Thursday, December 15, 2016

ती आणि तो : screw ढिला...!

ती : आठव्यांदा सलग...कमाल आहे...नादिष्ट पणाची खरंच कमाल आहे...!!
तो : त्याचं काय आहे की "Law of Diminishing Returns" याच्या पलीकडे आहे हे गाणं म्हणुन...
ती : अरे हो...पण म्हणुन आठ वेळा...this is madness... पण एक सांग तो law कुठला म्हणालास...
तो : MBA ला असताना economics मध्ये एक law शिकवला होता टिळक मॅडम नी... तो तेव्हा पासून चांगलाच लक्षात आहे...पण त्याचं philosophical interpretation हे असं आहे : The law of diminishing returns is the theory which states that, the more your experience something, the less effective it becomes.
ती : मग बरोबरच आहे हे...
तो : मला ही हे पटतं, rather पटायचं... पण जसं प्रत्येक सिद्धांताला एक exception असतं ना तसंच या theory ला पण काही exceptions आहेत असं लक्षात यायला लागलं...i mean personally माझ्या साठी तरी...
ती : मी तर कुठलंही गाणं असं सलग इतक्यांदा नक्कीच नाही ऐकू शकत...मग ते कितीही सुंदर का असेना...कितीही श्रवणीय का असेना...i think मला तो law अगदी 100% लागू होतो...
तो : त्याचं काय होतं की सलग ऐकल्यामुळे ते तुमच्या मेंदुत, रक्तात भिनत जात आणि euphoria च्या स्टेज ला तुम्हाला नेऊन सोडतं...क्षणिक मोक्ष म्हण हवं तर...!!
ती : (समाधानाने बंद मिटलेल्या त्याच्या डोळ्यांकडे पाहत)....!
तो : (डोळे उघडत) काही गाणी euphoria तर काही गाणी inspiration, motivation पण देतात आणि म्हणून ती loop मध्ये ऐकतच राहावीशी वाटतात...
ती : जसं की...
तो : 'अस्तित्व' मधलं "आयुष्य हे असते असे", 'लगान' मधलं "ओ पालनहारे", 'इक्बाल' मधलं "आशायें", 'उडान' मधली सगळीच गाणी...'प्रहार' मधलं "हमारी हि मुठ्ठी में आकाश सारा"...येसुदास ची कित्येक गाणी...श्रीधर फडकेंचे  "तुला पहिले मी नदिच्या किनारी", अशोक पत्कींच "पुरब से सुर्य उगा, फैला उजियारा" आणि  'गोट्या' चं title song "बीज अंकुरे अंकुरे", ए आर रहमान च "Bombay Theme" ...अशी अजुन खूप मोठी लिस्ट देता येईल जी त्या law ची exceptions आहेत...
ती : तसं तर मग सिनेमाच्या काही scenes बद्दल पण म्हणता येईल...not exactly... exceptions... पण जे कितीदा पहिले तरीही अंगावर त्याच intensity नी शहारे आणणारे...
तो : अगदी correct..."जो जिता...
ती : वो ही सिकंदर" मधला रेस जिंकल्याचा scene, किंवा "लगान" मधला match जिंकल्याचा scene, "आनंद"  मधला शेवटचा dialouge...
तो : "आनंद मरा नाही...आनंद मरते नाही"...बघ आताही ही आला शहारा...(दोघही हसतात)...पण असेच काही exceptional scenes english movies मध्ये पण आहेत..."The Pursuit Of Happyness" मधला Will Smith la नौकरी लागल्याचा scene किंवा "If you gotta dream, you gotta protect it" हा dialouge, "The Shawshank Redemption" मधला "Hope is a good thing, may be the best of things and no good thing ever dies" हा dialouge... अशी बरीच उदाहरणं आहेत...
ती : हो ना...seriously... किती मस्त वाटलं हे discuss करून सुद्धा...तरीही पण मला ते सलग तुझं एकंच गाणं ऐकणं काही पचनी पडत नाही...
तो : थांब तुला पटवण्या साठी, अजून एक latest गाणं ऐकवतो..."दंगल" चा title track... कमाल आहे...just amazing...lyrics...music...सबकुछ...! त्यातलं हे एक कडवं फक्त वाचुन दाखवतो ते ऐक and appreciate the lyrics आणि मग गाणं लावतो :

कर दिखाने का मौका
जब भी किस्मत देती है
गिन के तैय्यारी के दिन
तुझको मोहलत देती है
मागती है लागत में
तुझसे हर बुंद पसींना
पर मुनाफा बदले में
ये जान ले बेहद देती है
रे बंदे की मेहनत को किस्मत
का सादर प्रणाम है प्यारे
दंगल दंगल
दंगल दंगल

(नंतर गाणं सलग चार वेळा ऐकून होतं)

ती : (तो गाणं पाचव्यांदा सुरु करताना) हो बाबा i agree की आहेत exceptions... पण आता पाचव्यांदा नको लाऊस हे गाणं...please...
तो : (पाचव्यांदा headphones मध्ये लावत) मी थोडं balcony मध्ये जातो...
ती : (हासत आणि "तुझा screw ढिला आहे" अशी खुण करत, तेच गाणं गुणगुणत स्वयंपाकघरात जाते) सुरज तेरा चढता ढलता...गर्दीश में करते है तारे...दंगल दंगल ☺☺

सारंग कुसरे

No comments:

Post a Comment