Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Friday, November 18, 2016

लेखणी

आपण आपल्या हातून आपलं भविष्य घडवतो की so called देव आपल्या कडून ते घडवुन घेतो, हा नेहेमीचा वादाचा मुद्दा. मी आस्तिक-नास्तिक या वादात पडणार नाही. पण काही लोकांचं असं स्पष्ट मत असतं की जे काही घडतं ते आपल्या कर्मा मुळे, आपल्या परिश्रमामुळे, आपल्या चुकांमुळे, आपल्या निर्णयांमुळे. त्या मुळे जे चांगलं-वाईट आहे त्याची जवाबदारी ते स्वतः वर घेतात. या उलट काही लोकांचं असं मत असतं की आपण कितीही, काहीही केलं तरीही देवाच्या इच्छे पुढे काहिच होत नाही. बहुतेक त्यालाच नशीब असं ही म्हणता येईल. मला दोनही मतं पटतात, पण तरीही मनाचा जास्त कौल हा देवाकडेच जास्त झुकतो. मी प्रामाणिक प्रयत्नांना नाकारतो असं नाही पण, मला असं अगदी ठाम वाटत की, प्रामाणिक प्रयत्न आणि प्रचंड इच्छाशक्ती  असेल तर देव / नशीब नेहेमीच तुमच्या सोबत असतं. किंबहुना प्रचंड इच्छाशक्ती असेल तर देवच किवा नियतीच तुमच्या कडून ते घडवून घेते. त्यावेळी तुम्ही फक्त एक निमित्त मात्र उरता. पण यश मिळवल्यावर आपण  हे विसरतो आणि तत्काळ 'आपणच' किवा 'मीच' ते कसं मिळवलं हे सांगत सुटतो. त्यात नियतीचा पण हातभार होता याचा विसर आपल्याला पडतो. याच विचाराला अनुसरून हि कविता सुचलेली आहे.

लेखणी


का मज वाटे ऐसे की मीस्वतःचपळतो आहे
दिसताच दिशा अनेक मी अचूक वळतो आहे
का मज वाटे ऐसे की तपस्यामीकरता खूप
अशक्यप्राय यशाचे मग दिसते मजला रूप
का मज वाटे ऐसे की सर्व मिळवलेमीच
प्राप्तीस माझ्या कारणीभूत नाही दुसरे कुणीच
का मज नाही कळत कीमीफक्तलेखणीतयाची
कथेत लिहिल्या जाईल तेच जे येईलत्याच्यामनाशी


सारंग कुसरे

Wednesday, December 2, 2015

Mind the gap...!

ही कविता London च्या tube ने प्रवास करतांना सुचली. London ला प्रत्येक स्टेशन वर tube थांबली की 'Mind the gap' अशी एक announcement होते. ती gap generally train आणि platform च्या gap बद्दल असते. लोकांनी त्या gap बद्दल थोडी सावधानता बाळगावी हा त्यात ला हेतू. त्या आशयाचे posters आणि billboards देखील सगळीकडे दिसतात. 'Mind the gap' हा वाक्प्रचार तसा London मध्ये खुप लोकप्रिय आहे. बऱ्याच श्या T-shirts, Caps वर देखील हे लिहिलेले आढळते. त्याच 'Mind the gap' चा अजुन एक पैलू या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Mind the gap...!


कुठे चेहऱ्यावर लोन
कुठे कानी फोन
कुठे डोळ्यात झोप
कुठे हृदयी कोप
कुणी समाधिस्त शांत
कुणी गर्दितला एकांत
कुठे हास्य बाळाचे
कुठे व्रण कोण्या काळचे
डबातल्या गर्दित देवाचे सगळेच चाप
म्हणुन तर चढण्याआधी म्हणत नसतिल “Mind the gap...!”



