Thursday, January 5, 2017

ती आणि तो : background music...!

ती : जी कविता आता तू वाचलीस, तिच जर with background music असती तर किती मजा आली असती नं...
तो : या background music चाच तर सगळा करिश्मा आहे...rather घोळ आहे...
ती : म्हणजे...
तो : मला असं कायम वाटतं की background music मध्ये नं आपले emotions hijack करण्याचं सामर्थ्य असतं...ते specifically आपल्या मनाला संदेश देतं about the event that is occuring or about to occur...
ती : मग तर its good नं...कुठल्याही गोष्टीची सुचना किंवा पुर्वसुचना...तसंही माणसाला informed राहायला आवडत असतंच...
तो : अगदी मान्य...पण emotions प्रत्येक वेळेला hijack न होता जर हवे तसें आलेत तर त्यात आणखी मजा येते असं मला वाटतं...
ती : मला नाही पटत, मला असं वाटतं की background music ने कुठल्याही performance ला, act ला एक साज चढतो, एक mood बनतो...ज्याने गम्मत आणखी द्विगुणित होते...
तो : काही acts च्या बाबतीत हे खरंही असलं तरीही त्याचा अतिरेक आजकाल होतो आहे असं नाही का वाटत...सगळंच artificially emotional करण्याच्या नादात खरं emotion बाजुला राहतं आणि आपण background music सांगेल तिकडे फरफटले जातो...
ती : हो तसं होतंय खरं...
तो : आता साधं उदाहरणं घ्यायचं झालं तर आजकाल च्या news चं घेता येईल...आता news ही काय background music ने ऐकण्याची पाहण्याची गोष्ट आहे का...नाही...तरी पण तिथे ते घुसडुन artificially मनात हात घालण्याचा प्रयत्न होतोच की नाही...मला तर असं ही वाटतं की in future... सगळ्या newspaper सोबत एक barcode देतील आणि म्हणतील की हा scan करा आणि सगळ्या news with background music वाचा headphones लावुन...
ती : काय भन्नाट कल्पना आहे..."सकाळ" ला कळवते आजच...
तो : म्हणजे प्रत्येक गोष्टीत मनाला बाहेरचं stimulation... raw असं काहीच नाही...!!
ती : हो पण काय करणार, you cant stop it...so live with it or just ignore it...
तो : नाही गं, तो काय इतका जीवन मरणाचा प्रश्न नाहीच मुळी...just आपलं एक observation...
ती : पण जसं तु म्हणतोस, तसं रोजच्या जगण्यातले raw emotions तुला कोणते सांगता येतील जे without background music देखील मनात कालवाकालव करतात...
तो : किती आहेत की...
ती : जसे की...
तो : गणपती विसर्जन...म्हणजे apart from all ढोल-ताशे, गणपती पाण्यात सोडतात तो actual क्षण...कुठल्याही आणि कोणाच्या ही लग्नाच्या शेवटी पाठवणी चा क्षण, घर shift करताना boxes मध्ये सामान भरल्यानंतर त्या रिकाम्या घरा कडे बघताना जी कालवाकालव होते तो क्षण...अजुनही बरेच आहेत...!
ती : हो रे...तिथे background music नसतं म्हणुनच ते क्षण raw आणि pure राहतात. प्रत्येकाचे आपले...पण मग movies मधल्या background score बद्दल तर तुझा आक्षेप नको...कारण that medium demands it...!
तो : तसा तो नाही...पण background music न देता ही ती कलाकृती फक्त त्या विषयाच्या ताकदिवर लोकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचवता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे...नागराज मंजुळे च्या दोनही चित्रपटाचे शेवट...background music कुठे नको हे त्याला बरोबर कळलं...!
ती : कोणते फँड्री आणि सैराट ??
तो : तू notice केलंस का मला माहित नाही... पण दोन्ही चित्रपटाच्या शेवटी जे सांगायचं आहे ते without background music मंजुळे नी इतकं प्रभावी पणे सांगीतल आहे की ते artificially न घुसता direct मनात genuinely गेलं.
ती : पण मला एक सांग background music नसेल तर काही सोहोळ्यांचा मोहोत्सव होणारच नाही की...
तो : म्हणजे...
