Thursday, December 22, 2016

ती आणि तो : 80%...!

स्थळ  : "ती" च घर...
काळ  : लग्नाआधीचा...
वेळ    : लग्नाआधी "ती" आणि "तो" ला पाहण्याच्या कार्याक्रमानंतर थोडं मोकळं बोलता यावं म्हणुन एकटं सोडलं आहे, ती...

(आधी बरंच बोलुन झाल्यानंतर)

तो : रात्री झोपताना पंखा लागतो, अगदी थंडीतही??
ती : हो लागतो, पण या प्रश्नाचा आपल्या लग्नाशी काय सबंध?? This is so trivial...
तो : I know it's trivial, but it still does matter to me...
ती : बरं पुढला प्रश्न...
तो : चहा की कॉफी...?
ती : (जोऱ्याने हासत) Oh come on...बरं बरं... चहा...
तो : Seashore की Hill Station...की दोन्ही?
ती : Depends...पण दोन्ही...i guess
तो : बस झालेच आहेत...last काही शिल्लक आहेत...
ती : By all means...i am ok...पण मला एक सांग या सगळ्या उत्तरांवरून जर तू मला पसंत केलंस आणि मी जर लग्नानंतर बदलले तर...?
तो : त्याला मग मी नशीब म्हणील...पण या युक्तिवादावर मी थोडा ही due diligence नाही करायचा, हे तर चुक आहे नं...
ती : i agree...पण हे सगळं कशासाठी...कारण arrange marriage मध्ये तसाही सगळा आंधळा कारभार असतो...
तो : त्यालाच थोडं का होईना पण डोळस करण्याचा प्रयत्न...
ती : Ok...पण मग महत्वाच्या  प्रश्नांवरून पारख करता आलींच असती की...जे तू anyways आधी विचारलेच...जसे की आई-बाबा, परदेशात राहणं, लग्नाचा खर्च, व्यसनं, छंद, मुलं-बाळ...पण मग अगदी इतके detail 36 प्रश्न का काढलेस...?
तो : त्याच काय आहे की महत्वाच्या प्रश्नांबद्दल सगळेच discuss करतात...पण हे छोटे छोटे प्रश्नच राहून जातात आणि त्याचा नंतर त्रास होण्याची शक्यता असते...होईलच असं नाही.
ती : पण मग असे छोटे प्रश्न काढायचे म्हंटल तर १०० निघतील...
तो : निघतील काय निघालेच...पण मग मी ते prioritize केले आणि त्यातले 36 निवडले...
ती : पण मग 50 का नाहीत 36 च का ?
तो : त्याच काय आहे आपल्याकडे कस 36 गुण जुळतात का ते पाहतात तसंच मी या 36 पैकी किती जुळतात ते पाहतो...
ती : मग किती जुळले की you are happy ?
तो : त्याचही एक logic आहे...समविचारी लोकांच आपापसात जास्त चांगलं जमत कारण तिथे मतभेद होऊन वाद होण्याची शक्यता फार कमी असते...एकच गोष्ट जर दोघानाही तितक्याच तीव्रतेने आणि तितक्याच  intensity ने आवडत अथवा नावडत असेल तर मग वादाला जागा उरतच नाही...वाद नाही म्हणजे भांडण नाही...भांडण नाही म्हणजे रुसवे-फुगवे नाही...
ती : पण त्याने सगळं कस bland होऊन जाईल...असं नाही का वाटत...??
तो : म्हणुन तर पुर्ण 36 जुळावे अशी माझी ही अपेक्षा नसते...rather इच्छा पण...
ती : पण मग किती...?
तो : 80%...त्याचं काय आहे की जर 80% जुळत असेल आणि 20% adjustment असेल तर मग खरी मजा आहे...त्या 20 % मध्ये जे रुसवे फुगवे होतील ते सगळा so called "blandness" घालवुन टाकतील...पण 20% जुळत असेल अन 80% मतभेद असतील तर मात्र...फरफट...
ती : पण मग "Opposites attract each other" असं जे म्हणतात त्याच काय...
तो : ते फक्त लोहचुंबका पुरत खर आहे...असं माझं अगदी ठाम मत आहे...त्याचं काय आहे opposites only attract each other when they have the heart big enough to appreciate the differences of each other...तसं जर असेल तर मग सोन्याहून पिवळ...पण ते arrange marriage मध्ये इतक्या सहजा सहजी सांगता येत नाही न...म्हणुन ही 36 ची प्रश्नावली...
ती : पण मग तु love-marriage ला झुकत माप का देतोस...actually data shows की मतभेद, काडीमोड love-marriage मधेच जास्त पाहायला मिळतात...
तो : तिथे कदाचित courtship period मधली एकमेकांची पारख कमी पडत असेल बहुदा...opposites attract या फसव्या वाक्याला बळी पडुन नंतर differences handle करण्याची maturity नसेल किवा परिस्तिथी ही...you never know...there can be number of reasons...पण म्हणुन तर हा सगळा खटाटोप...
ती : पण मग तुला जे गुण वगैरे बघतात, त्यावर काही विश्वास नाही...पत्रिका वगैरे...
तो : प्रश्न क्रमांक 14 मध्ये आपलं already discuss झालं आणि तुझी आणि माझी मतं बरोबर जुळतात त्या बाबतीत
ती : अरे हो विसरलेच....चल खुप वेळ झाला आपण असेच बोलत बसलो आहोत...बाहेर जायला हवं...
तो : 29 जुळले...म्हणजे almost 80 %...तुला काही नाही विचारायचं मला...
ती : प्रत्येक प्रश्नावर तुझ्याशी discuss केल्यावर कळलंच ना मला ही तुझ्याबद्दल...

(दोघांचंही लग्न होतं, आता लग्नानंतर)

ती : 80% म्हणे...तुझं गणित कच्च आहे का रे..?
तो : काय झालं आता...20% adjustment असणार आहे हे ठरलं होतं ना आधी...
ती : अरे आपल्या प्रत्येक नवीन difference ला, मतभेदाला तू 20% मध्ये घालायला निघाला आहेस सरसकट...
तो : ते करण्यावाचुन काही गत्यंतर आहे का आता....??

(दोघंही मनमुराद हसतात)  J J

सारंग कुसरे 

No comments:

Post a Comment