Wednesday, December 2, 2015

Mind the gap...!

ही कविता London च्या tube ने प्रवास करतांना सुचली. London ला प्रत्येक स्टेशन वर tube थांबली की 'Mind the gap' अशी एक announcement होते. ती gap generally train आणि platform च्या gap बद्दल असते. लोकांनी त्या gap बद्दल थोडी सावधानता बाळगावी हा त्यात ला हेतू. त्या आशयाचे posters आणि billboards देखील सगळीकडे दिसतात. 'Mind the gap' हा वाक्प्रचार तसा London मध्ये खुप लोकप्रिय आहे. बऱ्याच श्या T-shirts, Caps वर देखील हे लिहिलेले आढळते. त्याच 'Mind the gap' चा अजुन एक पैलू या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Mind the gap...!


कुठे चेहऱ्यावर लोन
कुठे कानी फोन
कुठे डोळ्यात झोप
कुठे हृदयी कोप
कुणी समाधिस्त शांत
कुणी गर्दितला एकांत
कुठे हास्य बाळाचे
कुठे व्रण कोण्या काळचे
डबातल्या गर्दित देवाचे सगळेच चाप
म्हणुन तर चढण्याआधी म्हणत नसतिल “Mind the gap...!”



सारंग कुसरे 

वर्ख

या कवितेला तशी introduction ची काही गरज नाही. ही कविता त्या माणसाची कहाणी आहे जो आता दुखाच्या ही पलिकडे गेलेला आहे. Actually असे काही लोकं रोजच्या जगण्यात आपल्या डोळ्याला दिसतीलच असं काही नाही. पण कधी ओळखी वाढुन माणसं आपलं मन मोकळं करायला लागले की मग अंतरंगातलं जेव्हा खरं बाहेर येतं, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा आवाका कळतो आणि त्या व्यक्तीच्या हस्ण्यामागे किती आणि काय काय दडलंय ते कळतं. ही कविता कोण्या एका व्यक्तीविषयी नसुन ती त्या state-of-mind बद्दल आहे. असे बरेच से लोकं आपल्या अवती भवती वावरत असतात आपल्या अजाणतेपणी, एक भेदू न शकणारा वर्ख लावुन.

वर्ख


थेंबात गारवा जरी थेंबात इंद्रधनू नाही
लाख लक्तरे विणली पण उरली तनु काही
दूर त्या ढगातुन पाऊस लांब गेला
हिरवळीच्या पात्यावरती उरला वाफेचा शेला
रानातील वाट मोकळी जायची स्वप्नातील गावा
रानच उठले पेटुन कानी भेसुर पावा
बैरागी आता ओढतो माळ अशांत गंगातिरी
दुखण्याला हासण्याचा लावतो वर्ख सोनेरी


सारंग कुसरे

बोल अन मौन

असा एक general समज आहे आपल्यात की खुप बोलणारे लोकं generally एक तर पाचकळ, पांचट, अक्कल्शुन्य किवा तद्धन मुर्ख असतात. आणि त्या उलट खुप कमी बोलणारे म्हणजे so-called विद्वान, विचारी, हुशार असतात. नाही विचार करून बोलायला आपली काही ना नाही in-fact कितिही बोललं तरीही ते विचार करूनच असलं पाहिजे यात काही वाद नाही. पण overall जर बघायला गेलं तर मौनाला भाषेपेक्षा / बोलण्यापेक्षा जास्तच महत्व दिलं जातं, जास्त प्रशस्त समजलं जातं. नाही, मौनाचं श्रेष्टत्वं कुणीही नाकारत नाही पण फक्त त्याच्या वापराबद्दल आणि त्याचा आसरा घेऊन शहाणपणाचं पांघरूण ओढ्ण्याबद्दल आक्षेप आहे. त्याच विषयावरची ही कविता आहे.

