Tuesday, September 26, 2017

ती आणि तो : arrivals

("ती" आणि "तो" airport मधल्या parking मधुन 'Arrivals' मध्ये  "ती" च्या आई बाबांना receive करायला जाताना)

ती : parking ticket सोबत घेतलंस ?
तो : हो ग घेतलंय आणि गाडी पण lock केली...

(दोघंही पळत पळत 'Arrivals' च्या gate समोर उभे राहतात)

ती : flight land होऊन २५ मिनिटं झाली, म्हणजे border security आणि baggage reclaim ला लागणारा वेळ धरून आई बाबा पुढल्या १० मिनटात बाहेर यायला हवे...
तो : you never know...holiday season आहे गर्दी मुळे late देखील होऊ शकतं...

(आई बाबांची  वाट बघत असता, "ती" चं पुर्ण लक्ष आई बाबांकडे आणि "तो" चं लक्ष, इतर सगळ्या येणाऱ्या लोकांकडे आणि त्यांना receive करायला आलेल्यां कडे असतं. "तो" त्याचं observation करत असतो, त्यांच्या हावभावांच, त्यांचा emotions चं . त्या वरून त्याचं पुढलं बोलणं सुरु होतं)

तो : तो मुलींचा घोळका बघ...किती ओरडण...किंचाळण..आणि लगेच सेल्फी...आणि तो तिकडे बघितलास का तो मुलगा किती over-acting करतो आहे सगळ्यांसमोर..?
ती : अरे असं कस काय म्हणतोस...बऱ्याच दिवसांनी भेटला असेल कदाचित...कदाचित परत भेटू की नाही या शाश्वती नंतर भेटला असेल...
तो : पण तरीही बरेच दा PDA मध्ये तुमचे कोणते भाव आहेत या वरून ते खर की दिखावू हे लगेच लक्षात येत...
ती : पहिले PDA म्हणजे काय ते सांग...
तो : Public Display of Affection... जे india मध्ये थोडं कमी आणि पाश्चात्य देशात जरा जास्तच दिसतं... हल्ली अंधानुकरणामुळे भारतात देखील...actually आत्ता जे airport वर बघतो आहे त्याला public display of emotion म्हणायला हवं...PDE थोडक्यात...कारण PDA तसा फार मोठा विषय आहे...
ती : पण तुला ते इतकं नाटकी का वाटावं ??
तो : माहित नाही, पण मला आजकाल असं वाटायला लागलं आहे की प्रत्येक झण social life मध्ये, आपल्या कडे एक अदृश्य कॅमेरा बघतो आहे या धुंदीतच वावरत असतो...
ती : तसं ते आहेही म्हणा... आपल्या mobile च नाही का...
तो : तसं नाही ग ते फक्त selfie पुरतं... पण general वागणं देखील फार caricaturish झालं आहे...
ती : काय पण शब्द वापरतो...आता caricature हा कसला शब्द आणि त्याचा अर्थ काय??
तो : अंग caricature म्हणजे व्यंगचित्रामध्ये एखाद्या माणसाची एखादी quality exaggerate करून जे व्यंगात्मक चित्र काढतात तसं...caricature ला अजून चांगलं explain करायचं म्हणजे एखाद्या cinema मध्ये अभिनेता खूप नाट्यमय भूमिका करतो जसं generally वास्तवात कुणी वागणार नाही...comedy किंवा serious...
ती : आलं लक्षात थोडक्यात overacting...
तो : तसंच काहीसं...
ती : हो पण त्याचा इथे काय संबंध ??
तो : माझं म्हणणं इतकंच आहे की आशा सार्वजनिक ठिकाणी लोकं खुपचं overacting करतात...मला असं वाटतं की ते तुमचे फार personal moments असतात त्याचा असा public show करण्यात काय अर्थ आहे...मला नेहेमी एक विचार मनात येतो हे सगळं बघितल्यावर की जितक्या आत्मीयतेने हे PDA sorry PDE करतात तितकंच प्रेम, वात्सल्य, आधार एकांतात, जेव्हा कुणी आजूबाजूला नसतं तेव्हाही देतात का...की तेव्हा mobile, ipad मध्ये तोंड घालून आपण fb वर टाकलेल्या fotos / posts ला किती like मिळाले यात असतात...मला नेहेमी असं वाटतं की माणसाचं खरं रूप, तो त्याला कुणी बघत नाही आहे, तेव्हा तो कसा वागतो, हेच आहे...that is his true self...not when he is in public, on camera or on stage.
ती : अरे पण बरेचदा इतकं भान राहत नाही आणि emotions बाहेर निघतात... काळ, वेळ काहीच दिसत नाही...
तो : अगं खरें मनापासून असतील नं तर मग काहीच हरकत नाही...पण acting असेल तर ती लगेच लक्षात येते...
ती : आता खरी कोणती आणि acting कोणती कसं ओळखावं आणि मुख्य म्हणजे मी म्हणते इतकं लक्ष तरी का द्यायचं आणि आपलं डोकं खराब करायचं आपण...
तो : नाही ग डोकं कसलं खराब...हे आपलं मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं...आता तुला नाही तर अजून कोणाला सांगणार...अगदी हक्कानी आणि कायद्यांनी सुद्धा या जगात मी फक्त तुलाच बोअर करू शकतो आणि आपलं मन मोकळं करू शकतो...त्या गोष्टीचा मी पुरेपूर उपभोग घेतो इतकंच...("ती" ला डोळा मारतो)
ती : (घड्याळा कडे बघत) अजून कसे नाही आलेत रे आई बाबा...नक्की काही तरी घोळ झाला आहे...यांच्या बॅगा आल्या असतील ना?
तो : तू आता उगीच tension नको घेउ...मागे नाही...आपण जोशी काका काकूंना receive करायला आलो होतो तेव्हा किती उशीर झाला होता...इतकं tension घेण्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांना observe कर...आणि मजा घे...you will love it
ती : ते तूच कर...सद्या माझं सगळं लक्ष आई बाबांकडे लागलं आहे...

(तितक्यात "ती" चे आई बाबा bag trolley सोबत बाहेर येतात..."ती" आनंदाने जोरात किंचाळते, त्यांचे फोटो काढते, त्यांच्या गळ्यात पडून रडते आणि शेवटी एक pout असलेला selfie देखील काढते आणि "तो" सगळं मुसळ केरात गेलं या भावनेने, त्यांच्यात सामील होतो)☺☺

सारंग कुसरे





No comments:

Post a Comment