Sunday, October 7, 2018

सफ़रनामा - 1

आज नेहेमीपेक्षा मी लवकरच ऑफिस ला आलो आणि आपल्या cubicle मध्ये जाऊन काल अपूर्ण राहिलेल्या code वर काम करू लागलो. सकाळी एक तासभर आधी ऑफिस ला आल्यामुळे सगळीकडे साम सुम होती. त्यामुळे मला आपल्या कामात चागलंचं concentrate करता येत होतं. पावणे नऊ च्या सुमारास कंपनी बसेस आवारात आल्या आणि सगळीकडे लोकांच्या बोलण्याचा, आपल्या गळ्यातलं कार्ड swipe करण्याचा आवाज येऊ लागला. मी भानावर आलो आणि जागेवरच आपल्या सर्वांगाला आळोखे पिळोखे दिले. माझ्या cubicle मधले बाकीचे तिघेही आता आले होते. सरावाचं good morning, hi, hello झालं आणि प्रत्येकाने आपापले laptop नावापुरतं लावले. सोहम laptop चा password type करता करता मला म्हणाला “काय शेखर आज लवकर ?? कालच्या call मुळे नीट झोपला नाहीस वाटतं. अरे नको घेउस इतकं tension, presentation ला अजून वेळ आहे”. मी नुसतंच smile केलं आणि म्हंटल “अरे तसं नाही रे पण तिकडे जायच्या आधी काही तरी concrete develop करून झालं की तिकडे load येणार नाही”

“तिकडे” जातोय म्हटल्या बरोबर एव्हाना सोहम सोबत, मानसी आणि मीरा चे पण कान टवकारले. मानसी म्हणाली “म्हणजे visa वगैरे पण झाला?”

“अगं म्हणजे काय, मी उगाचच इथे मरतोय का? निघायचं आहे मला weekend ला…”

त्यावर मीरा ने प्राश्नांचा भडीमार केला “US office ला की UK office ला? किती दिवस? flight कोणती? कोणत्या visa वर ?”

मी देखील त्याचं sequence ने मीरा ला उत्तरं दिली, “ London, UK, २ महिने, British airways, Business visa”

सगळे माझ्या revolving chair भोवती गोळा झाले.

“२ महिने म्हणजे मजाच की रे” सोहम म्हणाला “बऱ्या पैकी फिरून होईल तुझं”

त्यावर मीरा म्हणाली “ ओ सर तो फिरायला नाही onsite चालला आहे, pressure ही तितकंच असणार. मला आता कळतंय तू onsite ला गेलेला project scrap का झाला ते, बसला असशील नुसता फिरत”

हसतच मानसी ने मीरा ला टाळी दिली आणि सोहम ला म्हणाली, “मग आता next tour कुठे??”

“come on मानसी मीरा, जसं काही मला माहीतच नाही onsite ला किती काम असत आणि किती नाही ते, anyways तू एकटा आहेस की आणखी कुणी येतंय तुझ्या बरोबर?”

“नाही नं यार सोहम तोच तर वांदा झाला आहे, माझा PM , तो जाड्या, म्हणतोय की आधी तू जा, POC दाखव आणि मग १-२ लोकं तुला assist करायला पाठवतो, ते ही जर client नी budget approve केलं तर”

“म्हणजे मग नक्कीच मान-पाठ मोडेस्तोवर काम असणार” सोहम म्हणाला

“का रे शर्वरी ला सांगितलस का की तू तिथे येतो आहेस म्हणुन?” मीरा म्हणाली

“नाही मीरा अजून पर्यंत नाही आणि मी सांगणार देखील नाही...let it be a surprise for her. बाकीच्यानीही कृपा करून तिला सांगू नका.”

मीरा आणि मानसी सोहम च्या कानात काही तरी कुजबुजल्या आणि तिघांनीही एका सुरात मला पार्टी मागितली आणि तीही lunch ची.

मी office चं काम संपवून रात्री उशिरा घरी आलो. आई माझ्यासाठी जेवायची थांबली होती. आम्ही दोघंही जेवायला बसलो. “दोन महिने म्हणजे दोनच ना रे, की वाढू शकतात?” आई ने विचारले.

“हो दोनच म्हंटल आहे, बघू पुढे काय होतं ते”

“मी काय म्हणते शेखर, तू तिथून परत आलास की जी दोन तीन स्थळं मला सांगून आली आहेत ती एकदा नजरे खालून घालशील का ? त्यातली जी पसंत करशील तिथे आपण पुढाकार घेऊ, पण बाळा मला आता वाटतंय की तू settle व्हावस?”

“आई परत तोच topic, तुम्हाला जरी मी stable झाल्यासारखा वाटत असलो तरीही अजून मला तसं काही नाही वाटत...”