सारंग कुसरे 

बोल अन मौन

असा एक general समज आहे आपल्यात की खुप बोलणारे लोकं generally एक तर पाचकळ, पांचट, अक्कल्शुन्य किवा तद्धन मुर्ख असतात. आणि त्या उलट खुप कमी बोलणारे म्हणजे so-called विद्वान, विचारी, हुशार असतात. नाही विचार करून बोलायला आपली काही ना नाही in-fact कितिही बोललं तरीही ते विचार करूनच असलं पाहिजे यात काही वाद नाही. पण overall जर बघायला गेलं तर मौनाला भाषेपेक्षा / बोलण्यापेक्षा जास्तच महत्व दिलं जातं, जास्त प्रशस्त समजलं जातं. नाही, मौनाचं श्रेष्टत्वं कुणीही नाकारत नाही पण फक्त त्याच्या वापराबद्दल आणि त्याचा आसरा घेऊन शहाणपणाचं पांघरूण ओढ्ण्याबद्दल आक्षेप आहे. त्याच विषयावरची ही कविता आहे.

बोल अन मौन

मूर्ख एकची करतो बडबड
व्यर्थ लोकांची चाले धडपड
कोण मूर्ख अन कोण शहाणा
मूर्खपणाला नसतो बहाणा
मौनाचे वौंशी शहाणेच असतात
असे मानणारे हमखास फसतात
टोचू शकते बोल अन मौन
दोनीही वापरावे सांभाळून



सारंग कुसरे  

Monday, November 23, 2015

हत्ती आणि माहुत

Meditation हा एक असा प्रकार आहे की तो मला अजुन तरी 0.1 percent देखिल जमलेला नाही. To be really honest, प्रयत्न भरपुर केले आहे आधी...अजुनही करतो आहे कधी कधी. त्या बद्दल चे वाचन पण केले (Paul Brunton, बाबा रामदेव आणि इतर). अनेक जाणकार लोकांशी discussions पण केले पण तरीही त्याची किल्ली काही हाती लागली नाही. ती तशी इतक्या सहजा-सहजी हाती लागणार देखील नाही कारण ती विद्या चं तितकी patiently आणि determination नि आत्मसात करावी लागते. त्या मार्गावर आहे खरा पण उजेड कधी पडेल याची काही कल्पना नाही अजुन. Mediation चाच एक प्रकार म्हणजे माळ ओढणे. ते ही करून पाहिलं पण अजुन काही यश नाही. पण एक मात्र खरं की, अगदी छानचं, fresh वाटलं जितक्यांदा ही ते केलं तितक्यांदा. मात्र या सगळ्या वाचण्याच्या, discussions चा, थोड्या practice चं एक byproduct निघालं आणि ते म्हणजे ही कविता.

ही कविता म्हणजे ध्यान-धारणेला लागलेल्या माणसाची journey आहे, सुरवातीपासून तो समाधिस्त अवस्थेला पोच्ल्यापर्यंतची. कवितेचं नाव हत्ती आणि माहुत. इथे हत्ती म्हणजे आपलं मन आणि माहुत म्हणजे आपण स्वतः. जसं माहुत हत्तीच्या कानाला स्पर्श करून हत्तीला control करतो, guide करतो, त्याच प्रमाणे आपण आपल्या मनाला ध्यान-धारणेच्या वाटेत guide करू शकतो. ती वाट सुरवातीला खुप कठीण आणि impossible वाटेल पण जर तो momentum कायम ठेऊन जर पुढे जात राहिलो तर मात्र नंतर नंतर कमी प्रयत्नात देखील त्या समाधिस्त शांततेत जाता येऊ शकतं. या कवितेत 108 चा जो reference आहे तो माळे मध्ये 108 मणी असतात त्याचा आहे. इतक्या प्रस्तावनेनंतर आता कविताच present करतो आणि आशा करतो की माझं  ही कधी तरी चौपन व्हायच्या आत स्तिरतेचं कुलुप उघडेल...प्रयत्न सुरु आहेतच...बघु!

