Sunday, October 14, 2018

सफ़रनामा - 2

Coffee संपल्यावर शर्वरी ने मला Wembley मध्ये अमित कडे drop केलं आणि ती तिच्या घरी म्हणजेच Hounslow ला गेली. अमित माझा मित्र cum office colleague. फरक इतकाच की तो कंपनी तर्फे long term visa वर आला होता आणि गेली दिड वर्ष London ला स्थायिक होता. London ला येण्या अगोदर त्यानेच मला तो जिथे shared accomodation मध्ये राहतो तिथला address दिला होता आणि थेट तिथेच यायला सांगितले होतं. माझी ही London ला यायची पहिलीच वेळ असल्यामुळे मीही जास्त चिकित्सा केली नाही. पण तिथे आल्यावर ती चिकित्सा मी करायला हवी होती असं हटकून वाटायला लागलं.

घर तीन मजली victorian style, typical जुन्या english पद्धतीचं होतं आणि ते एका गुजराती कुटुंबाने भाडे तत्त्वावर घेतलेलं होतं. तिथे ते कुटुंब पण राहत होतं आणि त्यांनी उरलेल्या रूम्स sub-let केल्या होत्या इंडियातून आलेल्या IT तील मंडळींसाठी. त्यामुळे एका खोलीत त्या गुजराती दीदी आणि त्यांचा संसार, including तिचा नवरा आणि लहान शाळेत जाणारा मुलगा आणि इतर खोल्यांमध्ये सगळे IT वाले ऐटित (?) राहत होते. अमित त्यांच्या पैकी एक आणि २ महिन्यांकरता मी देखील. माझी रूम सगळ्यात वरची असल्यामुळे माझ्या नशिबी त्रिकोणी छत होतं. अमित नी मला सगळ्या घराची ओळख करून दिली आणि kithchen आणि toilet-bath shared असल्यामुळे त्यातील नियम देखील समजावून सांगितले. मला तसं हे सगळं नवीन होतं आणि uncomfortable सुद्धा कारण मी तसा नेहेमी independent राहिलो होतो. म्हणुनच घरी आल्यापासून, आपल्या रूम मध्ये settle होई पर्यंत एक अस्वस्थता माझ्या मनात सारखी रेंगाळत होती. कदाचित नवीन देश, नवीन लोकं, नवीन जागा आणि त्यावर प्रवासाचा शीण याचा सार्वत्रिक परिणाम असेल बहुदा, असा विचार करून मी माझ्या प्रवासाच्या ब्यागा आवरायला घेतल्या.

प्रवासाच्या ब्यागा भरणे आणि नंतर त्या इप्सित स्थळी रिकाम्या करणे हे एक दिव्यच असतं. मी एकटा असल्यामुळे तसं माझं सामान इतकं नव्हतं पण पोरगं परदेशात चालला आहे म्हंटल्यावर आईने माझं सामान तीनपट वाढवलं होतं. चितळेंच्या बाकरवड्या, आंबा बर्फी, बेडेकर मेतकुट, खाकरे, maggie ची पाकिट आणि बरंच काही. मी सगळं सामान कपाटात नीट लावलं आणि आपले कपडे देखील व्यवस्थित लावून ठेवले. हे सगळं करता करता संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही, थोडी भूक देखील लागायला सुरवात झालीच होती पण जेवायला अजून उशीर होता. मी बाकरवडी चं एक packet उघडलं आणि त्या खात खातचं अमित च्या रूम वर knock केलं.

त्याच्या रूम मध्ये शिरताच, चारपाच बाकरवड्या हातात घेत अमित ने विचारलं “झालास settle?”

“हो झालो, सगळं सामान लावलं आहे, थोडी भूक लागली म्हणून घरचं आणलेलं खात होतो. जेवणाला अजून किती वेळ आहे?” मी विचारलं

“अरे आज sunday, आज इथल्या dinner ला सुट्टी असते, आपण बाहेर जाऊ थोड्या वेळात जेवायला, you are ok right?”