“असं कसं म्हणतोस तू, चांगला engineer झालं आहेस, ४-५ वर्षांचा experience झाला आहे, स्वतःचा flat आहे, गाडी आहे, लग्न करण्यासाठी जे जे हवं ते सगळं आहेच की ..”

“अगं हो पण माझी settle होण्याची व्याख्या वेगळी आहे...मला असं अनोळखी मुलीशी नुसता फोटो बघून लग्न नाही करायचं आहे ...म्हणुन म्हणतो मला थोडा वेळ दे”

“office मधल्या मीरा, मानसी, शर्वरी पैकी तर कुणी नाही नं?” आईने डोळे मिचकावत मला विचारले

“काही ही काय आई. मी वेळ आली की तुलाच पहिले येऊन सांगील...मग तर झालं”

“देव करो आणि ती वेळ लवकरच येवो”

जेवण झाल्यावर मी आपला laptop काढून काम करू लागलो, तेवढ्यात बाबा तिथे आले आणि म्हणाले .. “काय मग केव्हा निघताय london ला?”

“बाबा या शनिवारची पाहते ३ वाजता ची flight आहे”

“व्यवस्थित जा आणि लवकर परत या. इथे आल्यावर, आई जसं म्हणाली, तसं आणखी अजून बरीच महत्वाची कामं उरकायची आहेत”

“बाबा आता you don’t start again...”

“अरे बरोबरच म्हणाली ती, काय चुकलं तिचं”

विषय संपवायचा म्हणुन मी देखील “ओके ओके” करतच तिथून काढता पाय घेतला आणि आपल्या रूम मध्ये येऊन काम करू लागलो. काम संपायला रात्रीचे ११ वाजले होते. laptop बंद केला आणि बेड वर आडवा झालो. शनिवारी london ला जायच्या विचारानं तसा excite तर झालो होतोच पण त्याही पेक्षा तिथे शर्वरी ची भेट होणार या feeling न तर आणखीनच. शर्वरी चा विचार येताच हात लांब करून table वर charging ला लावलेला फोन घेतला आणि तिच्या facebook profile वर गेलो. जग खरंच छोटं झालं आहे, छोट्या पेक्षाही instant झालं आहे. कुणाची नुसती आठवण येताच आज आपण क्षणाचा ही विलंब नं करता त्या व्यक्तीशी face to face बोलू शकतो, त्या व्यक्ती बद्दल माहिती घेऊ शकतो, त्या व्यक्ती चे fotos पाहू शकतो. शर्वरी ला कल्पना ही नसेल मी आत्ता तिचे फोटो इथे भारतात बघत असेल म्हणुन.

शर्वरी आणि माझी पहिली भेट office मधेच झाली. तीही माझ्यासारखीच तिच्या college campus मध्ये select झालेली. सुरवातीचं training संपल्यावर आम्हाला same project मिळाला. project वर काम करता करता सोहम, मीरा, मानसी, मी आणि शर्वरी आमची मस्त गट्टी जमली. त्यातही माझी आणि शर्वरी ची जरा जास्तच. शर्वरी म्हणायला गेलं तर modern आणि तरीही घरंदाज, काहीशी outspoken पण तरीही introvert, प्रत्येक विषयाकडे बघण्याची तिची दृष्टी आमच्या सगळ्यांपेक्षा निराळी, out of box..! तिचंही सगळ्या group मध्ये इतरांपेक्षा माझ्याशी जास्त पटायचं. पण हे सगळं मैत्री पुरतंच, त्या पलीकडे काहिच नाही. I mean मला देखील असं कधी वाटलं नाही आणि तिने देखील असं कधी भासवलं नाही. मात्र ८ महिन्यांपूर्वी जेव्हा ती एका दुसऱ्या project निमित्त london ला गेली, त्या नंतर मला, माझ्या रोजच्या routine ला, माझ्या विचारांना, थोडी अपूर्णता जाणवू लागली. तसा virtual touch होताच, आहेच. आमचा सगळ्यांचा whatsapp group आहे, सगळे facebook वर connected आहोत. पण तरीही कुठे तरी पोकळी जाणवू लागली. आता परत ती पोकळी, काही दिवसांसाठी का होईना, पण भरून निघणार म्हंटल्यावर मनाला एक वेगळीच उभारी आली होती, एकूणच छान वाटत होतं. गालातल्या गालात हसतच मी तिचे बरेच से फोटो बघितले आणि तिची london ला भेट होईल या गोड विचारानेच झोपी गेलो.

अखेरीस london ला जाण्याच्या आधल्या दिवशी मी office ला सगळे approvals, air-ticket, currency घ्यायला गेलो. एकानंतर एक सगळी कामं झाली आणि मी मीरा, मानसी आणि सोहम चा निरोप घेऊन माझ्या PM ची म्हणजेच प्रदिप ची भेट घ्यायला गेलो.

