Wednesday, December 2, 2015

वर्ख

या कवितेला तशी introduction ची काही गरज नाही. ही कविता त्या माणसाची कहाणी आहे जो आता दुखाच्या ही पलिकडे गेलेला आहे. Actually असे काही लोकं रोजच्या जगण्यात आपल्या डोळ्याला दिसतीलच असं काही नाही. पण कधी ओळखी वाढुन माणसं आपलं मन मोकळं करायला लागले की मग अंतरंगातलं जेव्हा खरं बाहेर येतं, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा आवाका कळतो आणि त्या व्यक्तीच्या हस्ण्यामागे किती आणि काय काय दडलंय ते कळतं. ही कविता कोण्या एका व्यक्तीविषयी नसुन ती त्या state-of-mind बद्दल आहे. असे बरेच से लोकं आपल्या अवती भवती वावरत असतात आपल्या अजाणतेपणी, एक भेदू न शकणारा वर्ख लावुन.

वर्ख


थेंबात गारवा जरी थेंबात इंद्रधनू नाही
लाख लक्तरे विणली पण उरली तनु काही
दूर त्या ढगातुन पाऊस लांब गेला
हिरवळीच्या पात्यावरती उरला वाफेचा शेला
रानातील वाट मोकळी जायची स्वप्नातील गावा
रानच उठले पेटुन कानी भेसुर पावा
बैरागी आता ओढतो माळ अशांत गंगातिरी
दुखण्याला हासण्याचा लावतो वर्ख सोनेरी


सारंग कुसरे

No comments:

Post a Comment