Thursday, January 19, 2017

ती आणि तो : time travel / throwback

(रात्रीचे जेवण झाल्यावर dining table वर)

तो : झालं आता जेवण आता तरी सांग काय surprise आहे...
ती : काही hints देते...T-Series...
तो : ही कसली hint...अजून काही तरी सांग...
ती :  T-Series...60 mins
तो : वाह !! काय पण addition आहे...जरा कळेल अशी hint दे न..!
ती : आता last chance...T-Series...60 mins...शुभंकरोती...
तो : हरलो madam....तुम्हीच काय ते सांगा आता
ती : अरे तुझी लहानपणीची record  केलेली कॅसेट सापडली मला आज कपाट आवरताना...त्यात तू लहानपणी म्हंटलेलं शुभंकरोती आहे...रामरक्षा आहे...भीमरूपी आहे...काय solid मजा आली माहितीये ऐकताना...
तो : काय सांगतेस...superb...चल परत ऐकू...

(दोघंही परत ऐकतात)

तो : (एकदम emotional आणि philosophical होत) i think this is life...काय मस्त वाटलं seriously...!
ती : "Old is gold" उगाच नाही काही...
तो : हो न खरच...i mean it was a time travel...हे तर सगळं आपलं स्वतःच, personal अनुभवुन तर कुणीही ही nostalgic होईलच...पण youtube वर सुद्धा साधी जुनी गाणी किवा picture बघितला तरीही you instantly go into that era...
ती : अगदी correct...आता परवाच मी youtube वर "व्योमकेश बक्षी" चे काही भाग बघितले...इतकी मजा आली...मला माझे सगळे सहावी सातवी चे दिवस आठवले...ती serial राहिली एकिकडे आणि माझा, तू जस आत्ता म्हणालास तसा, time travel, सुरु झाला...त्यावेळेसचे बुधवारचे रात्री चे जेवण आठवले, हात सुकेपर्यंत ताटावर बसुन अधिरतेने ती serial बघण्याचा रोमांच आठवला...त्यानंतर dining table वर भरभरून केलेली अनेक discussions आठवली...नंतर रात्री जागून केलेला आभ्यास पण आठवला....एकदा time travel सुरु झाला की कशाचं कशाला सोईरसुतक नसत...एका आठवणीतून दुसरी आणि दुसऱ्यातून तिसरी...
तो : हो ना...त्या दिवशी मला पण "आशिकी" आणि "कयामत से कयामत तक" चे गाणे ऐकताना असच झालं...पण त्याच गोष्टीला अजून एक नवीन नाव दिलं आहे आजकालच्या पिढी म्हणजे gen-y नी...
ती : काय?
तो : throw-back...पण throw-back is not only limited to media...म्हणजे फक्त कॅसेट किवा serials किवा picture पुरत नसत...आता अगदी latest time-travel म्हणजे माझी मी recently आपल्या college मध्ये गेलो होतो तो...इतकी मजा आली की that time travel is beyond words...
ती : आपण आपले चांगले क्षण जिथे घालवलेले असतात त्याच जागा काही दिवसांनी, वर्षांनी परत बघायला खरच खुप मजा येते...
तो : म्हणजे कशी गम्मत असते बघ...ती जागा सोडताना त्रास, ती जागा परत भेटल्यावर त्रास...सगळी आसक्ती...
ती : हो न...पण इतकं सगळं छान discussion सुरु असताना त्याला आता आधायत्मिक वळण नको देऊस please...आसक्ती वगरे ऐकल्यावर पोटात एकदम गोळा आला की आता तू अजुन खोलात शिरशील आणि मला ही तिथे गटांगळ्या मारत नेशील...
तो : (जोऱ्याने हासत) नाही dont worry...!! पण काही गोष्टी आठवल्या की आजही हसू आवरत नाही..."देवदास" लपुन पाहुन आल्यावर घरी जे आईनी back मध्ये लाटणं throw केलं होत...तो throwback मी आयुष्यात कधीही विसरणार नाही...
ती : हिच तर पुंजी आहे पुढल्या प्रवासाकरता...या एकाच feeling ला, thought ला गुलझार साहेबांनी इतकं मस्त बंदिस्त केला आहे एका line मध्ये...
तो : कोणत्या ??
ती : "जो गुजर जाती है बस्स, उसी पे गुजर करते है...राह पे रेहेते है, यादो पे बसर करते है"
तो : "नमकीन" मधलं संजीव कुमार च गाणं...अप्रतीम...!
ती : yesss...!
तो : चल तेच ऐकु आत्ता...

(दोघंही youtube वर ते गाण "सोबत" ऐकत आपापला "स्वतंत्र" time travel करतात)

सारंग कुसरे 

No comments:

Post a Comment