Tuesday, November 17, 2015

वचक

नमस्कार...!

बऱ्याच दिवसांनी परत लिहिण्याचा हुरूप आलेला आहे. ब्लॉग काढुन तसा बराच काळ लोटून गेला पण कधी अपडेट करणं होत न्हवतं. (तसा माझा आधीच एक ब्लॉग आहे wordpress वर (http://criticinme.wordpress.com), पण तो मुख्यत्वे reviews साठी सुरु केलेला होता. नंतर त्यात कविता पण पोस्ट करू लागलो. कालांतराने ते पण काही औंशी कमी झाले. पण तो पण ब्लॉग परत revive करायचा आहे. असो. सध्या या ब्लॉग विषयी बोलू. ) आता चांगलं कारण मिळालं आहे परत लिखाण करायला. नुकतच कविता रेकॉर्ड करून YouTube वर पोस्ट करायचं एक नवीन काम हाती घेतल आहे. आणि मुख्य म्हणजे ते करण्यात मजा देखील खुप येते आहे. तर हा ब्लॉग पुनरोज्जीवीत करण्याचं मुख्य कारण म्हणजे, या ब्लॉग वर काही कवितांचे किस्से, रसग्रहण किवां कविता सुचायच्या मागची कहाणी मी इथे सांगणार आहे. प्लान असा आहे की कविता YouTube वर पोस्ट करायची आणि त्या बद्दल या ब्लॉग वर लिहायचं. तर येणारी पुढली कविता YouTube वर आहे , "वचक".

ही कविता मला मी लंडन ला होतो त्या वेळी tube (लंडनची लोकल)  मध्ये सुचलेली आहे. त्या वेळी ऑफिस च्या टेन्शन मुळे म्हणा किवा ऑफिस मध्ये कुणीतरी काही तरी म्हण्ल्या मुळे म्हणा पण खुप उदास वाटत होतं आणि सारखे डोळे पाणावत होते. त्या वेळी खरं तर मला माझा राग देखील आला होता मी असल्या फालतू गोष्टींना महत्व देतो आहे याचा. त्या वेळी अगदी आपसुक tube च्या प्रवासात ही कविता सुचली आणि थोडं बर वाटलं. डोळ्यातल्या पाण्यावरच्या वचकाबद्दल ही कविता हे सुचवते की अगदी कोणाही साठी (म्हणजे कोणत्याही ऐऱ्या- गैऱ्या साठी) डोळ्यातले अमुल्य अश्रू निघू नयेत. आपले अश्रू कुणाच्या नासक्या बोलण्यावर अवलंबुन नसावेत, असं ही कविता सांगते. आपले अश्रू थोडे शहाणे, थोडे mature आणि बरेच से tough व्हावे आणि ते फक्त जिथे रास्त आहेत तिथेच निघावे असं मला या कवितेतून सुचवायचं आहे. आशा आहे आपल्याला कविता आवडेल.

वचक


पाण्यावर वचक हा बसायलाच हवा
येण्या प्रलय खडा टाकल्यावर नवा
एरवी कसे निश्चल असते उबदार उन्हात
दाटून आले नभ कि मग दिसते प्रतीबीम्बात
तीच तर असते वेळ अन तोच तो क्षण
म्हणायचे असते तेव्हाबा मना दगड बन
लाटांवर लाटा धडकतात किनारी
दगडाने तळ्यात घाव घालता जिव्हारी
खरतर दगडाची पात्रता ओळखून मगच प्रलय यायला हवा
पाण्यावर वचक हा खरोखरी बसायला हवा….!


सारंग कुसरे

No comments:

Post a Comment