“झाली का सगळी तयारी, केव्हा उद्याच निघतो आहेस ना?”

“बरोबर साडे दहा तासांनंतर” मी हसतच म्हणालो

“happy journey आणि हो तिथे पोचला की मार्क शी discuss करून CRP meeting च्या confirm dates कळवशील”

“thanks, नक्की कळवतो. I think, मार्क ला नक्की आवडेल आपलं proposal, lets hope for the best”

“शेखर we have to bring as much business from DAN as possible”

“yes प्रदिप, no worries”

कंपनीत सगळ्यांचे निरोप घेऊन झाले आणि मी घरी आलो. सगळ्या तयारी वर एक finishing touch दिला. नंतर बाबा आणि मी कोपऱ्यावरच्या किराण्याच्या दुकानात जाऊन baggage चे वजन करून आलो. सगळे within limits होते. आईने दिलेले पराठे मी वरच्या cabin bag मध्ये ठेवले. बाकी इतर खायचं सगळं check in मध्ये. सगळी तयारी झाली होती. कुणाच्या तरी सांगण्यावरून सोबत एक मग्गा देखील घेतला होता, तिथे toilet मध्ये नसतो म्हणुन आणि spray देखील नसतो म्हणुन. सगळी तयारी झाली आणि रात्री ९.३० च्या सुमारास taxi दारात येऊन उभी झाली. पोरगा पहिल्यांदा परदेशी इतक्या दिवसांकरता चालला आहे म्हंटल्यावर बाबांचा ऊर भरून आला होता आणि आई ला आनंदापेक्षा काळजीच जास्त वाटत होती. आईच ती, त्या मुळे हे सगळं अगदी स्वाभाविक होतं. नाही म्हणायला मी ही थोडा emotional झालो होतोच. अतिशय आनंदी, काळजीयुक्त आणि तरीही थोड्या दु:खी अश्या मिश्र वातावरणात माझ्या लंडन वारीला सुरवात झाली होती.

एकदाची taxi हलली आणि मी डोळे पुसत पण हसतच आई बाबांचा निरोप घेतला. taxi पुण्याच्या बाहेर पडे पर्यंत मी मधुन मधुन डोळ्याला रुमाल लावत होतो. taxi driver, नारायण, माझ्याकडे rear view mirror मधुन थोड्या थोड्या वेळाने बघत होता. न राहून त्याने विचारलंच, “साहेब...कुठं चाल्ले?”

“london ला”

“london ला चाल्ले, साहजिकच आई बापाला काळजी वाटणारच. तुम्ही इतकं लावून नका घेऊ, पुढल्या food mall ला फक्कड चहा प्या बरं वाटल”

मी नुसतंच “हssम” म्हंटल

taxi मुंबई पुणे highway ला लागली आणि मी थोडा स्थिरावलो. कार च्या बाहेरची हिरवळ बघत, गाणी ऐकत पहिला food mall कधी आला ते कळलं देखील नाही. food mall ला चहा घेतला आणि नारायण सोबत थोड्या गप्पा केल्या. गप्पांच्या ओघात त्याने मला सांगितलं त्याचा मुलगा singapore ला असल्याचं. तिथे तो गेल्यावर झालेल्या गमती जमती देखील अगदी मनमोकळेपणाने सांगितल्या. मी आधी singapore ला गेलो असल्यानं तो काय सांगत होता त्याच्याशी मी अगदी व्यवस्थित relate करू शकत होतो. एकंदर food mall च्या चहा break नं माझं मन थोडं हलकं झालं. आम्ही परत मुंबई airport च्या दिशेने मार्गस्थ झालो.

कुठलाही प्रवास असला की मी अगदी हटकून सहप्रवाश्या बरोबर नाही तर driver बरोबर तरी संवाद साधतोच. म्हणजे सुरवात तर नक्की करतोच, पुढचा response देत असेल तर ठीक नाही दिलं तरीही ठीक पण प्रयत्न तर मी करतोच. मला असं पुर्ण वेळ शांततेत प्रवास करताच येत नाही. शिवाय आपण थोडं मोकळं व्हायला लागलो की समोरचा देखील मोकळा होतो, गप्पा होतात विचारांची देवाण घेवाण होते आणि माझं हा नेहेमीचा अनुभव आहे की अश्या गप्पांमधून नवीन pointers मिळत जातात. माणसं अनोळखी माणसांकडे बरेचदा असं काही बोलून जातात जे ते त्यांच्या सख्यांकडे देखील कधीही बोलणार नाही. त्याचही कारण असतं, कारण इथे तो माणूस परत भेटण्याची शाश्वती नसते, दुसरा माणूस मनातल्या या खोल भावनांचा फायदा घेण्याचा संभव नसतो आणि याने एकंदरीत मन हलकं होतं.