बोल अन मौन

मूर्ख एकची करतो बडबड
व्यर्थ लोकांची चाले धडपड
कोण मूर्ख अन कोण शहाणा
मूर्खपणाला नसतो बहाणा
मौनाचे वौंशी शहाणेच असतात
असे मानणारे हमखास फसतात
टोचू शकते बोल अन मौन
दोनीही वापरावे सांभाळून



सारंग कुसरे  

Monday, November 23, 2015

हत्ती आणि माहुत

Meditation हा एक असा प्रकार आहे की तो मला अजुन तरी 0.1 percent देखिल जमलेला नाही. To be really honest, प्रयत्न भरपुर केले आहे आधी...अजुनही करतो आहे कधी कधी. त्या बद्दल चे वाचन पण केले (Paul Brunton, बाबा रामदेव आणि इतर). अनेक जाणकार लोकांशी discussions पण केले पण तरीही त्याची किल्ली काही हाती लागली नाही. ती तशी इतक्या सहजा-सहजी हाती लागणार देखील नाही कारण ती विद्या चं तितकी patiently आणि determination नि आत्मसात करावी लागते. त्या मार्गावर आहे खरा पण उजेड कधी पडेल याची काही कल्पना नाही अजुन. Mediation चाच एक प्रकार म्हणजे माळ ओढणे. ते ही करून पाहिलं पण अजुन काही यश नाही. पण एक मात्र खरं की, अगदी छानचं, fresh वाटलं जितक्यांदा ही ते केलं तितक्यांदा. मात्र या सगळ्या वाचण्याच्या, discussions चा, थोड्या practice चं एक byproduct निघालं आणि ते म्हणजे ही कविता.

ही कविता म्हणजे ध्यान-धारणेला लागलेल्या माणसाची journey आहे, सुरवातीपासून तो समाधिस्त अवस्थेला पोच्ल्यापर्यंतची. कवितेचं नाव हत्ती आणि माहुत. इथे हत्ती म्हणजे आपलं मन आणि माहुत म्हणजे आपण स्वतः. जसं माहुत हत्तीच्या कानाला स्पर्श करून हत्तीला control करतो, guide करतो, त्याच प्रमाणे आपण आपल्या मनाला ध्यान-धारणेच्या वाटेत guide करू शकतो. ती वाट सुरवातीला खुप कठीण आणि impossible वाटेल पण जर तो momentum कायम ठेऊन जर पुढे जात राहिलो तर मात्र नंतर नंतर कमी प्रयत्नात देखील त्या समाधिस्त शांततेत जाता येऊ शकतं. या कवितेत 108 चा जो reference आहे तो माळे मध्ये 108 मणी असतात त्याचा आहे. इतक्या प्रस्तावनेनंतर आता कविताच present करतो आणि आशा करतो की माझं  ही कधी तरी चौपन व्हायच्या आत स्तिरतेचं कुलुप उघडेल...प्रयत्न सुरु आहेतच...बघु!

हत्ती आणि माहुत


एकशे आठ तर झाले पण अचूक नेम काही लागला नाही
आणि माहुताच्या मनाप्रमाणे गज काही वागला नाही
शुन्यातल्या स्थिरतेची वाट काही सोपी नाही
येईल काबुत आज उद्या गज काही इतका कोपी नाही
प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळते
हळू हळू का होईना पण गजास माहुताची भाषा कळते
आताशा तर चौपन व्हायच्या आताच स्थिरतेचे कुलुप उगडते
अन कर्णस्पर्ष होता देखील गजास माहुताची भाषा कळते

