Sunday, October 14, 2018

"वाद"-ळ

मी, मी, माझे, माझे आणि फक्तच फक्त माझेच मुद्देे
ढिशुम, ढिशुम, लाथा, बुक्क्या, हे घे आणखी शाब्दिक गुद्दे
बोल ना साल्या शांत का, नाही का उत्तर गप्प का ?
तेव्हा तर खूप बोलत होतास, उत्तर दे ना चुप्प का ?
वादळ येऊन चाललं जातं, सोसाट्याचा घेऊन वारा
वादळ संपतं, वारा थकतो, स्वच्छ शांत होतो पारा
नजरेस उरतो मात्र मागे निरर्थक मुद्द्यांचा च गाळ
अन हळवं नात विनाकारण नाहक झालेलं शब्दबंबाळ
वादळाने शिकून सवरून थोडंसं शहाणं व्हायला हवं
वाऱ्यानेही डोळस होऊन तारतंम्याने पहायला हवं

सारंग कुसरे

No comments:

Post a Comment