“हो रे i am good फक्त i am wondering की तू इतके दिवस अश्या घरात का राहतो आहेस...i mean तुला अजून चांगले options मिळाले असते की?”

शेवटची बाकरवडी खात अमित म्हणाला, “नक्कीच मिळाले असते, पण मला हे ठीक आहे रे, स्वस्त आहे, कमी पैशात जेवण मिळतं आणि शिवाय i want to make as much money as i can while i am here...कोथरूड ला 3 bhk घेतला आहे त्याचे हफ्ते भरायचे आहेत आणि advance amount भरून लवकरात लवकर loan मुक्त व्हायचं आहे”

“इथे बाकीचे जे लोकं आहेत ते कुठले आहेत?”

“दोघं झणं Cognizant चे, त्यातला एक married आहे आणि बाकीचे दोघं TCS मुंबई चे आहेत”

“सगळ्यांसोबत without clashes घर share करणं होतं का?...नाही कारण प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या, स्वभाव वेगळे, स्वच्छतेच्या व्याख्या वेगळ्या etc...engineering च्या hostle ची गोष्ट वेगळी होती पण आता…”

“प्रत्येकाचे आपापले अजेंडे आहेत...आपापल्या priorities आहेत” इतकं मोघम बोलून अमित ने विषय टाळला.

मी पण “dinner ला बाहेर जाताना मला सांग” असं म्हणत त्याचा निरोप घेतला आणि आपल्या रूम मध्ये आलो आणि बेड वर पडलो. Engineering च्या hostle चा विषय निघाल्यामुळे, मन एकदम १० वर्ष मागे गेलं आणि hostle च्या कडू गोड आठवणी मध्ये रमलं. First year च्या काही महिन्यातच hostle सोडून मी रूम वर आलो होतो. Hostle वरचं overall वातावरण, तिथलं ragging, अस्वच्छता, अतिशय निकृष्ट दर्ज्याचं जेवण या सगळ्यात मन जास्त काळ नाही रमलं. तसाही माझा स्वभाव थोडा introvert असल्याकारणानं माझं एकंदरीत तिथे जास्त कोणाशी जमलं नाही. Ragging विषयी माझ्या मनात अतोनात चीड. आणि त्याचाच त्या काळी hostle वर उच्छाद, आता सारखे कडक नियम त्या काळी नव्हते. Ragging नी तुमच्या personality ला नवीन वळण मिळतं, तुम्ही बोल्ड होता, तुम्ही so called professional world साठी तयार होता या विचारांच्या मी ठार विरोधात होतो. हे सगळं पाणी गरम करण्याच्या heater coil वर junior ला लघवी करायला सांगुन आणि त्याला अतोनात वेदना होताना पाहुन, हसून कसं काय साध्य होतं, हे मला कधीच कळलं नाही. माझ्या साठी हे सगळं अगदी अनाकलनीय होतं आणि आश्चर्य म्हणजे माझ्या सारखे विचार करणारे बोटावर मोजण्या इतके होते. एकदा ragging विषयी माझं hostle च्या student leader शी वाद झालं होता. Ragging ने leadership qualities develop होतात असं सांगणारा तो आज चाकण च्या mechanical workshop मध्ये lathe incharge म्हणुन काम करत असल्याचं कळलं तेव्हा त्याच्याशी परत जाऊन leadership and ragging वर चर्चा करण्याचा मला मोह झालां होता. Ragging झाल्यावर तुम्ही बोल्ड होता असं सांगणारा, professor ने “any questions?” विचारल्यावर साधं भरल्या वर्गात प्रश्न विचारायला घाबरायचा. Ragging च्या नावा खाली physical होऊन आमच्या एका मित्राच्या कानाचा पडदा देखील फाटला होता. अशी अनेक उधाहरण देऊन सुद्धा ragging ला support करणारे आणि आपली झाली आहे म्हणुन juniors ची घेणारे पाहुन मी ragging न होऊ देण्याचा आणि न घेण्याचा निर्णय घेतला होता. Ragging आणि hostle वरच्या पोरांचा रानटी वागणं बघून hostle सोडायचा मी निर्णय घेतला होता. रानटी म्हणजे किती रानटी त्याला काही सीमा नव्हती. आठ आठ दिवस अंघोळ न करणे, corridor मध्ये underwear वर फिरणे, पाहटे तीन वाजता junior ला कपडे धुवायला सांगणे, हे सगळं आणि अजून बरंच काही विकृत करायला लावण्यात आणि करण्यात hostle वरच्या पोरांना फार पुरुषार्थ वाटत होता. मला असं नेहेमी वाटत आला आहे की in that age सगळे FOMO चे शिकार असतात. FOMO म्हणजे fear of missing out. कदाचित असं वागलं तरच आपल्यालाही group मध्ये मान्यता मिळेल असं काहीसं उपरं feeling. म्हणुन आपणही तसं काहीसं so called “manly” “macho” केलं तर आपल्याला ही सगळे मानतील, i will be accepted in the group, असे काहीसे विचार. नशिबाने माझं तसं काही झालं नाही आणि मी त्या पासुन चार हात लांब राहिलो. Hostle life चे गोडवे गाणारे सिनेमे आणि कादंबऱ्या वाचल्या की त्यांना ही पण बाजू include करा असं सांगण्याचा मोह होतो.

