Wednesday, December 2, 2015

Mind the gap...!

ही कविता London च्या tube ने प्रवास करतांना सुचली. London ला प्रत्येक स्टेशन वर tube थांबली की 'Mind the gap' अशी एक announcement होते. ती gap generally train आणि platform च्या gap बद्दल असते. लोकांनी त्या gap बद्दल थोडी सावधानता बाळगावी हा त्यात ला हेतू. त्या आशयाचे posters आणि billboards देखील सगळीकडे दिसतात. 'Mind the gap' हा वाक्प्रचार तसा London मध्ये खुप लोकप्रिय आहे. बऱ्याच श्या T-shirts, Caps वर देखील हे लिहिलेले आढळते. त्याच 'Mind the gap' चा अजुन एक पैलू या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Mind the gap...!


कुठे चेहऱ्यावर लोन
कुठे कानी फोन
कुठे डोळ्यात झोप
कुठे हृदयी कोप
कुणी समाधिस्त शांत
कुणी गर्दितला एकांत
कुठे हास्य बाळाचे
कुठे व्रण कोण्या काळचे
डबातल्या गर्दित देवाचे सगळेच चाप
म्हणुन तर चढण्याआधी म्हणत नसतिल “Mind the gap...!”



सारंग कुसरे 

वर्ख

या कवितेला तशी introduction ची काही गरज नाही. ही कविता त्या माणसाची कहाणी आहे जो आता दुखाच्या ही पलिकडे गेलेला आहे. Actually असे काही लोकं रोजच्या जगण्यात आपल्या डोळ्याला दिसतीलच असं काही नाही. पण कधी ओळखी वाढुन माणसं आपलं मन मोकळं करायला लागले की मग अंतरंगातलं जेव्हा खरं बाहेर येतं, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा आवाका कळतो आणि त्या व्यक्तीच्या हस्ण्यामागे किती आणि काय काय दडलंय ते कळतं. ही कविता कोण्या एका व्यक्तीविषयी नसुन ती त्या state-of-mind बद्दल आहे. असे बरेच से लोकं आपल्या अवती भवती वावरत असतात आपल्या अजाणतेपणी, एक भेदू न शकणारा वर्ख लावुन.

वर्ख


थेंबात गारवा जरी थेंबात इंद्रधनू नाही
लाख लक्तरे विणली पण उरली तनु काही
दूर त्या ढगातुन पाऊस लांब गेला
हिरवळीच्या पात्यावरती उरला वाफेचा शेला
रानातील वाट मोकळी जायची स्वप्नातील गावा
रानच उठले पेटुन कानी भेसुर पावा
बैरागी आता ओढतो माळ अशांत गंगातिरी
दुखण्याला हासण्याचा लावतो वर्ख सोनेरी


सारंग कुसरे

बोल अन मौन

असा एक general समज आहे आपल्यात की खुप बोलणारे लोकं generally एक तर पाचकळ, पांचट, अक्कल्शुन्य किवा तद्धन मुर्ख असतात. आणि त्या उलट खुप कमी बोलणारे म्हणजे so-called विद्वान, विचारी, हुशार असतात. नाही विचार करून बोलायला आपली काही ना नाही in-fact कितिही बोललं तरीही ते विचार करूनच असलं पाहिजे यात काही वाद नाही. पण overall जर बघायला गेलं तर मौनाला भाषेपेक्षा / बोलण्यापेक्षा जास्तच महत्व दिलं जातं, जास्त प्रशस्त समजलं जातं. नाही, मौनाचं श्रेष्टत्वं कुणीही नाकारत नाही पण फक्त त्याच्या वापराबद्दल आणि त्याचा आसरा घेऊन शहाणपणाचं पांघरूण ओढ्ण्याबद्दल आक्षेप आहे. त्याच विषयावरची ही कविता आहे.

बोल अन मौन

मूर्ख एकची करतो बडबड
व्यर्थ लोकांची चाले धडपड
कोण मूर्ख अन कोण शहाणा
मूर्खपणाला नसतो बहाणा
मौनाचे वौंशी शहाणेच असतात
असे मानणारे हमखास फसतात
टोचू शकते बोल अन मौन
दोनीही वापरावे सांभाळून



सारंग कुसरे