ती : आता लग्न-मौंजी मध्ये जर सनई नाही लागली, अभ्यंग स्नानाला सनई नाही लागली तर चुकल्या चुकल्या सारखं वाटेल नाही...माहोल नही बनेगा शायद...नाही??
तो : अगं त्याला माझा विरोध नाहीच आहे गं...ते तर हवंच...ते तर आपल्या culture मध्ये आहेच...इतकच कशाला, काम करताना ही मी concentration व्हावं म्हणुन background ला गाणी लावतो...आता तू नाही सकाळी स्वयंपाकाच्या वेळेस radio लावतं...त्यांनी एक उत्स्फुर्तता येते आणि वेळ छांन जातो...that is all right...त्यात काही दुमत नाही...माझा विरोध किंवा आक्षेप फक्त हे जे काही artificially emotional करण्याच्या नादात जो  background music चा वापर केल्या जातो त्या वर आहे...तुला आणखी एक गम्मत सांगतो...
ती : कोणती...?
तो : आजकालचे कुठलेही talk-shows / promotional shows घे...सेटवर कुठलाही emotional प्रसंग घडला की editing /  mixing team ला एकदम उधाणाच येत...की आता किती creativity दाखवू आणि किती नाही...लगेच त्याला background music ची करुण आणि artificially emotional फोडणी दिली जाते...it feels so fake...! मला तर वाटतं की असलं artificially emotional करुन तुम्ही त्या व्यक्तीच्या भावनांचा अपमान करत आहात...
ती : पण मग त्या वेळेला काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे...
तो : काहीच नाही ...शांतता...let that emotion sink in naturally...than forcefully...! मला असं वाटत ते जास्त प्रभावी ठरेल..जसं मंजुळे च ठरलं...!
ती : (हासत) मग लग्नाच्या कॅसेट मध्ये जे background ला गाणे लावतात त्या बद्दल...
तो : (वैतागलेला हासत) त्या बद्दल तर बोलू देखील नको...तो pure छळ असतो...आपल्या मंगलमय क्षणांचा tragedy कम comedy आठवण रुपी तो एक दस्तावेज असतो...creativity चा परिपाक...काय पण गाणी असतात background ला...वाहं...काय पण कलाकारी असते...धन्य अगदी धन्य होतो बघणारा...
ती : (हसतच) मग काय plain शांतता ठेवायची की काय...किती बोअर वाटेल ते...
तो : मी तसं म्हणालो आहे का...जिथे गत्यंतरच नाही background music शिवाय, तिथे निदान प्रसंगाला साजेसं, sobre music द्यावं...इतके छान instrumental tracks आहेत ते लावा नं background ला...नाही कोणी म्हंटल...पण नाही दबंग पासुन ते माहेरच्या साडी पर्यंत सगळी हौस ते कॅमेरा वाले भागवून घेतात...जणू काही त्यांनाच ती कॅसेट आयुष्यभर बघायची आहे...असो...
ती : (त्याला चिडवत) जाऊ दे रे आपल्या लग्नाची cd आपण परत format करू आणि तुला हवे ते tracks घालू background ला...एक काम कर ना तुच पुर्ण editing आणि mixing कर घरी...
तो : (दोन्ही हात जोडत) बरं...!आपल्या silver jubilee ला नक्की करू हं madam...
ती : (हासत आणि उजव्या हाताचा तळवा त्याच्या कडे दाखवत) तथास्तु....पण इतकं सगळं discuss केल्यावर आता असं खरंच वाटतय की तुझ्या त्या कवितेला background music नकोच...
तो : Exactly...कविता किती खोलवर रुजते त्या साठी background music किवा ती present करताना नकलेची / acting ची कशाला कुबडी हवीत ..असेल धमक कवितेत तर it will succeed no matter what...!
ती : बाप रे...४.३० वाजले...कळलंच नाही वेळ कसा गेला तो...चल चहा करते पटकन...

(तो उठुन पंडित विश्वमोहन भटांचं "Floating with the clouds" हा instrumental track लावतो आणि सोफ्यावर आडवा होतो)

ती : (चहा करता करता, त्याला थोडं चिडवत) अरे तुच आत्ता म्हणालास ना background music नको म्हणुन...!
तो : (सोफ्यावर पडल्या पडल्या, बंद डोळ्यानीच थोडं हासत) अग हो, पण अमृततुल्य पिण्याच्या सोहोळ्याचा मोहोत्सव करावासा वाटला ...म्हणुन...!😉😉

सारंग कुसरे  

No comments:

Post a Comment