accounting", "Sales techniques" सोबतच जर मी म्हणते तसं "Common Sense" आणि तु म्हणतो तसं "Hobby" चा पण एक period असेल तर शाळा- कॉलेज मधुन निघणारं product हे अधिक सुज्ञ आणि प्रगल्भ असेल...
तो : बेशक...!!

सारंग कुसरे 

Thursday, February 2, 2017

ती आणि तो : अनमोल data...!!

स्थळ  : एका famous restaurant चा waiting lounge
काळ  : आजचा
वेळ    : रात्री ८.३०

ती : (फोनवर gmail बघत असताना) अरेच्चा मी परवाच google मध्ये ladies purse बद्दल शोधत होते आणि आज बघते तर मला इतक्या mails आल्या आहेत about ladies purse...सगळ्या promotional आहेत...पण असं कस काय...म्हणजे मी काय शोधते, काय पाहते net वर...हे कुणी track करतंय का...??
तो : म्हणजे काय...कोणत्या जगात वावरते आहेस...google आणि facebook चा main business हा तुमचा data collect करणे, analyze करणे आणि त्या अनुसार तुम्हाला ads पाठवणे / दाखवणे  हाच तर आहे ...आणि हे illegal देखील नाही कारण google आणि facebook use करण्या अगोदर आपणच त्यांची privacy policy accept करतो आणि मगच आपण त्यांच्या services वापरतो...
ती : म्हणजे.??
तो : facebook आणि google वर तुमची प्रत्येक activity...जसं की तुम्ही काय search करता, काय comment करता...ह्या सगळ्या activity कडे त्याचं लक्ष असत...i mean ते या सगळ्या data ला analyse करतात...segregate करतात आणि तुमचे interests त्यातुन शोधुन काढतात आणि मग त्या दृष्टीने तुमच्या वर advertisement किवा तत्सम गोष्टींचा भडीमार करतात...हा सगळ्या ad services घ्यायला companies पण उत्सुक असतात कारण त्यांना ready database मिळतो about their prospective clients, customers....आणि जर तू त्या एखाद्या promotional content किंवा ad वर click केलंस की facebook किंवा google ला त्याचे पैसे मिळतात...भले ही तु तो product नंतर विकत नाही घेतलास तरी...आणि घेतलास तर आणखी, depends upon their agreement..!
ती : बाप रे हे तर dangerous आहे...म्हणजे मी साध काही comment केलं facebook वर...किवा कुठला video बघितला youtube वर तर माझे interest लगेच जगा समोर येतात...
तो : इतक ही घाबरून जाण्यासारख काही नाही...सगळं जगच तुमचं predictive behavior जाणुन घेण्यात उत्सुक आहे... तुमचे interest ... तुमचे likes/dislikes जेणेकरून तुमच्या आवडीचे products ते तुमच्या पर्यंत market करू शकतील...तसा हा विषय खुप मोठा आहे पण data भोवती सगळं जग फिरत आहे सद्या, हे वास्तव आहे... आणि main म्हणजे तो data त्यांना आपण फुकट देतो आणि त्यातून ते करोडो कमावतात...
ती : पण मग whats app मध्ये तर असं काही नाही ना..कि तिथे ही...??
तो : perfect प्रश्न विचारलास...actually whats app जेव्हा सुरु झालं होत, तेव्हा त्याचं main source of income त्यांची subscription fee होती... कारण whats app ज्यांनी बनवलं त्यांना ह्यात advertisements बिलकुल नको होत्या...त्यांना तो फक्त तो communication platform म्हणुनच हवा होता...त्यामुळे ते सुरवातीला हा app free देत होते एक वर्षांकरता आणि नंतर nominal fee war renewal...
ती : पण whatsapp तर free for lifetime आहे आता...
तो : हो ... facebook नी acquire केल्यावर त्यांनी ते free केलं...
ती : पण त्यात facebook चा काय फायदा... कारण तश्याही whatsapp वर आजही ads नाहीतच...मग ??
तो : facebook चा दुहेरी डाव होता whatsapp ला acquire करण्यात एक तर त्याचं स्वतःच्या messenger ची competition कमी करायची होती आणि दुसरं महत्वाच म्हणजे facebook ला परत एक नवीन source मिळणार होता data चा ... म्हणजे ...अजुन माहिती... अजुन behavioral trends... अजुन personal choices...म्हणजे अजुन business आणि पर्यायाने अजुन पैसा...
ती : म्हणजे आपण जे whatsapp मध्ये chat करतो ती पण personal नाही...पण facebook ला आपल्या chat विषयी कळेलच कसं...??
तो : सांगतो...तुमचा जर facebook चा login id हा तुमचा phone नंबर असेल...किंवा तुम्ही जर facebook मध्ये तुमचा phone number share केला असेल तर...आणि तुम्ही जर whatsapp पण त्याच नंबर वरून operate करत असाल तर facebook तुमच्या chat चा data use करून तुमचे interests, तुमच्या आवडी जाणुन घेऊन तुम्हाला तश्या ads दाखवेल तुमच्या facebook page वर...
ती : म्हणजे facebook indirectly whatsapp च्या data वरून आपली कमाई करून घेत आहे...
तो : अगदी correct... तू जर त्यांची privacy policy वाचलीस तर तिथे clear cut हे सगळं mention केलं आहे.
ती : म्हणजे तुम्ही जसे online वागाल तसंच तुम्हाला online जग दिसेल...किंबहुना google आणि facebook तसंच तुम्हाला दाखवतील...
तो : मला तर बरेच दा हे जाणवतं की internet पण ढोबळमनाने सृष्टीचे सगळे नियम follow करतं...
ती : म्हणजे ??
तो : बघ ना... आपण नेहमी काय म्हणतो की जे आपल्या मनात असतं तसंच आपल्याला जग दिसतं...law of attraction काय सांगतो की ज्या गोष्टींचा तुम्ही अगदी मनापासुन विचार करता ती तुम्हाला मिळतेच...तसंच जेव्हा आपण online , internet वर जे ही काही बोलतो, वागतो तसंच जग आपल्याला दाखवलं जातं...आपल्या interest च्या गोष्टी recommend केल्या जातात... म्हणजे law of attraction प्रमाणे ज्या गोष्टींविषयी आपण online विचार , आचार करतो त्याच गोष्टी आपल्याला online दिसतात देखील... म्हणुन offline प्रमाणे आपलं online वर्तनही खुप शिस्तबद्ध आणि controlled असावं असं मला वाटतं...
ती : correct...! (वाट बघुन, वैतागुन) ए पण किती उशीर झाला बघ ना...अजुनही आपला नंबर आला नाही...
तो : तुला अजून एक गम्मत बघायची आहे data ची आणि आजच्या technology ची...