रूमच्या दारावर टक टक झाली आणि मी भानावर आलो, अमित ने मला dinner साठी बोलावलं होतं. आम्ही wembley मधल्या एका Indian restaurant मध्ये भरपेट जेवलो. तेव्हा अमित ने मला आमच्या घराच्या मालकिणीविषयी म्हणजेच उषा दीदी आणि त्यांच्या परिवाराबद्दल सांगितलं. उषा दीदी घरातल्या रूम्स sub-let करून आणि तिचा नवरा जिग्नेश plumbing ची कामं करून आपला उदरनिर्वाह करतात, हे सगळं ऐकुन मी तर चाटच पडलो. Foreign ला आणि त्यातही UK ला राहणारे भारतीय म्हणजे उच्चशिक्षित किवा खुप पैसेवाले असतात, माझ्या या समजुतीला पुर्ण तडा गेला होता. त्याने असेच अजून अनेक interesting आणि shocking गोष्ठी माझ्या London च्या पहिल्याच रात्री सांगितल्या आणि मी अचंभित झालो. टच्च जेवण झाल्यामुळे अमित ने मला पान खाणार का म्हणुन विचारले आणि आम्ही London मध्ये भारतीय कलकत्ता मिठा खाल्लं आणि रूम वर येऊन मी शांत झोपी गेलो.

बरोबर 6 ला alarm वाजला पण मी jet lag मुळे २ तास आधीच उठलो होतो आणि शेजारच्या रूम मधल्या TCS च्या गणेश चे घोरणे ऐकत बेडवर पडलो होतो. सकाळी उठून kitchen मध्ये जाऊन चहा बनवला आणि breakfast म्हणुन corn flakes खाल्ले. Fresh झालो आणि office जा जाण्यासाठी wembley park station कडे पायी निघालो. हवेत मस्त गारवा होता, वातावरणही मस्त होतं पण मी जिथे राहायला आलो होतो तिथली overall arrangement, shared kitchen, shared toilet आणि तिथली questionable (अ)स्वच्छता बघुन मनात सारखं वाटत होतं की राहण्याची अजून better व्यवस्था झाली तर i will be more lively आणि मी इथला stay पण चांगला enjoy करू शकील. हा विचार डोक्यात चालू असतानाच phone वर message tone वाजला आणि बघतो तर शर्वरी चा message, “Good morning !! lunch ला भेट.” चालत चालतचं “ok, call करतो साडे बारा ला” असं म्हणुन मी reply केला आणि Wembley park या tube station वर आलो.