सारंग कुसरे

Friday, November 20, 2015

फिनिक्स

बरेचदा असं होतं की हवा असलेला क्षण हातातुन निसटुन जातो आणि मागे राहतो तो केवळ पश्चाताप. तो क्षण निघुन गेल्याचं तर दुखः असतच पण त्याहुनही तो क्षण आपण आपल्या हळवेपणामुळे, रागीटपणामुळे (त्या situation ला defeat झाल्यामुळे, give-up केल्यामुळे), अती विचार करण्याच्या वृत्ती मुळे गमावला याचं जास्त दुःख होत राहतं. तो क्षण परत यावा असं मनोमन वाटत राहतं पण आता त्याला गत्यंतर नसतं कारण तो क्षण, ती वेळ, तो सोहळा परत येणारं नसतं [मृगजळाची वाफ - मृगजळ (इच्छा), वाफ (इच्छा पूर्ण न होणं)]. आणि मग आपला रोख सगळं देवाकडे वळतो. त्याला शिव्या घालण्यात, आरोपी ठरवण्यात आपण आपला त्रागा करून घेतो. याच आशयाची ही कविता आहे. Hope so, तुम्हाला आवडेल.

फिनिक्स


हक्काच्या वेळेची राख-रांगोळी
बहुतेक दैवाचीच इच्छा पांगळी
फिनिक्स झेपवावा त्या राखेतुन
चमत्कार घडावा वाटे आतुन
मनोमन जरीही हि इच्छा असते
दृष्टिस मृगजळाची वाफ दिसते
दगडातल्या देवावर आता दगडच घालावा
भुसभुशीत मातीबद्दल जाब विचारावा

सारंग कुसरे

अंतर

Mostly सोबत प्रवास करताना तसं पाहता दोघांतल अंतर कमी व्हायला हवं. पण जिथे मनं जुळलेली किवा नीट सांभाळलेली नसली की कदाचित सोबत प्रवास करून उलट अंतर वाढल्याचं चित्र दिसतं. अंतर वाढतंय असं कळत असुन सुद्धा जेव्हाते नंतर ठिक होईल किवा ते वाढलेलंच नाही या आविर्भावात जेव्हा माणसं जगायला लागतात तेव्हा खरा त्रास सुरु होतो असं मला वाटतं. आणि मग जे सुखी असण्याचं सोंग ओढलेलं असतं ते खरं व्हावं याच आशेवर पुढला प्रवास सुरु राहतो.पण टाळी जशी एका हाताने वाजत नाही त्याच प्रमाणे जर प्रवास करणारे दोघंही जर प्रयत्नशील असतील तर चित्र बदलायला वेळ लागत नाही. पण जेव्हा ती फक्त एकाचीच गरज होऊन बसते तेव्हा मात्र दुसऱ्याची फक्त फरफटआयुष्भर. नाहीसगळं झुगारून देऊन मुक्ती ही मिळवू शकते एखादी व्यक्ती पण तसं जर नाही केलं तर मात्र फक्त निव्वळ आशेवर दिवस ढकलले जातात. दिवसाचे आठवडे आणि आठवड्याचे वर्ष. जे स्वप्नातलं सत्य असतं ते शेवट पर्यंतरेल्वे चे रूळ जसे एकमेकाला दिसतात पण न भेटता समांतर राहताततसं फक्त विचारात दिसतं पण भेटत नाही. अशा परिस्तिथीत एक विशिष्ट वेळेनंतर मग कळून चुकतं की बहुतेक आता सगळं सुधारण्यापलीकडे आहे आणि आहे ते (कटू) सत्य मान्य करण्यापलीकडे हाती काहीही उरत नाही. याच आशयाची एक कविता सुचली होती काही दिवसापुर्वी.

टीप - हा स्वानुभव नसुन सभोवतालचे निरीक्षण आहे.

अंतर

अंतर वाढले प्रवास करता
सोंग ओढले नेहेमिच स्मरता
सोंगाचे सत्यात रूपांतर होण्या
केल्या अगणित अनंत विनवण्या        
सत्य राहिले नेहमी समांतर
वाटायचे भेटेल कधीतरी नंतर
कोरडी कदाचित राहील पाटी
कथा माझीच की ही जगराहाटी??


