Thursday, December 8, 2016

ती आणि तो : आजीची पुरणपोळी..!

Subway employee : which bread...??
ती : wheat bread, all vegetables except jalapeno...
तो : आलोपिनो म्हणतात त्याला...
ती : तेच ते...
Subway employee : any sauces ??
ती : chipotle southwest and sweet onion... please bake it with cheese as well...

(आपापली सँडविच घेऊन दोघंही table वर येतात)

ती : किती मस्त लागतंय ना...
तो : (तोंडात सँडविच चा घास असतांना) ह्म्म एकदम मस्त...
ती : पण तुला एक सांगू हे कोणीही सोम्या-गोम्या ने बनवलं तरीही असंच लागेल...कारण इथे process वर भर आहे, चवी आधीच ठरल्या आहेत...
तो : म्हणजे...
ती : आता हेच बघ नं chipotle southwest ची चव अमेरिकेत पण तीच आणि भारतात पण तीच... त्या मुळे चवीत फरक पडणार नाही.
तो : पण ते तर सगळ्या अन्नाच्या बाबतीत सारखंच ना...
ती : नाही ना...तीच तर गम्मत आहे...आपल्या भारतीय पदार्थांच्या बाबतीत हे तथ्य लागू पडत नाही...
तो : कसं ??
ती : साधं उदाहरण घ्यायचं झालं तर पुरणपोळीचंच घे ना...माझ्या हातच्या पुरणपोळीपेक्षा तुला आईच्या हातची जास्त आवडते आणि त्याही पेक्षा आजीच्या हातची तर विचारायलाच नको...तिथे कसा experience दिसून येतो...process जरी defined असली तरीही प्रत्येकाकडे वेगळा हातखंडा आहे ती process follow करण्याचा...प्रत्येकाचा काही तरी X-factor आहे जो दुसऱ्या मध्ये सापडणं कठिण...तसं McD, Subway, KFC मध्ये होणार नाही...तिथे experience असलेला आणि नवखा हा चवी मध्ये काहीच फरक करू शकत नाही, फक्त service delivery मध्ये काय तो वेगळे पणा आणू शकतो...
तो : पण यांना standardization करावंच लागेल ना...to maintain their brand...!
ती : हो ते तर आहेच...पण कसं असतं बघ ना...जर असंच आपण "आजीची पुरणपोळी" अशी food-chain काढायचं ठरवलं तर कितपत यशस्वी होईल सांगता येत नाही कारण आपण तिथे चव कितीही standardize करायचा प्रयत्न केला तरीही ती 100 टक्के यशस्वी होईलच असं नाही...
तो : अगदी correct बोललीस...साधं "विष्णू जी की रसोई" चंच बघ ना...चवी दोन्ही कडच्या उत्तम पण पुण्याच्या आणि नागपूरच्या सारख्या न्हवे...
ती : पण ही किमया फक्त चितळेंना जमली...त्यांची बाकरवडी जगाच्या पाठीवर कुठेही घेतली तरीही तीच चव...पण त्याचं कारणही तितकंच सोपं आहे...ते...
तो : (तिला मधेच तोडत) हल्ली बाकरवडी machine ने बनवतात...
ती : correct... पण पुरणपोळी जर तशीच machine ने बनवली तर...
तो : नाही ग मुळीच मजा नाही येणार...या भारतीय पदार्थांमध्ये process पेक्षा experience ला जास्त महत्व आहे...आणि experience पेक्षा ही ती कोण बनवतं त्याला त्याहून जास्त...असो पुरण पोळीचा विषय निघालाच आहे तर होऊनच जाऊ दे या weekend ला...
ती : बघ बाबा, process मी करील सगळी follow... पण अजुन experience व्ह्याचा आहे बरं का मला...
तो : no worries...मलाही ते कळतं आणि आजीच्या हातची पुरणपोळी व्हायला ती काय standardized process नाही...तो एक experience ने शिकवलेला art आहे...प्रत्येकाचा personal आणि वेगळा सुद्धा...!!


सारंग कुसरे

No comments:

Post a Comment