Tuesday, September 26, 2017

ती आणि तो - भित्रा

स्थळ : घर
काळ : रात्रीच्या जेवणाची
वेळ : "तो" आणि "ती" जेवताना tv बघत जेवत आहे ती

तो : (TV वर कुठला तरी travel related show बघताना) वाह काय मस्त लागत असतील नं हे मिरची पकोडे जोधपुर चे...?
ती : खाता येतील का महाराज तुम्हाला ??
तो : का असं का म्हणालीस?
ती : नाही तुला गोड जास्त आवडतं म्हणुन म्हंटल...!
तो : अग पण गोड जास्त आवडतं म्हणजे मी तिखट खातच नाही किवा तिखट मला पचतच नाही असं मुळीच नाही...
ती : अरे पण तूच नाही का नेहेमी मला स्वयंपाक कमी तिखट करायला सांगतोस...
तो : याचा अर्थ असा नाही की तुला प्रत्येकच पदार्थ कमी तिखट करायला सांगील...आता कुणी नागपूर चं सावजी कमी तिखट करा म्हंटल तर ते शक्य नाही..तसच आहे हे...जे पदार्थ तिखट खायला पाहिजे, तेज खायला पाहिजे ते तसेच चांगले लागतात provided ते tasty असतील तर...त्यात तुम्ही गोडघाशे असाल किवा एरवी कमी तिखट खात असाल म्हणुन तुम्ही ते खाऊ शकणार नाही असं मुळीच नाही...
ती : पण तू नाही का नेहेमी कमी तिखटाला support करतो...मग ??
तो : अग जे आवडेल तेच मनुष्य खाणार नाही का...आता मला normally कमी तिखट लागत असेल तर काय बिघडलं काय ? पण म्हणुन भेळ, पाणीपुरी, मिसळ हे काही कमी तिखट खात नाही मी...पण तुला एक गम्मत सांगतो...
ती : कोणती ??
तो : जे लोकं जास्त तिखट खातात त्यांना कमी तिखट खाणारे फुसके किवा अंगात धैर्य नसलेले किवा भित्रे वाटतात...मला माहित नाही तू हे experience केलं आहेस का?
ती : छे...तुझं म्हणजे काहीतरीच...
तो : अगं खरंच...जणू काही तिखट किवा तेज खाल्याने अंगी खुप धैर्य येत किवा खुप पराक्रम केल्यासारखा वाटतो...not sure पण तीखटा सोबत machoism / पराक्रम का बर relate केल्या जातं...मला आज पर्यंत कळलेलं नाही...म्हणजे पुरणपोळी किवा साखरभात खाणारा माणूस फुसका आणि जहाल तिखटाची किवा मिरच्याची चटणी खाणारा माणूस म्हणजे 'बाहुबली'...हेे कोडं माझं आजतागायत सुटलेेलं नाही...!!
ती : पण तुला असं कधी जाणवलं?
तो : बरेचदा...मला एक कळत नाही की तिखट खाणं जर इतकंच पराक्रमाचं असतं तर देवांना आपण गोडाचा नैवेद्य का दाखवतो??? दाखवा तिथे ही लसणाची चटणी, तिखट लाल रस्सा असेलेली भाजी...माझा point आहे की why is someone looked down upon based on what he choose to eat, drink? सगळं हास्यास्पद आहे...
ती : हे मात्र अगदी correct बोललास
तो : आता हेच बघ ना दारू पिणाऱ्या लोकांना दारू न पिणारे म्हणजे अगदीच केविलवाणे वाटतात...सगळ्यांना नाही...पण बऱ्याच झणांना...परत तेच logic, as if दारू पिल्याने दोन शिंग जास्त फुटतात धैर्याची...
ती : (हासत) शिंग नाही पंख फुटतात म्हण...
तो : सगळं कसं templatised करून टाकलं आहे...तिखट म्हणजे शौर्य, दारू म्हणजे धैर्य, गोड म्हणजे फुसका, सरबत किंवा कोल्ड ड्रिंक म्हणजे बच्चा... अरे अरे कीव करावी तेवढी थोडी...
ती : जाऊ दे रे तू इतकं मनाला नको लावून घेऊस
तो : नाही ग मनाला नाही...पण असा विचार येतो की खरं macho दिसण्याने, macho वागण्याने तुम्ही macho आहात हे सिद्ध होत नाही नं... ते मनात असावं लागतं...
ती : मला प्रहार चा dialouge आठवला ज्यात नाना म्हणतो की "असली ताकत याहा (हाताच्या दंडाकडे point करत) नाही याहा (डोक्याकडे point करत) होती है"
तो : exactly... confidence हा पुरण पोळीतही नाही आणि लसणाच्या चटणीतही नाही...तो तुम्ही तुमच्या मनाला कोणतं खाद्य देता त्यात आहे...
ती : चल जाऊ दे...आता काय वाढू ताटात ते सांग...
तो : वाढ थोडी गुळ तूप पोळी...
ती : भित्रा रे भित्रा ☺

(दोघंही मनमुराद हसतात)☺☺

सारंग कुसरे

No comments:

Post a Comment