Wednesday, April 26, 2017

ती आणि तो : focus

तो : (संध्याकाळी office मधून घरी आल्यावर) बस झालं...आता सुरूच करतो accounting चा अभ्यास उद्यापासून...classes ची सगळी माहिती, timings, fees, location सगळं माहिती करून झालं आहे आज नेट वर...
ती : एकदम...काय झालं महाराज??
तो : खुप worked out झाल्याचं जाणवतं आहे हल्ली..."stressed" you know...कारण मला त्यातलं नीट कळत नाही म्हणुन आणि तरीही तो माझ्या job चा एक भाग आहे म्हणून...
ती : नुसतं आरंभशूर होऊ नकोस म्हणजे झालं...
तो : कधी तरी motivate करत जा...मी काही तरी चांगलाच पण केला आहे...
ती : अरे हो...छानच आहे ...फक्त मागच्या बऱ्याच experiences वरून तुला फक्त सावध केलं...माझा पुर्ण पाठिंबा आहे तुझ्या "पणाला"...(गालातल्या गालात मिश्किल पणे हसत)
तो : thanks हं, अगदी मानापासून...(रागात नाटकी हसत)
ती : actually माहिती आहे का problem कुठे आहे...तू असे बरेच पण मागे पण केले पण त्या पणात प्राण येईस्तोवर ते गतप्राण झाले...focus missing आहे कुठे तरी...आणि त्यांनी माहिती आहे का होतंय काय...तुझा फक्त jack होतो आहे...
तो : "jack" म्हणजे ??
ती : jack of all, king of none...
तो : असे ना का...सद्या जग "jack" चंच आहे...
ती : हा तुझा भ्रम आहे...जग jacks चं कधीच न्हवतं...
तो : सगळ्या गोष्टीतलं थोडं थोडं आलं की एक security असते मनामध्ये...
ती : पण कुठल्यातरी एका गोष्टीतलं खोलात ही यायला हवं नं...आणि मला असं वाटतं की it all boils down to की तुमच्या strengths काय आहेत आणि weaknesses काय आहेत...
तो : सविस्तर सांग...
ती : मला माझा आधीच्या कंपनीतला boss म्हणायचा की you should always manage your weakness and focus on your strengths...
तो : पण जर रोजचा job हा weakness असेल आणि आपली hobby ही strength असेल तर...
ती : हरकत नाही...प्रत्येकालाच आपल्या आवडीचं काम मिळेलच असं नाही आणि प्रत्येकालाच आवडीच्या कामातून पैसा मिळेलच असंही नाही...
तो : मग समतोल साधायचा कसा...?
ती : तेच जे मी आधी म्हणाले...manage your weakness and invest in your strengths... असं न करता जर आपण पुर्ण वेळ आपल्या weaknesses चा विचार करत बसलो आणि त्या सुधारण्याच्या मागे लागलो तर त्या आपण आत्मसात करू देखील पण त्यात खूप कष्ट पडतील आणि शिवाय त्या process मध्ये आपण top ला जाऊच याची शाश्वती कमी कारण आपण ज्या weakness सुधारण्याच्या मागे लागलो आहोत त्या कुणाच्या तरी strengths आहेत...ज्यात ते लीलया प्राविण्य मिळवतील...म्हणजे weaknesses च्या मागे जास्त लागण्याने आणि strengths कडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही mediocre होऊन बसण्याची शक्यता जास्त आहे.... आणि that is the main issue...
तो : पण मग आपल्या strengths ओळखायच्या कश्या...?
ती : actually ते सगळ्यात सोपं आहे...एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं त्यात...?
तो : कोणत्या..?
ती : what makes you happy... ? बस या गोष्टीचे उत्तर अगदी प्रामाणिक पणे दिले की जे उत्तर येईल... that is your strength...
तो : पण मला जर गायला आवडतं असेल आणि माझा job हा bank clerk चा असेल तर...मला आर्थिक प्रगतिकरता तरी माझ्या weaknesses कडे लक्ष द्यावच लागेल...किंबहुना माझ्या strengths पेक्षा...
ती : तोच तर समतोल साधायचा आहे जर आपण आपल्या आवडत्या profession मध्ये नसू तर...तिथे दोन options आहेत एक म्हणजे आपल्या knowledge अनुसार आपण आपल्या job मध्ये किती प्रगती करू शकू याचा अंदाज घेणे आणि तो जर सगळ्या दृष्टीने पटत असेल तर समाधानी राहून आपल्या आनंदाचा पाठपुरावा करणे...म्हणजेच weakness manage करणे आणि strength कडे लक्ष देऊन त्यावर focus करणे आणि मुख्य म्हणजे आनंदी राहणे...जे सगळ्याचं फलित आहे...नाही तर दुसरा option म्हणजे आवडत्या कामा मधेच job करणे आणि त्यातुन जे income, stability मिळेल त्यात समाधानी राहणे...हे दोनच options आहेत...!
तो : पटलं मला, म्हणजे एक ना धड भारंभार चिंध्या करण्या पेक्षा आवडीच्या ठिकाणी सगळा जोर लावुन आयुष्याचं सार्थक करणे...मग ती strength एखादी hobby असो, एखादा उद्योग असो नाही तर एखादी कला असो...
ती : बाप रे तू तर एकदम आधायत्मिक झालास...पण जे काही बोललास ते अगदी correct... entrepreneurs देखील हाच विचार करून ते त्यांच्या strengths चं capitalize करतात...
तो : बरोबर बोललीस...चल मी हात पाय धुतो...आपण पटापट जेवायला बसू...खूप भूक लागली आहे...

("तो" fresh होऊन येतो आणि TV लावतो, "ती" जेवणासाठी पानं घेते)

तो : (channel change करता करता एकदम आनंदाने आणि उत्साहाने बोलतो) क्या बात है !!! रणबीर चा "तमाशा" लागला आहे...आपण जे आत्ता सगळं बोलत होतो तेच या ही picture मध्ये अगदी subtle पद्धतीने सांगितल आहे...खूपच motivating picture आहे तो...
ती : हो का...चल तोच बघू मग आत्ता...so that हा thought अजून जास्त खोलवर रुजेल...
तो : जी हुजूर...!!!

सारंग कुसरे