Sunday, December 4, 2016

ती आणि तो : Sharing (विकृत)

ती : का बरं लोकं facebook वर इतके disturbing videos share करतात? seriously i hate those...!
तो : काय झालं आता...कोणता disturbing video पाहिलास ?
ती : ते महत्वाचं नाही आहे रे...ह्या mentality ची चीड आली आहे बास...शिव्या येतात मला...फक्त देत नाही आहे इतकंच...! हुश्श..! डोक्यावर बर्फ ठेवते थोडा थांब...!
तो : थोडी शांत हो बरं...इतकाच तुला त्रास होतो तर नकोच ना त्या facebook च्या नादी लागू...
ती : याला काय अर्थ आहे...म्हणजे काही लोकांच्या विकृतीमुळे मी माझं facebook का म्हणुन बंद करायचं...
तो : मग चीडूही नको अशी...त्या पेक्षा त्या व्यक्तिला unfollow किवां unfriend कर...
ती : ते तर मी करणारच आहे...म्हणजे तितकाच डोक्याला कमी त्रास...पण मला एकंच गोष्ट समजत नाही, जगात भरपूर वाईट गोष्टी घडतात म्हणुन काय फक्त त्याचाच जप करायचा कि काय...!! तुमच्या नजरेला फक्त तेच दिसत...कि तुम्हाला या आणि याच depressing गोष्टी share केल्यावर खूप विकृत आनंद मिळतो कि आपण खूप मोठे समाज सुधारक असल्या सारख वाटत...WTF..!
तो : (डोळा मिचकावीत) direct english शिव्या...प्रगतीपथावर आहेस...
ती : तुला मस्करी सुचतेय...
तो : अग नाही ग...तुला थोडं शांत करण्याचा एक प्रयत्न करत होतो...जाऊ दे ना...
ती : जाऊ देणारच आहे रे....पण होत कस की एक depressing गोष्ट पाहिली की बाकी सगळ्या गोष्ठींवर विरझण पडत रे... बर असं काही share केल्यावर negativity व्यतिरिक्त काही चांगलं पसरत नाही ...शिवाय खूप मोठी सामाजिक क्रांती वगरे घडते असं ही काही नाही...then why the hell do this in the first place..? बऱ तो video किवां clipping एका संपुर्ण घटनेचा काही भाग असतो...त्यात वाईट कृत्य करणारा जरी prima-facie आपल्याला वाईट वाटत असला तरीही ते कृत्य का बर घडतं आहे किवा त्या मागची पार्श्वभूमी काय हे न देता ...नुसता disturbing part share करायचा आणि विकृत आनंद घ्यायचा...
तो : अग पण सत्यमेव जयते मध्ये पण disturbing discussions आणि videos दाखवयचे पण ते तर तू अगदी उत्सुकतेने बघायची disturb होऊन सुद्धा...मग??
ते : सत्यमेव जयते बघण न बघण हा प्रत्येकाचा individual choice होता...शिवाय त्यात एका विषयाला अनुसरून मग चर्चा आणि discussions दाखवले गेले. If you care for it then you watch it...नाहीतर नाही...शिवाय though it was at times disturbing, त्याला कुठे तरी एक सामाजिक cause होता ...उगीचच काहीतरी depressing दाखव्हायचं हा हेतू न्हवता...फक्त जागृती एखाद्या विषयाबद्दल...हा prime मुद्दा होता...
तो : अग मग facebook वर share करण्या मागे पण हाच मुद्दा नसेल असं कशावरून म्हणतेस तू...
ती : याचं कारण त्यात कुठला हेतू दिसत नाही ...apart from distress...बघितला disturbing video कि कर share...दिसलं एखाद मारामारीच clipping की कर share...
तो : मग तर तुला एखाद्या मुलाचा किवा वृद्धाचा हरवल्याचा video पण disturbing वाटत असेल...
ती : तो कसा काय वाटणार...दुख होतं जरूर पण atleast त्यात एक अशा तर असते कि जर मी हा share केला तर कुठे तरी चमत्कार होण्याची...पण कुणाला मारण्याचे video share करून मी काय करू शकते सांग मला...what should i do?
तो : (long pause)
ती : विकृती ही असणारच...ती आहेच मुळी सगळीकडे...but that doesn't mean फक्त तेच तुम्हाला दिसावं आणि तेच तुम्ही लोकांना दाखवावं...फक्त विकृत माणसच असं करू शकतात बहुदा...समाजाबद्दल तळमळ असावी...त्यात काही दुमत नाही...पण ती विकृती पसरव्ण्याकडे नसावी असं वाटत मला...
तो : म्हणजे फक्त सगळं goody-goody असावं असं तुझं म्हणण आहे तर...
ती : असं म्हणतच नाही रे मी...तसे videos share करून जर विकृतीला आळा बसणार असेल तर जरूर करावे...तो त्रास सहन करायला सगळेच तयार होतील...पण उगीचच अख्या facebook ला तुम्ही जर police-times बनवायला निघाले असाल तर मात्र माझं आक्षेप आहे...!
तो : बऱ बाबा पटलं...जाऊ दे तो कुत्र्या मांजरीचा एक cute video आला आहे तो दाखवतो तुला...हा बघ (तिच्याकडे mobile देत)
ती : अरे बाप रे हा तर कुणाला तरी गोमास नेताना पकडल्याचा आणि त्यांना मारतानाचा video दिसतोय ...शी.....विकृती....!
तो : अरे बाप रे तो दिसला तुला होय...शांत शांत ....!
ती : %%&%$%&$%&$%&

सारंग कुसरे

No comments:

Post a Comment