Thursday, January 12, 2017

ती आणि तो : hair dye...!

("तो" गळ्याभोवती towel गुंडाळून, "ती" त्याच्या डोक्याला hair dye लावताना)

तो : (वैतागुन) झालं का लावुन सगळ्या डोक्याला...प्रत्येक केसाला...केसाच्या प्रत्येक शेंड्याला...
ती : झालंच आहे...just two more minutes...
तो : हेच गेल्या 20 मिनिटांपासून ऐकतोय...
ती : झालंच...!
तो : आता कितीवेळ हे रंगकाम बाळगायचं ते ही सांगून द्या...?
ती : फक्त 15 मिनिटं...
तो : हे कस काय...नेहेमी तर तू मला किमान 45 मिनिटं तरी ठेवायला सांगतेस...
ती : अरे हे नवीन आहे काही तरी...जाऊ दे ना...तुला कशाला details...बस 15 मिनिटं लक्षात ठेव आणि नंतर अंघोळीला जा...आणि हो डोक्याला साबण नको लावुस...shampoo लाव aloe-vera gel वाला...मी जरा बाहेर जाऊन येते...!
तो : जशी आपली आज्ञा...!

(डोक्यावरच्या शीतल रंगकामामुळे "तो" चा डोळा लागतो. दिड तासांनी दारावरची बेल वाजते..."तो" चा डोळा उघडतो आणि "तो" दार उघडायला जातो)

ती : (दारात चपला काढताना) अरे अजुन अंघोळ नाही केलीस...?
तो : अग या ठंडा-ठंडा cool-cool मुळे डोळा लागला...जातो आता...

("तो" अंघोळ करून आल्यावर)

ती : (रागातच त्याच्या कडे बघत)
तो : काय झालं...अग छान झालाय dye...एकदम काळेभोर....रेशम से मुलायम...
ती : आणि drawing room मधल्या भिंतीवर जो काळा सुर्य काढुन ठेवला आहेस त्याचं आता काय करायचं...तुझी अंघोळ संपेस्तोवर मी तो डाग काढायचा प्रयत्न करते आहे पण काही केल्या निघत नाहीये...
तो : (तोंडात पुटपुटत) म्हणजे रंग पक्का आहे तर...good quality it seems...
ती : अरे विनोद कसले करतोस...आता hall मधली atleast ती भिंत तरी रंगवावी लागणार...
तो : महागात पडला घरचा dye...पण मी काय म्हणतो की dye करायची गरजच काय ?? असतील तर असू द्यायचे पांढरे केस...whats the big deal ??
ती : मला नाही पटत...मला असं वाटत की जर चांगलं आणि नीत नेटकं दिसायची सोय आहे, ऐपत आहे आणि मुख्य म्हणजे इच्छा आहे तर मग का नाही...?
तो : म्हणजे जे dye करत नाही ते काय नीटनेटके नाहीत असं म्हणायचं का तुला ??
ती : मी कुठे म्हंटल असं...माझं फक्त इतकंच म्हणण आहे की जर polished दिसता येत असेल आणि ते मूर्खपणाच वाटत नसेल तर करायला काय हरकत आहे ?? हे मी फक्त dye बद्दलच बोलत नाहिये...in general personal grooming बद्दल बोलते आहे...मग त्यात माफक make-up, facial आणि हो dye देखील आला...आता तुच सांग मी dye केलं आणि तू तुझी सुतार फेणी, अकाली वयातली, बाहेर घेऊन पडलास तर लोक काय म्हणतील...अगदी त्या hair-dye मधल्या advertisement सारखं होईल...तु uncle आणि मी दीदी...(हासत)
तो : (डोळे बंद करत...fake ज्ञानस्थ मुद्रेत) तुला विवेकानंद काय म्हणाले ते ठाऊक नसेल तर मी सांगु इच्छितो...
ती : मस्करी कसली करतोयेस...सांग पटकन
तो : ते असं म्हणाले आहेत की : Character should make a person glorify not his suit or appearance. Bright clothes may make a human look good but lack of proper behavior and ethics won't make him good.
ती : व्हाटसअपानंद महाराज...तुझ्या knowledge करता मी पण एक गोष्ट सांगू का विवेकानंदाचीच...! त्यांनी असं देखील म्हंटलेलं आहे की The beauty of the living spirit shining through the human face is far more pleasurable than any amount of material beauty. त्यातला deep अर्थ जरी बाजूला ठेवला तरीही superficial अर्थ पण बरच काही सांगून जातो आणि तेच मी follow करण्याचा प्रत्यन करते...शिवाय मर्लिन मनरो माहित असेलच आपल्याला...
तो : म्हणजे काय...obviously...!!
ती : तिनं काय म्हंटल आहे...I don't mind making jokes, but I don't want to look like one. म्हणुन हे सगळं...(त्याच्या डोक्याकडे बोट दाखवत)...
तो : मान्य आहे की "दिसणं" is important पण "असणं" ही तितकंच महत्वाच नाही का...first impression is the last impression...ही माझ्या मते एक fallacy आहे...no doubt तुमच्या appearance वरून लोक तुम्हाला जवळ करतीलही पण तुमच्या appearance सारखे तुमचे विचार, आचार नसतील तर  first impression fade व्हायला वेळ लागत नाही...कितीदा हा experience येतो आपल्याला...
ती : पण that cannot be an excuse for अजागळ living...
तो : i agree...म्हणुन तर लावला नं dye madam...

(थोड्या दिवसांनी दोघंही mall मध्ये जातात)

ती : हे padicure kit घेऊ आपण आज...छान वाटलं trial
तो : (पुस्तकांच्या section मधुन हातात एक पुस्तक घेऊन) आमटेंच  "प्रकाशवाटा" घ्यायचं का...खुप दिवसांपासुन घ्यायचं होतं ...
ती : तू जर मला, तुला padicure करू देणार असशील तर...
तो : तू पण जर हे पुस्तक माझ्या सोबत वाचणार आणि discuss करणार असशील तर...
"तो" आणि "ती" एकमेकांकडे बघत : नक्की ...:-) :-)

सारंग कुसरे  

No comments:

Post a Comment