हत्ती आणि माहुत


एकशे आठ तर झाले पण अचूक नेम काही लागला नाही
आणि माहुताच्या मनाप्रमाणे गज काही वागला नाही
शुन्यातल्या स्थिरतेची वाट काही सोपी नाही
येईल काबुत आज उद्या गज काही इतका कोपी नाही
प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळते
हळू हळू का होईना पण गजास माहुताची भाषा कळते
आताशा तर चौपन व्हायच्या आताच स्थिरतेचे कुलुप उगडते
अन कर्णस्पर्ष होता देखील गजास माहुताची भाषा कळते

सारंग कुसरे

Friday, November 20, 2015

फिनिक्स

बरेचदा असं होतं की हवा असलेला क्षण हातातुन निसटुन जातो आणि मागे राहतो तो केवळ पश्चाताप. तो क्षण निघुन गेल्याचं तर दुखः असतच पण त्याहुनही तो क्षण आपण आपल्या हळवेपणामुळे, रागीटपणामुळे (त्या situation ला defeat झाल्यामुळे, give-up केल्यामुळे), अती विचार करण्याच्या वृत्ती मुळे गमावला याचं जास्त दुःख होत राहतं. तो क्षण परत यावा असं मनोमन वाटत राहतं पण आता त्याला गत्यंतर नसतं कारण तो क्षण, ती वेळ, तो सोहळा परत येणारं नसतं [मृगजळाची वाफ - मृगजळ (इच्छा), वाफ (इच्छा पूर्ण न होणं)]. आणि मग आपला रोख सगळं देवाकडे वळतो. त्याला शिव्या घालण्यात, आरोपी ठरवण्यात आपण आपला त्रागा करून घेतो. याच आशयाची ही कविता आहे. Hope so, तुम्हाला आवडेल.

फिनिक्स


हक्काच्या वेळेची राख-रांगोळी
बहुतेक दैवाचीच इच्छा पांगळी
फिनिक्स झेपवावा त्या राखेतुन
चमत्कार घडावा वाटे आतुन
मनोमन जरीही हि इच्छा असते
दृष्टिस मृगजळाची वाफ दिसते
दगडातल्या देवावर आता दगडच घालावा
भुसभुशीत मातीबद्दल जाब विचारावा

सारंग कुसरे

अंतर

Mostly सोबत प्रवास करताना तसं पाहता दोघांतल अंतर कमी व्हायला हवं. पण जिथे मनं जुळलेली किवा नीट सांभाळलेली नसली की कदाचित सोबत प्रवास करून उलट अंतर वाढल्याचं चित्र दिसतं. अंतर वाढतंय असं कळत असुन सुद्धा जेव्हाते नंतर ठिक होईल किवा ते वाढलेलंच नाही या आविर्भावात जेव्हा माणसं जगायला लागतात तेव्हा खरा त्रास सुरु होतो असं मला वाटतं. आणि मग जे सुखी असण्याचं सोंग ओढलेलं असतं ते खरं व्हावं याच आशेवर पुढला प्रवास सुरु राहतो.पण टाळी जशी एका हाताने वाजत नाही त्याच प्रमाणे जर प्रवास करणारे दोघंही जर प्रयत्नशील असतील तर चित्र बदलायला वेळ लागत नाही. पण जेव्हा ती फक्त एकाचीच गरज होऊन बसते तेव्हा मात्र दुसऱ्याची फक्त फरफटआयुष्भर. नाहीसगळं झुगारून देऊन मुक्ती ही मिळवू शकते एखादी व्यक्ती पण तसं जर नाही केलं तर मात्र फक्त निव्वळ आशेवर दिवस ढकलले जातात. दिवसाचे आठवडे आणि आठवड्याचे वर्ष. जे स्वप्नातलं सत्य असतं ते शेवट पर्यंतरेल्वे चे रूळ जसे एकमेकाला दिसतात पण न भेटता समांतर राहताततसं फक्त विचारात दिसतं पण भेटत नाही. अशा परिस्तिथीत एक विशिष्ट वेळेनंतर मग कळून चुकतं की बहुतेक आता सगळं सुधारण्यापलीकडे आहे आणि आहे ते (कटू) सत्य मान्य करण्यापलीकडे हाती काहीही उरत नाही. याच आशयाची एक कविता सुचली होती काही दिवसापुर्वी.

टीप - हा स्वानुभव नसुन सभोवतालचे निरीक्षण आहे.