सारंग कुसरे 

Wednesday, November 18, 2015

तारतम्य

तारतम्याच्या यादीत दिवसागणिक वाढ होतेच आहे. तारतम्य म्हणजे experience म्हणा किवा हुशारी (wisdom) म्हणा किवा judgement म्हणा. पण आयुष्याच्या कोणत्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा किवा घ्यायचा नाही आणि तो निर्णय घेणे अथवा न घेणे हे योग्य की अयोग्य  हे त्या निर्णय घेतानाच्या issue वर अवलंबून आहे. जर तो issue किवा ती situation आपण आधी फेस केलेली असेल तर आपण त्या given situation मध्ये so called तारतम्याने वागू शकतो किवा वागू शकण्याची शक्यता आहे. पण जर तो issue किवा ती situation आपल्या साठी सर्वतोपरी नवीन असेल, आपण त्या बद्दल पुर्णपणे अनभिज्ञ असू तर मग तारतम्य (wisdom) , specific to that situation, म्हणजे काय  असा प्रश्न पडू शकतो. अशा परिस्थितीत घेतलेला निर्णय हा सर्वतोपरी fluke असू शकतो किवा gut-feel वर घेतलेला एक चांस असू शकतो किवा दुसऱ्याच्या अनुभवावर आधारित देखील असू शकतो. पण जर का तो दुसऱ्याच्या अनुभवावर आधारित असेल तर तिथे तुमचं तारतम्य तुम्ही वापरलं असं म्हणू शकत नाही कारण तुम्ही दुसऱ्याचा ready-made निर्णय घेत आहात. तुमची हुशारी इतकीच की तुम्ही दुसऱ्याचा experience, निर्णय जसा च्या तसा copy केला. आणि त्यात काही वावगं आहे असं मी म्हणत नाही. पण मग याचाच अर्थ तारतम्याचा आणि वयाचा तसं पाहता काही संबंध नाही कारण तुम्ही कितीही मोठे झालात वयाने पण जर तुम्ही situations जर कमी handle केल्या असतील (तुमच्या वयाच्या मनाने) तर मग तुमच्या कडे तारतम्य देखील कमी असेल कदाचित. मी कदाचित या करता म्हणतो आहे कारण जे काही असेल ते फार थोडं स्वतःच आणि बराचसं उसनं असेल बहुदा. म्हणजेच तारतम्य ही फार relative गोष्ट आहे. त्याचा वयाशी, तुम्ही स्त्री-पुरुष असण्याशी किवा तुमच्या धर्माशी तसा सबंध नाही. ज्याच्या कडे ते ज्या गोष्टींसाठी आहे तो त्याचा खरा मालक आहे. तारतम्य share करता येईल पण ते त्याच intensity नि दुसऱ्या पर्यंत पोहोचेल याची काही guarantee नाही.  म्हणजेच तुम्ही कोणाला तारतम्याने वागायचे सल्ले दिले किवा तसं दटावलं तरीही ते behavior त्याच्या तारतम्याच्या यादीत आधीच असायला हवं तरच तो so called तारतम्याने वागू शकेल, नाही तर तुम्हाला ते त्याला सांगावं लागेल, share करावं लागेल. म्हणुनच मला असं वाटत की कुणाला ही तारतम्याने वागायचा सल्ला देण्या अगोदर एकदा just विचार करून बघायला हवा की ते त्या कडे आहे का किवा नाही. आणि ते त्याच्या वयावरून तर नक्कीच judge करायची चुक करू नये.

However इतकं सगळं analysis-paralysis करायचं कारण एकच की तारतम्य, माझ्या मते, ही स्वतःच्या experiences नी develop करण्याचं एक soft-skill आहे.आणि ते चुकेचे निर्णय किवा ठेच लागत मिळवलं की चं जास्त दीर्घ काळ टिकतं आणि उपयोगी पडतं असं माझं मत आहे आणि experience देखील. याच आशयाची एक कविता सुचली होती मागे, ती खाली दिलेली आहे. Hope so, तुम्हाला ती आवडेल.