मुंबई ची जशी local तशी London ची tube. इतकं साधर्म्य सोडलं तर बाकी काहिच साधर्म्य नव्हतं. Tube छान टुमदार होती, स्वच्छ होती, गर्दी होती नाही म्हणायला, पण मुंबई इतकी नक्कीच नव्हती. Wembley park ते Great portland street असा माझा प्रवास होता. सुरवातीला वाटलं होतं की सगळीकडे कसं जावं, कोणती train पकडावी, सगळं विचारावं लागेल पण station वर येताच tube map हाती घेतला आणि सगळं सोपं झालं. Station वर सगळीकडे स्पष्ट लिहिलेलं होतं कोणती tube कुठल्या मार्गे जाते ते, त्या मुळे गोंधळायला कमी झालं. शिवाय तिथले कर्मचारी देखील होते, tube चे, अडलं तर काही विचारायला. मी South-bound metropolitan line पकडुन Great portland street ला जायला निघालो. खुप गम्मत वाटत होती आणि मजाही येत होती. Tube मध्ये चढलो तेव्हा बसायला जागा नव्हती त्या मुळे उभाच होतो पण मी जिथे उभा होतो त्या पासुन दूर एक जागा रिकामी झाली पुढल्या station ला. पण त्या समोर उभ्या असलेल्या माणसाला कदाचित बसायचं नव्हतं म्हणुन त्याने मला ती offer केली. मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्या माणसाला thanks म्हणुन मी जागेवर बसलो.

मार्क नी मला office च्या दारावर receive केलं आणि office ची थोडी माहिती जसं की माझी जागा, toilets, canteen सगळं दाखवलं आणि मी कामाला सुरवात केली.पहिलाच दिवस असल्याकारणाने आज तसं pressure कमी होतं. मी थोडा settle झाल्यावर मार्क ने माझी इतर team members शी ओळख करून दिली आणि कामासंबंधी काही instructions दिल्या. मी घड्याळ बघितलं तेव्हा सव्वा बारा झाले होते. वेळ भराभर गेला होता अगदी नकळत. बरोबर साडे बाराला मी शर्वरी ला जवळच्या Turkish restaurant वर भेटलो.

"खूप वेळेचा आला आहेस?"

"नाही ग आताच आलो...चल पटकन order देऊ खुप भूक लागली आहे"

बोलता बोलता आम्ही Turkish restaurant च्या दाराशी आलो. Table for two, असं काहीसं तिनं waiter ला सांगितलं आणि waiter लगेच आम्हाला आमच्या table पाशी घेऊन गेला.

"So शेखर, what's your first impression of London?"

"मस्त आताशा येऊन अजून 24 तास देखील नाही झाले…छान तर वाटतच आहे पण तरीही..."

“काय झालं?”

“काही नाही गं...जिथे मी थांबलो आहे सध्या...i kind of didnt like that place”

“का रे”

“काही नाही गं...मी इतर मुलांसारखा सिनेमात किवां हल्ली web series मध्ये दाखवतात तसा bachelor नाही, माझ्या काही स्वतःच्या राहण्याच्या किमान requirements आहेत, मग त्यात स्वच्छता, privacy आणि थोडी you know शांतता असावी अशी माझी अपेक्षा आहे...”

“तू इथे येण्या अगोदर तुझ्या colleague शी सविस्तर बोलला नव्हता का जागेविषयी?”

“नाही ना तोच तर घोळ झाला”

“Let me see मी जिथे राहते Hounslow ला, त्या भागात काही single paying guest चे options आहेत का?”

शर्वरी च्या घराजवळ राहायला मिळणार या कल्पनेनेच माझ्या मनाला उभारी आली होती आणि जेवण एकदम tasty लागू लागलं. मी तिला खुप excite झाल्याचं नाही दाखवत, “बघ यार काही तरी, it would really be good” इतकंच म्हणालो. पण माझ्या चेहऱ्यावर काही लपून राहत नाही हे बहुदा तिला ठाऊक होतं. तिने नुसतं डाव्या हाताने डाव्या कानावरचे केस मागे करत, मंद हसत, “I will let you know soon” इतकंच म्हंटल आणि आम्ही जेवण संपवून आपापल्या office कडे मोर्चा वळवला..!!

(क्रमशः)

सारंग कुसरे

No comments:

Post a Comment