Friday, November 20, 2015

फिनिक्स

बरेचदा असं होतं की हवा असलेला क्षण हातातुन निसटुन जातो आणि मागे राहतो तो केवळ पश्चाताप. तो क्षण निघुन गेल्याचं तर दुखः असतच पण त्याहुनही तो क्षण आपण आपल्या हळवेपणामुळे, रागीटपणामुळे (त्या situation ला defeat झाल्यामुळे, give-up केल्यामुळे), अती विचार करण्याच्या वृत्ती मुळे गमावला याचं जास्त दुःख होत राहतं. तो क्षण परत यावा असं मनोमन वाटत राहतं पण आता त्याला गत्यंतर नसतं कारण तो क्षण, ती वेळ, तो सोहळा परत येणारं नसतं [मृगजळाची वाफ - मृगजळ (इच्छा), वाफ (इच्छा पूर्ण न होणं)]. आणि मग आपला रोख सगळं देवाकडे वळतो. त्याला शिव्या घालण्यात, आरोपी ठरवण्यात आपण आपला त्रागा करून घेतो. याच आशयाची ही कविता आहे. Hope so, तुम्हाला आवडेल.

फिनिक्स


हक्काच्या वेळेची राख-रांगोळी
बहुतेक दैवाचीच इच्छा पांगळी
फिनिक्स झेपवावा त्या राखेतुन
चमत्कार घडावा वाटे आतुन
मनोमन जरीही हि इच्छा असते
दृष्टिस मृगजळाची वाफ दिसते
दगडातल्या देवावर आता दगडच घालावा
भुसभुशीत मातीबद्दल जाब विचारावा

सारंग कुसरे

No comments:

Post a Comment