तारतम्य


व्याख्या बहुदा बदलायला हवी
जागाच नवीन शोधायला हवी
सूर्य दिसेलही कदाचित नव्या जागेवरून
मग वाटणारही नाही कि जावे मागे फिरून
आणि जर दिसलाच सूर्यास्त तर मात्र संचित समजावे
मार्गातला एक खडक लंघून मार्गस्त व्हावे
पण कुठे बदलावी व्याख्या हे नाही तितके सौम्य
चुकलेल्या व्याख्या भोगल्यावर जे येते ते तारतम्य…!


सारंग कुसरे

Tuesday, November 17, 2015

वचक

नमस्कार...!

बऱ्याच दिवसांनी परत लिहिण्याचा हुरूप आलेला आहे. ब्लॉग काढुन तसा बराच काळ लोटून गेला पण कधी अपडेट करणं होत न्हवतं. (तसा माझा आधीच एक ब्लॉग आहे wordpress वर (http://criticinme.wordpress.com), पण तो मुख्यत्वे reviews साठी सुरु केलेला होता. नंतर त्यात कविता पण पोस्ट करू लागलो. कालांतराने ते पण काही औंशी कमी झाले. पण तो पण ब्लॉग परत revive करायचा आहे. असो. सध्या या ब्लॉग विषयी बोलू. ) आता चांगलं कारण मिळालं आहे परत लिखाण करायला. नुकतच कविता रेकॉर्ड करून YouTube वर पोस्ट करायचं एक नवीन काम हाती घेतल आहे. आणि मुख्य म्हणजे ते करण्यात मजा देखील खुप येते आहे. तर हा ब्लॉग पुनरोज्जीवीत करण्याचं मुख्य कारण म्हणजे, या ब्लॉग वर काही कवितांचे किस्से, रसग्रहण किवां कविता सुचायच्या मागची कहाणी मी इथे सांगणार आहे. प्लान असा आहे की कविता YouTube वर पोस्ट करायची आणि त्या बद्दल या ब्लॉग वर लिहायचं. तर येणारी पुढली कविता YouTube वर आहे , "वचक".

ही कविता मला मी लंडन ला होतो त्या वेळी tube (लंडनची लोकल)  मध्ये सुचलेली आहे. त्या वेळी ऑफिस च्या टेन्शन मुळे म्हणा किवा ऑफिस मध्ये कुणीतरी काही तरी म्हण्ल्या मुळे म्हणा पण खुप उदास वाटत होतं आणि सारखे डोळे पाणावत होते. त्या वेळी खरं तर मला माझा राग देखील आला होता मी असल्या फालतू गोष्टींना महत्व देतो आहे याचा. त्या वेळी अगदी आपसुक tube च्या प्रवासात ही कविता सुचली आणि थोडं बर वाटलं. डोळ्यातल्या पाण्यावरच्या वचकाबद्दल ही कविता हे सुचवते की अगदी कोणाही साठी (म्हणजे कोणत्याही ऐऱ्या- गैऱ्या साठी) डोळ्यातले अमुल्य अश्रू निघू नयेत. आपले अश्रू कुणाच्या नासक्या बोलण्यावर अवलंबुन नसावेत, असं ही कविता सांगते. आपले अश्रू थोडे शहाणे, थोडे mature आणि बरेच से tough व्हावे आणि ते फक्त जिथे रास्त आहेत तिथेच निघावे असं मला या कवितेतून सुचवायचं आहे. आशा आहे आपल्याला कविता आवडेल.

वचक


पाण्यावर वचक हा बसायलाच हवा
येण्या प्रलय खडा टाकल्यावर नवा
एरवी कसे निश्चल असते उबदार उन्हात
दाटून आले नभ कि मग दिसते प्रतीबीम्बात
तीच तर असते वेळ अन तोच तो क्षण
म्हणायचे असते तेव्हाबा मना दगड बन
लाटांवर लाटा धडकतात किनारी
दगडाने तळ्यात घाव घालता जिव्हारी
खरतर दगडाची पात्रता ओळखून मगच प्रलय यायला हवा
पाण्यावर वचक हा खरोखरी बसायला हवा….!


सारंग कुसरे