Thursday, February 23, 2017

ती आणि तो : skype...!

स्थळ : skype
काळ : "तो" काही दिवसांसाठी कामानिमित्त परदेशात गेला आहे तो...
वेळ   : रात्रीची, झोपण्या अगोदर

[दिवस पहिला - सोमवार]

तो : कसा झाला दिवस ?
ती : मस्त...म्हणजे छानच...ऑफिस, झुम्बा डान्स, थोडं घर काम, संध्याकाळी थोडा tv...तुझा कसा गेला?
तो :  काही नाही...client meeting, मग call, मग जेवण परत काम, संध्याकाळी थोडं फिरणं आणि आता हॉटेल...मजा आली
ती : good...तू enjoy कर मस्त ही trip...
तो : तू पण...
ती : चल झोपते मी आता इथे खुप रात्र झाली आहे...
तो : good night..!

[दिवस दुसरा - मंगळवार]

ती : बोल काय म्हणतोस...jet lag गेला का?
तो : कसला जातोय इतक्या लवकर...आज तर meeting मध्ये फक्त घोरायचच बाकी राहिलं होतं...तू काय म्हणतेस...आज खाल्लीस का तुझी आवडती Italian dish...canteen मध्ये ??
ती : सोडते कि काय...खाल्ली न...खुप मजा आली...आता आठवडाभर तू नाहीस म्हंटल्यावर, सद्या स्वयंपाकाला तशी सुट्टीच द्यायचा विचार आहे माझा...
तो : good good...enjoy your freedom...
ती : you too...!

[दिवस तिसरा - बुधवार]

तो : आज फिरलो ऑफिस नंतर...सगळ्या touristy जागा बघितल्या...पण तुला खुप miss केलं...वाटलं तू पण तेव्हा तिथे असायला हवी होतीस...माझ्या सोबत..!
ती : no worries...there is always a next time...! दोन दिवस canteen चं खाऊन आज खुपच कंटाळा आला होता...म्हणुनच आज साधा वरण भात नेला होता office मध्ये...
तो : आणि "झुम्बा" काय म्हणतोय ??
ती : हो चाललाय नं...पण आज थोडं बोअर झालं...
तो : actually मला पण आज थोडा कंटाळाच आला होता...पण colleagues सोबत बाहेर गेलो म्हणुन थोडा mood change झाला...

[दिवस चौथा - गुरुवार]

तो : अग रडतेस काय अशी...weekend ला आपण सोबत असू...dont worry...
ती : (डोळे पुसत) अरे तसं नाही रे...पण आज खुपच एकट एकट वाटलं म्हणुन...घरी आलं की घरी कुणी नाही...सगळ भकास...आई बाबांशी phone वर बोलण झालं पण तरीही मनाची हुर हुर काही थांबली नाही...anyways आता रडल्यावर थोडं बर वाटतय...!
तो : इतकं एकट वाटत होतं तर...तर गाडी काढुन सरळ तुझ्या मैत्रिणींच्या अड्ड्यावर का नाही गेलीस...किवा...
ती : तू आता मला उपदेश नको करू please, i am ok now...माझं फक्त ऐकुन घे...that is more than enough for now...!
 (नंतर खुप वेळ बोलुन झाल्यावर आणि "तो" ने "ती" ची मनधरणी केल्यावर call संपतो)

[दिवस पाचवा - शुक्रवार]

ती : सगळ सामान नीट आवरून ठेव...नाहीतर प्रत्येक हॉटेल ला आपण नेहेमीच आठवण म्हणुन काही तरी देत आला आहातच आज पर्यंत...
तो : अग आवरतो ग सगळ...काळजी नको करू...तुझ्यासाठी काय आणू ?
ती : तुच सुखरूप ये...तेच gift असेल माझ्यासाठी...

(शनिवारी दुपारी घरी आल्यावर, "तो" फ्रेश होतो आणि "ती" च्या सोबत चहा घेतो)

ती : झालं, आता तुझ्या office मध्ये सांगुन टाक बरं की आता मी कुठे जाणार नाही, द्यायचं असेल काम तर इथेच द्या...
तो : असं म्हणुन होतं का कधी...company काय माझ्या आजोबांची नाही...ते म्हणतील ते तर ऐकावच लागेल...
ती : तरीही...पुढल्या वेळेला विचारलं तर नाही म्हणुन सांग...बघ तर काय म्हणतात ते...
तो : आणि आपले promotion चे chances कमी करून घेऊ...बरं आजच तर आलो आहे...आता परत कशाला हा topic...
ती : अरे सगळ घर disturb होतं, routine disturb होतं...
तो : company इतका विचार करायला लागली तर झालंच मग...पण मी काय म्हणतो की असे छोटे छोटे breaks हवेतच...तितकीच नात्यातील गोडी वाढते...एकमेकांना miss केल्यावर...
ती : (फक्त हसते) पण आता लगेच कुठली trip नाही नं...
तो : अग नाही ग...लोड ना ले कुडिये...!

(सोमवार सकाळ "तो" च्या office मध्ये)

"तो" चा boss : येत्या गुरुवारीच निघावं लागेल...there is no other option...
"तो" : पण sir परवाच तर मी आलो आहे...आता लगेच परत...
"तो" चा boss : i know, पण ते कामही तुझच आहे...i mean तुझ्याशिवाय कोणाला कस जमणार...जाऊन ये फक्त चारच दिवस जायचं आहे...no long term...

("तो" office मधुन "ती" ला तिच्या office number वर phone लावतो)

तो : एक problem झाला आहे...त्याच काय आहे की...
ती : (त्याचा tone आणि overall temperament ओळखतं) केव्हा जायचं आहे...
तो : गुरुवारी...
ती : (पलीकडून जोरात phone आपटते)
तो : हेलो..अग पण ऐक तर खर...फक्त चार दिवस...तुझ freedom, झुम्बा....आपल्यातील गोडी वाढेल अजून थोडी...हेलो हेलो...😁😁

सारंग कुसरे 

No comments:

Post a Comment