अंतर

अंतर वाढले प्रवास करता
सोंग ओढले नेहेमिच स्मरता
सोंगाचे सत्यात रूपांतर होण्या
केल्या अगणित अनंत विनवण्या        
सत्य राहिले नेहमी समांतर
वाटायचे भेटेल कधीतरी नंतर
कोरडी कदाचित राहील पाटी
कथा माझीच की ही जगराहाटी??


सारंग कुसरे 

Tuesday, November 17, 2015

वचक

नमस्कार...!

बऱ्याच दिवसांनी परत लिहिण्याचा हुरूप आलेला आहे. ब्लॉग काढुन तसा बराच काळ लोटून गेला पण कधी अपडेट करणं होत न्हवतं. (तसा माझा आधीच एक ब्लॉग आहे wordpress वर (http://criticinme.wordpress.com), पण तो मुख्यत्वे reviews साठी सुरु केलेला होता. नंतर त्यात कविता पण पोस्ट करू लागलो. कालांतराने ते पण काही औंशी कमी झाले. पण तो पण ब्लॉग परत revive करायचा आहे. असो. सध्या या ब्लॉग विषयी बोलू. ) आता चांगलं कारण मिळालं आहे परत लिखाण करायला. नुकतच कविता रेकॉर्ड करून YouTube वर पोस्ट करायचं एक नवीन काम हाती घेतल आहे. आणि मुख्य म्हणजे ते करण्यात मजा देखील खुप येते आहे. तर हा ब्लॉग पुनरोज्जीवीत करण्याचं मुख्य कारण म्हणजे, या ब्लॉग वर काही कवितांचे किस्से, रसग्रहण किवां कविता सुचायच्या मागची कहाणी मी इथे सांगणार आहे. प्लान असा आहे की कविता YouTube वर पोस्ट करायची आणि त्या बद्दल या ब्लॉग वर लिहायचं. तर येणारी पुढली कविता YouTube वर आहे , "वचक".

ही कविता मला मी लंडन ला होतो त्या वेळी tube (लंडनची लोकल)  मध्ये सुचलेली आहे. त्या वेळी ऑफिस च्या टेन्शन मुळे म्हणा किवा ऑफिस मध्ये कुणीतरी काही तरी म्हण्ल्या मुळे म्हणा पण खुप उदास वाटत होतं आणि सारखे डोळे पाणावत होते. त्या वेळी खरं तर मला माझा राग देखील आला होता मी असल्या फालतू गोष्टींना महत्व देतो आहे याचा. त्या वेळी अगदी आपसुक tube च्या प्रवासात ही कविता सुचली आणि थोडं बर वाटलं. डोळ्यातल्या पाण्यावरच्या वचकाबद्दल ही कविता हे सुचवते की अगदी कोणाही साठी (म्हणजे कोणत्याही ऐऱ्या- गैऱ्या साठी) डोळ्यातले अमुल्य अश्रू निघू नयेत. आपले अश्रू कुणाच्या नासक्या बोलण्यावर अवलंबुन नसावेत, असं ही कविता सांगते. आपले अश्रू थोडे शहाणे, थोडे mature आणि बरेच से tough व्हावे आणि ते फक्त जिथे रास्त आहेत तिथेच निघावे असं मला या कवितेतून सुचवायचं आहे. आशा आहे आपल्याला कविता आवडेल.

वचक


पाण्यावर वचक हा बसायलाच हवा
येण्या प्रलय खडा टाकल्यावर नवा
एरवी कसे निश्चल असते उबदार उन्हात
दाटून आले नभ कि मग दिसते प्रतीबीम्बात
तीच तर असते वेळ अन तोच तो क्षण
म्हणायचे असते तेव्हाबा मना दगड बन
लाटांवर लाटा धडकतात किनारी
दगडाने तळ्यात घाव घालता जिव्हारी
खरतर दगडाची पात्रता ओळखून मगच प्रलय यायला हवा
पाण्यावर वचक हा खरोखरी बसायला हवा….!


सारंग कुसरे