("तो" twitter वर आपला राग व्यक्त करतो आणि त्या message मध्ये त्या restaurant चं नाव hashtag (#) करतो. थोड्याच वेळात त्या restaurant चा employee "तो" आणि "ती" ला शोधत येतो sorry म्हणतो आणि एक free meal coupon देतो आणि नंबर लवकर येण्याची हमी पण देतो )

ती : अरे असं कसं काय झालं ?
तो : अग मी आत्ता त्यांच्या नावे शंख केला twitter वर...त्यांच्या restaurant चं नाव tag केलं..
ती : हो पण त्यांना कसं कळलं आणि त्याने कसं काय ओळखलं आपल्याला..
तो : त्याचं काय आहे, त्यांच्या social media marketing team ला कळलं की मी त्यांच्या विषयी काही तरी वाईट पोस्ट केलं आहे...कारण मी हॅशटॅग वापरलं होतं आणि आपला waiting नंबर पण टाकला होता message मध्ये...आणि आपल्या waiting नंबर समोर आपलं नाव आहेच की...मी असं tag केल्या मुळे त्यांना लगेच notification मिळालं आणि त्यांनी थोडं damage repair व्हावं म्हणुन ही चांगली वागणुक दिली... म्हणजे आता chances आहेत की मी परत twitter वर जाऊन त्यांच्या विषयी काही तरी चांगलं बोलण्याची...
ती : बाप रे...इतकं सगळं होऊ शकतं आपल्या online behavior मुळे...कमाल आहे...
तो : कमाल data ची आहे सगळी...
ती : hmmm...! (गोंधळुन)

(इतक्यात त्यांचा नंबर येतो आणि ते आभासी जगाची discussions सोडून भौतिक जगातल्या restaurant मध्ये जेवायला जातात)


सारंग कुसरे

[Note : हॅशटॅग (#) केलेली कुठलंही गोष्ट...तो शब्द हा अख्या जगासाठी open असतो...म्हणजे जर मी #puranpoli केलं आणि असंच  tagging जगात अजून बरेच झणांनी केलं आणि नंतर जर मी #puranpoli असं search केलं तर मला #puranpoli असेलेले सगळे messages दिसतील...आणि  हे hash tagging खुप popular झालं आणि online झटपट पसरलं  तर यालाच trending देखील म्हणतात]