office च्या कामानिमित्त जरीही मी पहिल्यांदा देशाबाहेर चाललो असलो तरीही tourism म्हणुन मी बऱ्यापैकी फिरलो होतो, देशात आणि देशाबहरे देखील. आणि प्रत्येक वेळेला हटकून taxi driver शी तर नक्कीच संवाद साधला होता. प्रत्येकाची एक कहाणी, प्रत्येकाचे काही life changing events, प्रत्येकाच्या individual insecurities. मागे एकदा मुंबई airport वरून पुण्याकडे येताना केतन नावाच्या driver नी मला त्याची अख्खी कहाणी सांगितली ३ तासात. त्याचे struggles, त्याचे failures आणि त्यामुळे life कडे बघण्याचा त्याचा overall दृष्टीकोन. खुप मस्त वाटलं होतं त्याच्याशी बोलून. केतन छान drawing काढतो आणि त्याला वाचनाची आवड आहे हे त्याने सांगितल्यावर मला त्याचं विशेष कौतुक वाटलं. पुण्याला पोचल्यावर त्याने मला त्याच्या cabin मध्ये “श्रीमान योगी” ठेवल्याचं दाखवलं आणि म्हणाला की free असेल तेव्हा तो ते वाचतो, शिवाय त्याचं sketch book देखील दाखवलं. असे अजून अनेक किस्से आठवत आणि नारायण बरोबर गप्पा करत करत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आम्ही अखेरीस मुंबई airport वर आलो. मी नारायणला tip आणि शुभेच्छा दिल्या आणि मी check-in counter कडे आपला मोर्चा वळवला.

“may i have your passport and ticket please??” BA च्या counter वरच्या attendant ने मला विचारले.

“i already have checked in online, just need to drop the baggage”

“Ok, Mr Shekhar, how many bags you would like to check in”

“just one check in and one cabin”

“here is your boarding pass and passport, have a happy and safe flight”

“thanks”

मी पुढे security आणि emigration formalities उरकल्या आणि आपल्या flight ची वाट बघत बसलो. airport वरचं वातावरण मला तसं नवं नव्हतंच आणि म्हणुनच मी आतून अगदी शांत आणि निवांत होतो. पण असं असलं तरीही मला नेहेमीच या वातावरणाची इतकी गम्मत वाटत आली आहे. बऱ्या पैकी रोजच्या जगण्यापासून खूप लांबचं जग इथे अनुभवायला मिळतं. एक वेगळंच कृत्रिम, plastic जग. माझा observation करण्यात छान वेळ चालला होता आणि थोड्याच वेळात boarding ची announcement झाली आणि मी, air hostess वर एक ठरलेलं कृत्रिम हास्य फेकून, एकदाचा विमानात येऊन आपल्या जागेवर बसलो.

Flight london ला land झाली आणि मी terminal 5 वरून आपलं सामान ढकलत arrivals gate च्या बाहेर आलो. माझ्या ध्यानी मनी ही नसताना मला receive करायला शर्वरी आली होती. I was wondestruck and extremely happy at the same time.

"Welcome to London Shekhar" माझ्या हातात बुके देत शर्वरी म्हणाली.

"Thank you for this pleasant surprise...माझ्या साठी हे फारच unexpected आहे"

"Compliment manasi and meera for that"

"या लोकांच्या काहीच पोटात राहत नाही... anyways पण मला खरच छान वाटलं...thanks again शर्वरी"

"No worries... थकला असशील, coffee?”

"चालेल"

आम्ही terminal 5 च्या coasta coffee मध्ये coffee घेतली. बऱ्याच दिवसानंतर प्रत्यक्ष भेट होत आल्यामुळे आणि ती देखील इतक्या अनपेक्षीत पणे, त्या मुळे coffee कडू असून देखील अल्लाहाद दायक वाटत होती.

"कसा आहेस शेखर, howz life आणि project काय म्हणतोय?"

"Life cool आणि project hot"

"म्हणजे ideal आहे...life कूलच हवं"

"तू काय म्हणतेस? London काय म्हणतंय?

"मी मजेत आणि london बद्दल कुणी काय बोलावं, ते आपल्या धुंदीत"

"मी “माझं लंडन” आणलं आहे मीना प्रभूचं. लंडन ला यायचं कळल्या बरोबर मी आधी जाऊन ते विकत घेऊन आलो. हे पुस्तक आणि तू, शर्वरी बरं झालं यार तू इथे आहेस ते, हे दोन महिने तरी मजेत जातील"

"Yes...आपण भरपूर धमाल करू...मला आता London पाठ झालं आहे...I will happily be your guide"

(क्रमशः)

सारंग कुसरे

No comments:

Post a Comment